प्रजासत्ताक दिन भाषण
सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आज आपण भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. 26 जानेवारी 1950 हा तो ऐतिहासिक दिवस, ज्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले भारतीय संविधान अमलात आले आणि भारताने खऱ्या अर्थाने लोकशाहीचा स्वीकार केला.
या स्वातंत्र्यासाठी आणि लोकशाहीसाठी महात्मा गांधी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल आणि अशा हजारो ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. आज या मंचावरून मी त्या सर्व वीर आत्म्यांना विनम्र अभिवादन करतो.
आपण केवळ मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात न रमता, सामाजिक प्रश्नांची जाण ठेवली पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त भारत, स्वच्छ भारत आणि सुशिक्षित भारत घडवणे ही आजची गरज आहे.
चला तर मग, आज आपण शपथ घेऊया की, आपण आपल्या संविधानातील मूल्यांचे रक्षण करू, पर्यावरणाचे रक्षण करू आणि आपल्या कर्तव्यातून भारताला जगातील महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करू.




