
LBA Update Date – 14.08.2025
- पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वी साठी 20 गुण विचारात घ्यावे.
- भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक धडा आणि एक कविता विचारात घ्यावी.
- इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक धडा-आधारित मूल्यमापन करावे.
- इयत्ता 1 ते 5 वीच्या धडा-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- इयत्ता 8 ते 10 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील बहुपर्यायी आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- ‘मुरुसिंचन’ कार्यक्रम राबवणाऱ्या जिल्ह्यांनी इयत्ता 6 ते 10 वीसाठी हिंदी भाषा वगळता 15 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील आणि 05 गुणांसाठी ‘मुरुसिंचन’ कार्यक्रमातील प्रश्नांचा विचार करून एकूण 20 गुणांसाठी लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- पाठ-आधारित मूल्यमापन प्रश्न बँकेचा वापर शिकण्याच्या आणि मूल्यमापनाच्या प्रक्रियांमध्ये सतत करून विद्यार्थ्यांनी उत्तम शैक्षणिक प्रगती साधावी यासाठी कार्यवाही करावी.
इयत्ता – 9
विषय – मराठी
गुण – 20
गद्य 1 – गुराख्याचे नेत्रपतन | पद्य 1 – अभंग त्रिदल
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 9वी
विषय – मराठी
गुण – 20
गद्य 1 – गुराख्याचे नेत्रपतन | पद्य 1 – अभंग त्रिदल
प्रश्नपत्रिकेची ब्लूप्रिंट (Question Paper Blueprint)
| उद्दिष्टानुसार प्रामुख्यता | गुण विभागणी | कठीण पातळीनुसार | गुण विभागणी |
|---|---|---|---|
| स्मरण (Knowledge) | 8 गुण (40%) | सोपे (Easy) | 14 गुण (70%) |
| आकलन (Understanding) | 7 गुण (35%) | मध्यम (Average) | 5 गुण (25%) |
| अभिव्यक्ती (Expression) | 5 गुण (25%) | कठीण (Difficult) | 1 गुण (5%) |
| एकूण (Total) | 20 गुण (100%) | एकूण (Total) | 20 गुण (100%) |
प्रश्न विभाग (20 Marks)
प्रश्न 1. खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा. (MCQ) (1 x 4 = 4 Marks)
- महानुभाव पंथाचे संस्थापक असे….. यांना म्हटले जाते.
- अ) चक्रधर स्वामी
- ब) भटोबास
- क) केसोबास
- ड) गोविंद प्रभू
- गुराख्याचे नेत्रपतन या पाठाचे मूल्य हे आहे.
- अ) निष्ठा, प्रेम
- ब) दया, प्रेम
- क) कर्तव्य, कष्ट
- ड) ध्येय, कर्तव्य
- गोरा कुंभार यांचा जन्म या गावी झाला.
- अ) आळंदी
- ब) कोल्हापूर
- क) तेर
- ड) पंढरपुर
- संत गोरा कुंभार यांना या नावाने हाक मारत असत.
- अ) पाटील काका
- ब) गोरोबाकाका
- क) संतकाका
- ड) कुंभारकाका
प्रश्न 2. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. (1 x 8 = 8 Marks)
- गुराख्याचे नेत्रपतन या पाठातून आपण काय शिकलो?
- श्री चक्रधर स्वामी कोठे बसले होते?
- गुराख्याने कोणता अपराध केला होता?
- लीळाचरित्र ग्रंथात कोणाच्या आठवणी आहेत?
- संत गोरा कुंभारांनी साखरेचे उदाहरण का दिले आहे?
- संत मुक्ताबाईनी सतांची कोणती लक्षणे सांगितली आहेत?
- परमेश्वराचे नाव कसे घ्यावे?
- मुक्ताबाईच्या भावंडांची नावे सांगा.
प्रश्न 3. खालील प्रश्नांची दोन/तीन वाक्यात उत्तरे लिहा. (2 x 3 = 6 Marks)
- श्री चक्रधरांनी गुराख्याला पकडण्याचा प्रयत्न का केला?
- श्री चक्रधरांनी गुराख्याला धडा शिकविण्यासाठी काय केले?
- संत मुक्ताबाईनी संतांच्या सद्गुणांचे वर्णन कसे केले आहे?
प्रश्न 4. खालील वाक्ये प्रमाण मराठी भाषेत लिहा. (1 x 2 = 2 Marks)
- डोळा निकाळ झाला.
- गोसावी चडकणा हाणौणि त्याचा डोळा खालि पाडीला.




