प्रजासत्ताक दिन: छोटे आणि प्रभावी भाषण

प्रजासत्ताक दिन: छोटे आणि प्रभावी भाषण

आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो,

सर्वात आधी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

आज 26 जानेवारी! हा दिवस आपल्या भारताचा मोठा सण आहे. आजच्याच दिवशी आपल्या देशाला ‘संविधान’ मिळाले आणि आपला भारत देश एक बलवान लोकशाही राष्ट्र बनला. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगतसिंग, महात्मा गांधी, आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या अनेक वीरांनी खूप संघर्ष केला. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण अभिमानाने हा तिरंगा फडकवत आहोत.

“ना धर्मासाठी, ना जातीसाठी,
जगूया फक्त माझ्या मातीसाठी!”
मित्रांनो, आपण छोटे असलो तरी या देशाचे भविष्य आहोत. वेळेवर शाळेत जाणे, अभ्यास करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे हीच आपली खरी देशसेवा आहे. चला तर मग, आज आपण प्रतिज्ञा करूया की, आपण एक चांगले नागरिक बनू आणि आपल्या भारताचे नाव जगात मोठे करू!

जाता जाता एवढेच म्हणेन-

“लहरेंगा अब तिरंगा सारे आसमान पर,
भारत का ही नाम होगा सबकी जुबान पर!”

‘भारत माता की जय!’
‘वंदे मातरम!’
Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now