कर्नाटक PUC महाविद्यालयांमध्ये 2026-27 पासून ‘घटक आधारित मूल्यमापन’ (LBA) अनिवार्य: सविस्तर माहिती
कर्नाटक शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने (पदवीपूर्व) नुकतेच एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित पदवीपूर्व (PU) महाविद्यालयांमध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘घटक आधारित मूल्यमापन’ (Lesson Based Assessment – LBA) पद्धत सक्तीची करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे निरंतर मूल्यमापन करणे, प्रत्येक घटकाची सखोल समज तपासणे आणि अंतिम वार्षिक परीक्षेचा निकाल सुधारणे हा या नव्या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
मूल्यमापनाचे स्वरूप आणि उपप्राचार्यांच्या जबाबदाऱ्या
- परीक्षांची संख्या: एका शैक्षणिक वर्षात प्रत्येक विषयासाठी 10 घटक आधारित मूल्यमापन (LBA) चाचण्या घेणे बंधनकारक असेल.
- अभ्यासक्रमाची विभागणी: यासाठी संपूर्ण अभ्यासक्रम 10 घटकांमध्ये विभागला जाईल आणि विभागाकडून मॉडेल प्रश्नपत्रिका दिल्या जातील.
- प्रश्नपत्रिकेचे स्वरूप: प्रत्येक घटक पूर्ण झाल्यावर त्यावर आधारित 30 गुणांची प्रश्नपत्रिका तयार करावी लागेल.
- गुणांची विभागणी: या 30 गुणांमध्ये 10 गुण बहुपर्यायी प्रश्नांसाठी (MCQ) तर 20 गुण वर्णनात्मक उत्तरांच्या प्रश्नांसाठी (Descriptive Answers) असतील.
- प्रश्न पेढीचा (Question Bank) वापर: प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे केवळ शिक्षण विभागाने पुरवलेल्या ‘प्रश्न पेढी’मधूनच घेणे सक्तीचे आहे.
- SATS मध्ये नोंद: परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका तपासून विद्यार्थ्यांचे गुण तात्काळ ‘SATS‘ (Student Achievement Tracking System) प्रणालीत नोंदवावे लागतील.
- AI तंत्रज्ञानाचा वापर: विशेष म्हणजे, PMSHRI पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर IIT धारवाडच्या सहकार्याने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) वापरून LBA उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन केले जाणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य आणि उपनिर्देशकांची भूमिका
- महाविद्यालयात 10 LBA चाचण्या वेळेत पूर्ण होत आहेत आणि प्रश्नपत्रिका योग्य स्वरूपात तयार केल्या जात आहेत, याची प्राचार्यांनी खात्री करावी.
- तपासणीसाठी सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका महाविद्यालयात सुरक्षित ठेवाव्यात.
- चाचणीत कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त (Extra) तासिकांचे आयोजन करावे.
- विद्यार्थ्यांचे गुण आणि ग्रेड्सची माहिती त्यांच्या पालकांना ‘SMS‘ द्वारे स्वयंचलितपणे पोहोचत असल्याची खात्री करावी.
- जिल्हा उपनिर्देशकांनी (DDPUE) महाविद्यालयांना भेटी देऊन अंमलबजावणीची तपासणी करावी.
विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची नोंद
- या ‘घटक आधारित मूल्यमापना’च्या (LBA) गुणांचा आणि विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापन गुणांचा (IA – Internal Assessment) कोणताही संबंध असणार नाही.
- वार्षिक परीक्षेच्या निकालात LBA चे गुण किंवा ग्रेड ग्राह्य धरले जाणार नाहीत.
उपयुक्त शैक्षणिक लिंक्स:
PUC I– मराठी साहित्य मंथन प्रश्नोत्तरे:
पद्य विभागाची संपूर्ण तयारी करण्यासाठी: येथे क्लिक करा
PUC I– मराठी साहित्य मंथन प्रश्नोत्तरे:
गद्य विभागाची संपूर्ण तयारी करण्यासाठी: येथे क्लिक करा
PUC I Sociology IMP Notes:
Chapter 2 Notes |
Chapter 1 Notes


