इयत्ता 8 वी विज्ञान पाठ 11 – आकाशासोबत वेळ घालविणे | Karnataka NMMS MCQ Question Bank

SmartGuruji

KARNATAKA NMMS सराव प्रश्नपेढी

इयत्ता 8 वी | विज्ञान | पाठ 11. आकाशासोबत वेळ घालविणे

विद्यार्थी मित्रांनो,
यावर्षी इयत्ता 8 वी विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम बदलला आहे. नव्या अभ्यासक्रमातील पाठ 11 वा “आकाशासोबत वेळ घालविणे” अत्यंत मनोरंजक आणि महत्त्वाचा आहे. यात आपण चंद्राच्या कला, काळ मोजण्याच्या पद्धती आणि कृत्रिम उपग्रहांबद्दल शिकणार आहोत. कर्नाटक NMMS परीक्षेच्या दृष्टीने उत्तम सराव करण्यासाठी ही MCQ प्रश्नपेढी तयार करण्यात आली आहे.

NMMS परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे (Revision Points)

  • चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो; तो सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो.
  • चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार एका आठवड्यात पूर्ण वर्तुळापासून अर्धवर्तुळापर्यंत कमी होतो.
  • वाढत्या चंद्राच्या काळाला ‘शुक्लपक्ष’ आणि कमी होणाऱ्या काळाला ‘कृष्णपक्ष’ म्हणतात.
  • चंद्र दररोज सुमारे 50 मिनिटे उशिरा उगवतो.
  • चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेच्या दिवशीच होऊ शकते आणि सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशीच होऊ शकते.
  • चंद्राची कक्षा कललेली असल्याने ग्रहण दर महिन्याला होत नाहीत.
  • चंद्राला सर्व कलांमधून फिरण्यासाठी सुमारे 29.5 दिवस लागतात, यावरून ‘चंद्र महिना’ ठरतो.
  • 12 चंद्र महिन्यांचे एक ‘चंद्र वर्ष’ 354 दिवसांचे असते. तर ‘सौर वर्ष’ 365 आणि एक चतुर्थांश दिवसांचे असते.
  • सौर वर्षाशी जुळवून घेण्यासाठी चंद्र-सौर दिनदर्शिकेत ‘अधिक मास’ (अतिरिक्त महिना) जोडला जातो.
  • भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका 22 मार्चला सुरू होते. हे एक सौर कॅलेंडर आहे.
  • मेघनाद साहा हे कॅलेंडर सुधारणा समितीचे अध्यक्ष होते.
  • विक्रम साराभाई यांना ‘भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक’ म्हणून ओळखले जाते.
  • कार्टोसॅट, अॅस्ट्रोसॅट, चंद्रयान हे ISRO ने प्रक्षेपित केलेले कृत्रिम उपग्रह आहेत.
उजळणीचा सल्ला: ज्या प्रश्नांची उत्तरे चुकली असतील, त्यांचे स्पष्टीकरण पुन्हा वाचा आणि पाठ्यपुस्तकातून त्या भागाची उजळणी करा.

उत्तरतालिका (Answer Key)

प्रश्न क्र.योग्य पर्यायप्रश्न क्र.योग्य पर्याय
Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now