LBA Update Date – 14.08.2025
- पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वी साठी 20 गुण विचारात घ्यावे.
- भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक धडा आणि एक कविता विचारात घ्यावी.
- इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक धडा-आधारित मूल्यमापन करावे.
- इयत्ता 1 ते 5 वीच्या धडा-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- इयत्ता 8 ते 10 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील बहुपर्यायी आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- ‘मुरुसिंचन’ कार्यक्रम राबवणाऱ्या जिल्ह्यांनी इयत्ता 6 ते 10 वीसाठी हिंदी भाषा वगळता 15 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील आणि 05 गुणांसाठी ‘मुरुसिंचन’ कार्यक्रमातील प्रश्नांचा विचार करून एकूण 20 गुणांसाठी लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- पाठ-आधारित मूल्यमापन प्रश्न बँकेचा वापर शिकण्याच्या आणि मूल्यमापनाच्या प्रक्रियांमध्ये सतत करून विद्यार्थ्यांनी उत्तम शैक्षणिक प्रगती साधावी यासाठी कार्यवाही करावी.
इयत्ता – 10वी
विषय – मराठी
गुण – 20
गद्य 5 – मनाचे पिंजरे
पद्य 5 – गाऊ त्यांना आरती
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 10वी
विषय – मराठी
गुण – 20
गद्य 5 – मनाचे पिंजरे | पद्य 5 – गाऊ त्यांना आरती
प्रश्नपत्रिकेची ब्लूप्रिंट (Question Paper Blueprint)
| उद्दिष्टानुसार प्रामुख्यता | गुण विभागणी | कठीण पातळीनुसार | गुण विभागणी |
|---|---|---|---|
| स्मरण (Knowledge) | 10 गुण (50%) | सोपे (Easy) | 14 गुण (70%) |
| आकलन (Understanding) | 7 गुण (35%) | मध्यम (Average) | 5 गुण (25%) |
| अभिव्यक्ती (Expression) | 3 गुण (15%) | कठीण (Difficult) | 1 गुण (5%) |
| एकूण (Total) | 20 गुण (100%) | एकूण (Total) | 20 गुण (100%) |
प्रश्न विभाग (20 Marks)
प्रश्न 1. खालील दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर निवडा. (MCQ) (1 x 4 = 4 Marks)
- ‘सफल’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.
- अ. बरोबर
- ब. चूक
- क. असफल
- ड. यापैकी नाही
- दिनकर यांचा काव्यसंग्रह हा आहे?
- a) जय मंगला
- b) यशोधन
- c) बंदी शाळा
- d) छत्रपती शिवराय
- कोणत्या विभक्तीला प्रत्यय नाहीत.
- अ. द्वितीया
- ब. प्रथम
- क. सप्तमी
- ड. चतुर्थी
- कवी दिनकर कोणत्या संस्थानाचे कवी होते?
- a) बडोदा
- b) मराठा
- c) भोसले
- d) निंबाळकर
प्रश्न 2. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. (1 x 8 = 8 Marks)
- लेखकाने पावसाळ्याच्या सुरुवातीला किती रुपयाला छत्री विकत घेतली?
- पावसाळा अदमासे किती दिवस चालतो?
- बडोदा संस्थानाचे राज्य कवी कोण?
- महाराष्ट्र कवी म्हणून कोणाला संबोधले जाते?
- मनाचे पिंजरे या पाठाचे मूल्य कोणते?
- गाऊ त्यांना आरती या कवितेचे मूल्य सांगा?
- देशभक्तांचा धर्म कोणता?
- संभ्रम कोण झाले होते?
प्रश्न 3. खालील प्रश्नांची उत्तरे दोन/तीन वाक्यात लिहा. (2 x 3 = 6 Marks)
- दुकानदाराला आश्चर्य का वाटले?
- समाजसेवक कोणत्या भावनेने सेवा करतो?
- कवीने शेवटी कोणती इच्छा व्यक्त केली?
प्रश्न 4. खालीलपैकी एका विषयावर कल्पनाविस्तार करा. (2 Marks)
- अंधश्रद्धा एक शाप.





