इयत्ता 7वी विज्ञान प्रकरण 6 – सजीवातील श्वसन

कर्नाटक राज्य अभ्यासक्रम

इयत्ता – 7वी

विषय – विज्ञान

भाग – 1

नमूना प्रश्नोत्तरे

प्रकरण 6 – सजीवातील श्वसन

पाठाची सोपी माहिती

सर्व सजीव आहारापासून ऊर्जा मिळविण्यासाठी श्वसन करतात. श्वसनात आपण ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो.

ऑक्सिजनचा वापर करुन जेव्हा आहाराचे विघटन होते तेव्हा त्याला सानिल श्वसन (aerobic respiration) म्हणतात. ऑक्सिजन नसताना जेव्हा आहाराचे विघटन होते तेव्हा त्याला अनानिल श्वसन (anaerobic respiration) म्हणतात.

मानवाच्या छातीच्या पोकळ भागात फुप्फुसे असतात. श्वास घेताना बरगड्या वर येतात आणि श्वासपटल खाली सरकते.

इतर प्राण्यांमध्ये श्वसनाचे अवयव वेगवेगळे असतात. झुरळ श्वासरंध्रातून श्वसन करतात. गांडूळ त्वचेद्वारे श्वसन करतात. मासे कल्ल्यांवाटे (gills) श्वसन करतात. वनस्पतीची पाने पर्णरंध्रातून आणि मुळे मातीतील हवेतून श्वसन करतात.

स्वाध्याय आणि उत्तरे

प्रश्न 1. कोणताही धावपटू धावण्याची स्पर्धा संपल्यानंतर श्वसन खोलवर आणि वेगाने का करतो?

उत्तर: धावताना किंवा जास्त शारीरिक कष्ट करताना शरीराला अतिरिक्त उर्जेची गरज असते. वेगाने आणि खोलवर श्वास घेतल्याने पेशींना जास्त प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे अन्नाचे विघटन होण्याचा वेग वाढतो आणि जास्त ऊर्जा मुक्त होते.

प्रश्न 2. सानिल श्वसन आणि अनानिल श्वसन यातील साम्य आणि फरकांची यादी करा.

उत्तर:

  • साम्य: दोन्ही प्रकारच्या श्वसनात आहाराचे (ग्लुकोजचे) विघटन होते आणि शरीरासाठी ऊर्जा मुक्त होते.
  • फरक: सानिल श्वसन हे ऑक्सिजनचा वापर करुन होते. अनानिल श्वसन हे ऑक्सिजन नसताना (ऑक्सिजनचा वापर न करता) होते.

प्रश्न 3. जेव्हा आपण धुळयुक्त हवेत श्वास घेतो त्यावेळी आम्हाला शिंका का येतात?

उत्तर: हवेतील धूळ आणि सुक्ष्मकण श्वास घेताना नाकपुडीतील केसात न अडकता श्वासनलिकेत जातात. त्यामुळे त्या पोकळीत खवखवते व आम्हाला शिंका येतात. शिंकल्यामुळे अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात आणि स्वच्छ हवा शरीरात जाते.

प्रश्न 4. तीन परिक्षानळ्या घ्या. A परिक्षानळीत एक गोगलगाय घाला. B परिक्षानळीत पान-वनस्पती आणि C परिक्षानळीत गोगलगाय व पान-वनस्पती दोन्ही घाला. यातील कोणत्या परिक्षानळीत कार्बन डायऑक्साईडचे एकत्रीकरण सर्वात जास्त झाले असेल?

उत्तर: परिक्षानळी ‘A’ मध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सर्वात जास्त असेल. कारण परिक्षानळी ‘A’ मधील गोगलगाय श्वासोच्छ्वास करते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडते. परिक्षानळी ‘B’ आणि ‘C’ मधील वनस्पती प्रकाशसंश्लेषण क्रियेसाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात.

प्रश्न 5. योग्य उत्तर ओळखून लिहा:

(a) झुरळाच्या शरीरामध्ये हवेचा प्रवेश त्याच्या ______

उत्तर: (iii) श्वासरंध्रातून होतो

(b) जास्त व्यायाम करत असताना आपल्या पायामध्ये ज्या पदार्थाचा संग्रह झाल्यामुळे आकड येते तो आहे ______

उत्तर: (ii) लॅक्टीक आम्ल

(c) सामान्यपणे प्रौढ व्यक्ती विश्रांती घेत असताना त्याचा श्वसन दर प्रत्येक मिनिटाला ______

उत्तर: (ii) 15-18

(d) उच्छ्वासाच्या वेळी बरगड्या ______

उत्तर: (iii) खाली येतात

प्रश्न 6. स्तंभ I मधील घटकांची स्तंभ II मधील संबंधीत घटकांशी जोड्या जुळवा.

स्तंभ – Iस्तंभ – II (उत्तरे)
(a) यीस्ट(iii) अल्कोहोल
(b) श्वासपटल(iv) छातीची पोकळी
(c) त्वचा(i) गांडूळ
(d) पाने(v) पर्णरंध्र
(e) मासा(ii) कल्ले
(f) बेडूक(vi) फुप्फुस आणि त्वचा

प्रश्न 7. खाली दिलेली विधाने ‘बरोबर’ की ‘चूक’ ते ओळखा.

  • (a) जास्त व्यायाम केल्याने माणसाचा श्वसन दर कमी होतो. उत्तर: चूक
  • (b) वनस्पतीमध्ये प्रकाशसंश्लेषण क्रिया फक्त दिवसा होते आणि श्वसनक्रिया फक्त रात्री होते. उत्तर: चूक
  • (c) बेडूक त्वचेवाटे तसेच फुप्फुसावाटे ही श्वसन करतात. उत्तर: बरोबर
  • (d) श्वसन करण्यासाठी माश्यामध्ये फुप्फुसे असतात. उत्तर: चूक
  • (e) श्वास आत घेतल्यानंतर छातीच्या पोकळीचा आकार वाढतो. उत्तर: बरोबर

प्रश्न 9. गिर्यारोहक गिर्यारोहन करताना आपल्या सोबत ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जातात, कारण…

उत्तर: (b) तिथे उपलब्ध होणारे हवेचे प्रमाण हे जमिनीवरील हवेच्या प्रमाणापेक्षा कमी आहे.

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now