6th SS 17.Directive Principles of State Policy राज्य मार्गदर्शक तत्वे

  इयत्ता – सहावी

imageedit 2 3404846682

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – 2022 सुधारित 

17. राज्य मार्गदर्शक तत्वे

स्वाध्याय 
गटामध्ये चर्चा करा आणि उतरे द्या.
1.
राज्य मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय ?
उत्तर – सुखीराज्य निर्माण करण्याच्या
हेतूने संविधानाने राज्यांना काही तत्वे प्रस्थापित करून मार्गदर्शन केले आहे अशा
मार्गदर्शी तत्वांना राज्य मार्गदर्शक तत्वे असे म्हणतात.


2.
महिला आणि बालकल्याणाच्या स्थापनेसाठी राज्य
घटनेने कोणत्या सूचना दिलेल्या आहेत
?
उत्तर – महिला आणि बालकल्याणाच्या
स्थापनेसाठी राज्य घटनेने पुढील सूचना दिलेल्या आहेत.

  • समान कामासाठी समान वेतन
  • महिलांसाठी मातृत्व लाभ
  • मुलांच्या निरोगी वाढीस प्राधान्य
  • मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे.


3.
राज्य मार्गदर्शक तत्त्वे, पशुहत्या
निषेध करण्याच्या सूचना का दिल्या आहेत.

उत्तर – कारण भारतात पशुंना संस्कृतिक
धार्मिक व कृषी विषयक महत्त्व असल्यामुळे राज्य मार्गदर्शक तत्वांनी पशुहत्या
निषेध केला आहे.


4.
सर्वांना समान कायद्याच्या गरजेची आवश्यकता का
आहे
?
उत्तर –सर्वांना समान हक्क
देण्यासाठी
,एकात्मता वाढीस
लागण्यासाठी
,सामाजिक न्याय आणि
एकतेला प्रोत्साहन देण्यासाठी समान कायद्याची आवश्यकता आहे.

5.
राज्यात मद्यपान बंदी करण्याची सूचना का देण्यात
आली आहे
?
उत्तर –मद्यपानामुळे आरोग्य बिघडते.
कुटुंबाची आर्थिक स्थिती बिघडते
, तसेच
महिलांचे शोषण वाढते. यासाठी भारतीय संविधानाने राज्य सरकारला मद्यपानावर बंदी
घालण्याचा आदेश दिला आहे.










 

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now