कर्नाटक राज्य अभ्यासक्रम
इयत्ता – 7वी
विषय – विज्ञान
भाग – 1
नमूना प्रश्नोत्तरे
प्रकरण 5 – भौतिक आणि रासायनिक बदल
पाठाची सोपी माहिती
आपल्या सभोवतालच्या परिसरात आपण दररोज अनेक प्रकारचे बदल झालेले पाहतो. सामान्यपणे या बदलांचे दोन प्रकार आहेत: भौतिक आणि रासायनिक बदल.
1. भौतिक बदल
पदार्थाचा आकार, आकारमान, रंग, अवस्था यासारख्या गुणधर्मांना पदार्थाचे भौतिक गुणधर्म म्हणतात. पदार्थांच्या भौतिक गुणधर्मात झालेल्या बदलास भौतिक बदल असे म्हणतात. भौतिक बदल हे तात्पुरत्या स्वरुपाचे असतात आणि त्यापासून आपण त्या पदार्थाला पुन्हा मूळ स्वरुपात बदलू शकतो. अशा बदलातून कोणतेही नवीन पदार्थ निर्माण होत नाहीत.
2. रासायनिक बदल
ज्या बदलामुळे एक अथवा अनेक नवीन पदार्थ तयार होतात, अशा प्रकारच्या बदलाला रासायनिक बदल असे म्हणतात. या बदलाला रासायनिक क्रिया असेही म्हणतात. आपल्या दैनंदिन जीवनात रासायनिक बदलांना महत्व आहे आणि सर्व प्रकारचे नवीन पदार्थ जे तयार होतात ते या रासायनिक बदलामुळेच तयार होतात. उदाहरणार्थ, अन्नाचे पचन, फळांचे पिकणे आणि द्राक्षाच्या रसाचे आंबवणे.
3. लोखंडाचे गंजणे
लोखंडाचा एक तुकडा काही दिवसासाठी उघड्यावर ठेवला तर त्यावर लालसर पिवळ्या रंगाची राख जमा झालेली दिसते, या राखेला गंज असे म्हणतात आणि या प्रक्रियेला गंजणे असे म्हणतात. गंजण्याच्या क्रियेमध्ये ऑक्सिजन आणि पाणी असणे आवश्यक आहे. गंजणे रोखण्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे वस्तूंना रंग लावणे किंवा ग्रीस लावणे. गंजण्याच्या क्रियेवरील आणखी एक उपाय म्हणजे क्रोमीयम किंवा झींक यासारख्या धातुंचा लोखंडी वस्तूवर मुलामा देणे, या क्रियेलाच विलेपन (galvanisation) असे म्हणतात.
4. स्फटीकीभवन
शुद्ध पदार्थांचे मोठ्या आकारातील स्फटीक त्यांच्या द्रावणापासून मिळविले जातात, या क्रियेलाच स्फटीकीभवन म्हणतात. हे एक भौतिक बदलाचे उदाहरण आहे.
स्वाध्याय आणि उत्तरे
प्रश्न 1. खालील बदलांचे भौतिक आणि रासायनिक बदलात वर्गीकरण करा.
(a) प्रकाश संश्लेषण: रासायनिक बदल
(b) पाण्यात साखर विरघळवणे: भौतिक बदल
(c) कोळसा जाळणे: रासायनिक बदल
(d) मेण वितळणे: भौतिक बदल
(e) अॅल्युमिनीयम बडवून पातळ पत्रा बनविणे: भौतिक बदल
(f) अन्नाचे पचन: रासायनिक बदल
प्रश्न 2. खालील विधाने बरोबर की चूक ओळखा आणि चुकीची विधाने दुरुस्त करुन लिहा.
(a) लाकडाचा ओंडका कापून त्याचे तुकडे करणे हा रासायनिक बदल आहे.उत्तर: चूक. लाकडाचे तुकडे करणे हा भौतिक बदल आहे कारण नवीन पदार्थ तयार होत नाही.
(b) पानांपासून सेंद्रीय खत बनविणे हा भौतिक बदल आहे.उत्तर: चूक. हा रासायनिक बदल आहे कारण खत हा एक नवीन पदार्थ तयार होतो.
(c) झिंकचा मुलामा दिलेले लोखंडी पाईप सहज गंजत नाहीत.उत्तर: बरोबर.
(d) लोखंड आणि गंजलेली राख हे दोन्ही पदार्थ एकच आहेत.उत्तर: चूक. गंजलेली राख म्हणजे लोखंड नव्हे, हा एक वेगळा पदार्थ आहे जो लोखंडावर जमा होतो.
