कर्नाटक शिक्षक भरती 2026 संपूर्ण माहिती

कर्नाटक शिक्षक भरती 2026 – संपूर्ण माहिती

कर्नाटक शिक्षक भरती 2026

नवीन नियम, पात्रता, वयोमर्यादा आणि परीक्षा स्वरूप – संपूर्ण माहिती (GPSTR / HSTR)

1. पार्श्वभूमी आणि अर्ज प्रक्रिया

कर्नाटक सरकारने शालेय शिक्षण विभागातील (सार्वजनिक शिक्षण विभाग) शिक्षकांच्या भरतीसाठी ‘विशेष नियम 2026’ ची अधिसूचना 10 ऑगस्ट 2026 रोजी राजपत्रित केली आहे. या प्रक्रियेसाठी 16 सदस्यांचे ‘परीक्षा प्राधिकरण’ (Exam Authority) स्थापन करण्यात आले असून, आयुक्त (शालेय शिक्षण विभाग) हे याचे अध्यक्ष असतील. भरतीसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवले जातील आणि संपूर्ण राज्यात एकाच वेळी स्पर्धात्मक परीक्षा (CET) घेतली जाईल.

2. वयोमर्यादा (Age Limit)

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे असणे अनिवार्य आहे. कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे असेल:

प्रवर्ग (Category)कमाल वयोमर्यादा
SC, ST, प्रवर्ग-I आणि दिव्यांग (PWD) व्यक्ती45 वर्षे
प्रवर्ग-IIA, प्रवर्ग-IIB, प्रवर्ग-IIIA आणि प्रवर्ग-IIIB43 वर्षे
सामान्य / खुला प्रवर्ग (General)40 वर्षे

3. निवड प्रक्रिया व गुणभारांक (Selection Process & Weightage)

उमेदवारांची निवड ही स्पर्धात्मक परीक्षा (CET), शिक्षक पात्रता परीक्षा (TET), आणि शैक्षणिक पदवी/डिप्लोमा मधील गुणांवर आधारित गुणवत्ता यादीनुसार (Derived Percentage) होईल.

  • प्राथमिक शाळा शिक्षक (इयत्ता 1 ते 5): CET परीक्षा 70%, TET परीक्षा (पेपर-1) 20%, PUC (12वी) 8%, आणि D.El.Ed / D.Ed 2%. (4 वर्षांची B.El.Ed असल्यास: CET 70%, TET 20%, B.El.Ed 10%).
  • पदवीधर प्राथमिक शिक्षक (इयत्ता 6 ते 8): CET परीक्षा 70%, TET परीक्षा (पेपर-2) 20%, पदवी 8%, आणि B.Ed / D.Ed 2%.
  • संगणक विज्ञान शिक्षक (इयत्ता 1 ते 8): CET परीक्षा 85%, आणि संबंधित पदवी 15%.
  • माध्यमिक शाळा (High School) सह-शिक्षक: CET परीक्षा 85%, पदवी 13%, आणि B.Ed 2%.शारीरिक शिक्षण शिक्षक (ग्रेड-I व II): CET परीक्षा 85%, पदवी/PUC 13%, आणि C.P.Ed/B.P.Ed 2%.

4. शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

प्राथमिक शाळा शिक्षक (इयत्ता 1 ते 5):
PUC (12वी) मध्ये किमान 50% गुण (राखीव व दिव्यांग वर्गासाठी 45%) आणि 2 वर्षांचा D.El.Ed/D.Ed डिप्लोमा किंवा 4 वर्षांची B.El.Ed पदवी + TET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
पदवीधर प्राथमिक शाळा शिक्षक (इयत्ता 6 ते 8):
संबंधित विषयात पदवीमध्ये किमान 50% गुण (राखीव वर्गासाठी 45%) आणि B.Ed किंवा 2 वर्षांचा D.Ed + TET परीक्षा उत्तीर्ण.
  • भाषा शिक्षक: पदवीमध्ये संबंधित भाषा ऐच्छिक विषय म्हणून अभ्यासलेली असावी.
  • गणित व विज्ञान: गणितासोबत भौतिकशास्त्र अनिवार्य आणि रसायनशास्त्र/संगणक/इलेक्ट्रॉनिक्स/सांख्यिकी पैकी एक विषय.
  • समाज विज्ञान: इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र पैकी कोणतेही दोन विषय.
संगणक विज्ञान व माध्यमिक शाळा (High School):
– संगणक विज्ञान (1 ते 8) साठी CS/IT मध्ये BE/B.Tech किंवा BCA/B.Sc मध्ये 50% गुण आवश्यक. नोकरी लागल्यास 5 वर्षांच्या आत B.Ed व TET पूर्ण करणे बंधनकारक राहील.
– हायस्कूल सह-शिक्षकांसाठी संबंधित विषयात 50% गुणांसह पदवी आणि B.Ed असणे अनिवार्य.

5. परीक्षा स्वरूप (Exam Pattern)

स्पर्धात्मक परीक्षेमध्ये दोन पेपर असतील आणि दोन्ही पेपर OMR (Objective Type) स्वरूपाचे राहतील. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहे. परीक्षेचे माध्यम कन्नड आणि इंग्रजी असेल.

पेपर-1: सामान्य ज्ञान (100 गुण)

हा पेपर सर्वसाधारणपणे सामायिक असून यात सामान्य ज्ञान, शैक्षणिक मानसशास्त्र, मानसिक क्षमता, भाषा (सामान्य कन्नड आणि इंग्रजी), मूल्य शिक्षण, आरोग्य शिक्षण आणि संगणक साक्षरता या विषयांचा समावेश असेल.

पेपर-2: विषय केंद्रित परीक्षा (100 गुण)

उमेदवाराने निवडलेल्या विषयावर (उदा. भाषा, गणित आणि विज्ञान, समाज विज्ञान, जीवशास्त्र) आधारित 100 गुणांची OMR परीक्षा घेतली जाईल.

टीप: परीक्षा प्राधिकरण परीक्षेच्या किमान 45 दिवस आधी अधिकृत वेबसाइटवर सविस्तर अभ्यासक्रम (Syllabus) जाहीर करेल.

6. कागदपत्र पडताळणी आणि प्रतीक्षा यादी

सुरुवातीला उपलब्ध पदांच्या दुप्पट (1:2) प्रमाणात उमेदवारांची तात्पुरती यादी जाहीर करून कागदपत्र पडताळणी केली जाईल. त्यानंतर 1:1 अंतिम निवड यादी प्रसिद्ध होईल. यासोबतच जास्तीत जास्त 10% उमेदवारांची एक ‘प्रतीक्षा यादी’ (Waitlist) तयार केली जाईल, जी अंतिम यादी जाहीर झाल्यापासून 6 महिन्यांसाठी वैध राहील.

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now