LBA 6th विज्ञान नमुना प्रश्नपत्रिका पाठ 9 – दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या घटकांचे विभाजन

CLASS – 6

MEDIUM – MARATHI

SUBJECT – Science

SYLLABUS – KARNATAKA STATE 

MODEL QUESTION PAPER OF LESSON BASED ASSESSMENT

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 6वी | विषय – विज्ञान | **गुण: 20**
पाठ 9-दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या घटकांचे विभाजन.

प्रश्नपत्रिकेचा आराखडा (Blueprint)

उद्देशशेकडा (%)गुण (Marks)काठिण्य पातळी (Difficulty)शेकडा (%)गुण (Marks)
**ज्ञान (Remembering)**25%6 (लक्ष्य 5)**सुलभ (Easy)**30%6
**आकलन (Understanding)**30%6**साधारण (Average)**50%10
**उपयोजन (Application)**25%4 (लक्ष्य 5)**कठीण (Difficult)**20%4
**कौशल्य (Skill)**20%4**एकूण**100%20

अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes)

  • मिश्रणाचा अर्थ आणि मिश्रणापासून पदार्थ वेगळे करण्याचे उद्दिष्टे स्पष्ट करतात.
  • पदार्थ वेगळे करण्याच्या विविध पद्धती आणि त्यांचे उपयोग यांचे वर्णन करतात.
Q.1 योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. 4 Marks
  1. पदार्थाचे विभाजन करण्यासाठी मिश्रणास कोणत्या स्थितीत असणे आवश्यक आहे?
    A. घन
    B. द्रव्य
    C. वायू
    D. वरील सर्व
  2. मिश्रणातून घटक द्रव्य वेगळे करण्याचा योग्य पर्याय कोणता आहे?
    A. अशुद्ध किंवा हानिकारक घटक काढून टाकण्यासाठी
    B. निरोपयोगी घटक काढून टाकण्यासाठी.
    C. उपयुक्त घटक वेगळे करण्यासाठी.
    D. वरील सर्व
  3. सतीशने पाहिले की त्याची आई चहा गाळण्यासाठी गाळणीचा वापर करते. या कृती मागचा हेतू काय?
    A. हानिकारक घटक वेगळे करण्यासाठी
    B. दोन उपयोगी घटक वेगळे करण्यासाठी
    C. निरोपयोगी घटक वेगळे करण्यासाठी.
    D. विषारी घटक वेगळे करण्यासाठी.
  4. मिश्रणातील घटक द्रव्यांचे विभाजन यासंबंधी योग्य विधान ओळखा.
    विधान 1 : आपण मिश्रणातील निरुपयोगी घटक टाकून देतो.
    विधान 2 : आपण मिश्रणातील उपयोगी घटक वापरतो.
    A. फक्त विधान 1 बरोबर आहे.
    B. फक्त विधान 2 बरोबर आहे.
    C. दोन्ही विधान बरोबर आहेत.
    D. दोन्ही विधान चुकीची आहेत.
Q.2 योग्य शब्दाने रिकाम्या जागा भरा. 2 Marks
  1. पाणी आणि तेल यांचे मिश्रण वेगळे करण्याची योग्य पद्धत \_\_\_\_\_\_\_ आहे.
  2. दह्यापासून लोणी काढण्यासाठी वापरली जाणारी \_\_\_\_\_\_\_ पद्धत आहे.
Q.3 जोड्या जुळवा. 4 Marks
गट ‘अ’गट ‘ब’
1. द्रवीभवनA. द्रवाचे वायूमध्ये रूपांतरण होणे.
2. बाष्पीभवनB. एका विशिष्ट तापमानावर दिलेल्या द्रावणात जास्तीत जास्त विरघळलेला पदार्थ.
3. गाळण्याची प्रक्रियाC. मिश्रणातील दोन भिन्न घटक वेगळे करण्यासाठी गाळणीचा उपयोग करणे.
4. संपृक्त द्रावणD. घन पदार्थाचे द्रव अवस्थेत रूपांतरण होणे.
Q.4 दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. 4 Marks
  1. धान्यांना **वारा देणे** म्हणजे काय करणे?
  2. शेतातील धान्य गवतापासून वेगळे करणे या पद्धतीला काय म्हणतात? व ते का करतात?
Q.5 दीर्घोत्तरी प्रश्न. 4 Marks
  1. धान्याचे दाणे हे पेंढ्यापासून वेगळ्या करणे आणि धान्यातील कोंडा-टरफले वेगळे करणे, या दोन्ही पद्धतींतील फरक स्पष्ट करा.
Q.6 एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 Marks
  1. तांदळातील दगड वेगळे करण्याचा हेतू काय आहे?
  2. डाळी किंवा धान्य स्वयंपाकापूर्वी धूळ व टरफले वेगळे कसे करतात?
**Total Marks: 20**
Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now