(e) वाफेचे द्रवीभवन हा रासायनिक बदल नाही.उत्तर: बरोबर. पाण्याच्या अवस्थेत बदल होणे हा भौतिक बदल आहे.
प्रश्न 3. खालील वाक्यामधील रिकाम्या जागा भरा.
(a) चुन्याच्या निवळीतून कार्बन डायऑक्साईड जाऊ दिल्यास निवळी पांढरीशुभ्र कॅल्शियम कार्बोनेट मुळे होते.
(b) बेकींग सोड्याचे रासायनिक नाव सोडीयम हैड्रोजन कार्बोनेट आहे.
(c) लोखंडाचे गंजणे टाळण्याचे दोन उपाय रंग देणे आणि विलेपन हे आहेत.
(d) पदार्थांच्या भौतिक गुणधर्मात बदल झाल्यास त्या बदलाला भौतिक बदल म्हणतात.
(e) ज्या बदलामुळे नवीन पदार्थाची निर्मिती होते त्याला रासायनिक बदल म्हणतात.
(b) पाण्यात साखर विरघळवणे
(c) कोळसा जाळणे
(d) मेण वितळणे
(e) अॅल्युमिनीयम बडवून पातळ पत्रा बनविणे
(f) अन्नाचे पचन
उत्तर पहा
(a) प्रकाश संश्लेषण: रासायनिक बदल
(b) पाण्यात साखर विरघळवणे: भौतिक बदल
(c) कोळसा जाळणे: रासायनिक बदल
(d) मेण वितळणे: भौतिक बदल
(e) अॅल्युमिनीयम बडवून पातळ पत्रा बनविणे: भौतिक बदल
(f) अन्नाचे पचन: रासायनिक बदल
(b) पानांपासून सेंद्रीय खत बनविणे हा भौतिक बदल आहे.
(c) झिंकचा मुलामा दिलेले लोखंडी पाईप सहज गंजत नाहीत.
(d) लोखंड आणि गंजलेली राख हे दोन्ही पदार्थ एकच आहेत.
(e) वाफेचे द्रवीभवन हा रासायनिक बदल नाही.
उत्तर पहा
(a) चूक. दुरुस्त विधान: लाकडाचा ओंडका कापून त्याचे तुकडे करणे हा भौतिक बदल आहे.
(b) चूक. दुरुस्त विधान: पानांपासून सेंद्रीय खत बनविणे हा रासायनिक बदल आहे.
(c) बरोबर.
(d) चूक. दुरुस्त विधान: लोखंड आणि गंजलेली राख हे दोन्ही वेगळे पदार्थ आहेत.
(e) बरोबर.
उत्तर पहा
(a) चुन्याच्या निवळीतून कार्बन डायऑक्साईड जाऊ दिल्यास निवळी पांढरीशुभ्र कॅल्शियम कार्बोनेट मुळे होते.
(b) बेकींग सोड्याचे रासायनिक नाव सोडीयम हैड्रोजन कार्बोनेट आहे.
(c) लोखंडाचे गंजणे टाळण्याचे दोन उपाय रंग लावणे आणि विलेपन करणे (किंवा ग्रीस लावणे) हे आहेत.
(d) पदार्थांच्या भौतिक गुणधर्मात बदल झाल्यास त्या बदलाला भौतिक बदल म्हणतात.
(e) ज्या बदलामुळे नवीन पदार्थाची निर्मिती होते त्याला रासायनिक बदल म्हणतात.
उत्तर पहा
बेकींग सोडा लिंबूरसात मिसळल्यास कार्बन डायऑक्साईड वायू बुडबुड्यांच्या स्वरुपात बाहेर पडतो. या क्रियेत नवीन पदार्थ तयार होतात, म्हणून हा रासायनिक बदल आहे.
उत्तर पहा
मेणबत्ती जळताना मेण वितळते, हा भौतिक बदल आहे कारण यात कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. मेणबत्ती जळताना उष्णता आणि प्रकाश निर्माण होतो, हा रासायनिक बदल आहे.
दुसरे उदाहरण: स्वयंपाकाचा गॅस (LPG). गॅस सिलिंडरमधून बाहेर येऊन त्याचे वायूत रुपांतर होणे हा भौतिक बदल आहे. त्यानंतर गॅस जळणे हा रासायनिक बदल आहे.
