प्रजासत्ताक दिन: घोषवाक्ये आणि चारोळ्या (Slogans on Republic Day)

प्रजासत्ताक दिन: घोषवाक्ये आणि चारोळ्या (Slogans on Republic Day)

1. प्रस्तावना आणि देशप्रेमासाठी (For Introduction)
“तिरंग्याच्या सावलीत जगतो आम्ही, या मातीचं रिण कधी फेडता येत नाही,
26 जानेवारीला मान झुकवतो आम्ही, या देशासाठी जगणं हेच आमचं जीवन.”
“प्रजासत्ताक दिन उजळतो अभिमानाने, संविधान सांगते मानवी हक्क प्रेमाने.
वीरांच्या कर्तृत्वाचा प्रकाश झळकतो, भारताचा ध्वज उंच फडकतो.”
26 जानेवारीची ही पहाट उजाडली, प्रत्येक हृदयात भारतीयता दाटली.
वीरांच्या त्यागाचा सन्मान करू, प्रजासत्ताक दिन साजरा अभिमानानं करू.”
2. तिरंगा आणि ध्वजारोहणासाठी (For Flag Hoisting)
“केशरी म्हणजे त्याग आणि शौर्य, पांढरा म्हणजे शांती आणि सत्य.
हिरवा म्हणजे समृद्धी आणि आशा, हा तिरंगा आहे आमची परंपरा.”
“तिरंगा माझी शान आहे, तिरंगा माझी आन आहे, या ध्वजासाठी जगेन मरेन, हेच माझं अभिमान आहे.
तिरंगा जेव्हा वाऱ्यावर डोलतो, मनाला वेगळाच आनंद होतो, या देशात जन्मलो म्हणून, रोज देवाचे आभार मानतो.”
“जय हिंद म्हणताना रक्त उसळतं, वंदे मातरम गाताना मन भरून येतं.
या देशावर जीव ओवाळतो, भारत माझा स्वर्ग वाटतं.”
3. संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी (For Constitution)
“संविधानाने दिले अधिकार, आंबेडकरांचे उपकार अपार.
लोकशाहीचा हा सुंदर देश, भारत माझा सर्वश्रेष्ठ.”
“वीरांच्या रक्ताने जिंकला हा हक्क, संविधानाने दिला स्वातंत्र्याचा बोध स्पष्ट.
प्रजासत्ताक दिन उजळतो आनंदानं, तिरंगा फडकतो नभात अभिमानानं.”
“समता बंधुता स्वातंत्र्य, संविधानाने दिलं सगळं,
या देशात जगण्याचं, सुंदर स्वप्न साकारलं.”
4. सैनिकांच्या सन्मानार्थ (Tribute to Soldiers)
“सीमेवर उभे आहेत जवान, त्यांच्यामुळे सुरक्षित प्राण.
त्यांना सलाम करतो आज, ते आहेत देशाचा मान.”
“ना सर झुकला आहे कधी, आणि ना झुकवू कधी,
जे आपल्या हिंमतीवर जगले, खरे तर तीच जिंदगी आहे.”
5. दीप प्रज्वलन आणि आभार प्रदर्शनासाठी (Lamp Lighting & Vote of Thanks)
दीप प्रज्वलन: “अंधाराला चिरत जावी प्रकाशाची ही ज्योत, ज्ञानाने उजळून निघावी मनामनाची ही वात.”
आभार प्रदर्शन: “आभाराचा भार कशाला, गळा फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये घर असावे, त्या हृदयाला दार कशाला.”
6. एकात्मतेसाठी (Unity)
“विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे भारत देश महान.
उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात, देशभक्ती देशप्रेम संचारले आज रोमारोमात.”
Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now