उत्तर पहा
दुधाचे दही बनविणे हा एक बदल आहे. या बदलामध्ये दुधापासून दही हा एक नवीन पदार्थ तयार होतो आणि दह्यापासून पुन्हा मूळ स्वरुपातील दूध मिळवता येत नाही. ज्या बदलामुळे नवीन पदार्थ तयार होतात त्याला रासायनिक बदल म्हणतात, म्हणून दुधाचे दही होणे हा रासायनिक बदल आहे.
उत्तर पहा
लाकडाचे जळणे हा रासायनिक बदल आहे कारण जळताना उष्णता निर्माण होते आणि राख हा नवीन पदार्थ तयार होतो. याउलट, लाकूड कापून तुकडे करणे हा भौतिक बदल आहे कारण यामध्ये लाकडाच्या आकारात बदल होतो परंतु कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही.
उत्तर पहा
एका चंचूपात्रात 1 कप पाणी घेऊन त्यात सौम्य सल्फ्युरिक आम्लाचे काही थेंब टाका. पाण्याला उष्णता द्या आणि पाणी उकळायला लागल्यावर त्यात कॉपरसल्फेट पावडर हळूहळू घालत ढवळत रहा. जोपर्यंत पावडर पाण्यात विरघळणे थांबत नाही तोपर्यंत घालत रहा. हे द्रावण गाळून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवा, द्रावण थंड होताना हलवू नका. थोड्या वेळाने कॉपर सल्फेटचे स्फटिक तयार झालेले दिसतील.
उत्तर पहा
लोखंडाला गंजण्याच्या क्रियेसाठी ऑक्सिजन आणि पाणी आवश्यक असते. लोखंडी वस्तूंना रंग लावल्यामुळे लोखंडाचा हवा (ऑक्सिजन) आणि पाण्याशी येणारा थेट संपर्क रोखला जातो. यामुळे लोखंडाचे गंजणे थांबते आणि वस्तू सुरक्षित राहते.
उत्तर पहा
गंजण्याच्या क्रियेसाठी ऑक्सिजन आणि पाणी आवश्यक असते आणि हवेत पाण्याची वाफ जास्त असल्यास गंजण्याची क्रिया जलद होते. समुद्र किनारपट्टी जवळील हवेत दमटपणा (पाण्याची वाफ) जास्त असतो आणि समुद्राच्या पाण्यात अनेक क्षार विरघळलेले असतात. हे क्षारयुक्त पाणी गंजण्याच्या क्रियेचा वेग वाढविते, त्यामुळे वाळवंटी प्रदेशापेक्षा समुद्रकिनारी लोखंड जलद गंजते.
(i) A ही क्रिया रासायनिक बदल आहे.
(ii) B ही क्रिया रासायनिक बदल आहे.
(iii) A व B दोन्ही क्रिया रासायनिक बदल आहेत.
(iv) यापैकी कोणतीही क्रिया रासायनिक बदल नाही.
उत्तर पहा
अचूक विधान: (ii) B ही क्रिया रासायनिक बदल आहे.
(i) A ही क्रिया रासायनिक बदल आहे.
(ii) B ही क्रिया रासायनिक बदल दर्शविते.
(iii) A व B या दोन्ही क्रिया रासायनिक बदल आहेत.
(iv) यापैकी कोणतीही क्रिया रासायनिक बदल नाहीत.
उत्तर पहा
अचूक विधान: (iii) A व B या दोन्ही क्रिया रासायनिक बदल आहेत.
LBA नमूना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 7 वी | विषय – मराठी | गुण – 20 लेखी
- पाठ 1. सर्वात्मका शिवसुंदरा (कविता) आणि पाठ 2. अभ्यास एक छंद
येथे क्लिक करा (https://tinyurl.com/4arp4zu9) - पाठ 3. माझी आई आणि पाठ 4. जिंकू आम्ही लढाई
येथे क्लिक करा (https://tinyurl.com/mr5y2jx5) - पाठ 5. आमचा राष्ट्रीय खेळ – हॉकी आणि पाठ 6. डॉ C.V.रामन
येथे क्लिक करा (https://tinyurl.com/uxhv59wm) - पाठ 7. आठवणींचे गाव आणि पाठ 8. परोपकाराचे फळ
येथे क्लिक करा (https://tinyurl.com/2zh57452) - पाठ 9. आम्ही टिकलो तर तुम्ही टिकाल आणि पाठ 10. वाच पुस्तके
येथे क्लिक करा (https://tinyurl.com/2jzryds6)



