पाठ आधारित मूल्यमापन 2025-26 नमूना प्रश्नपत्रिका
दिनांक: 14.08.2025 रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार –
- पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वीसाठी 20 गुण विचारात घ्यावे.
- भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक पाठ आणि एक कविता विचारात घ्यावी.
- इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक पाठ-आधारित मूल्यमापन करावे.
- इयत्ता 1 ते 5 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
इयत्ता – 7वी
विषय – समाज विज्ञान
गुण – 20
9. शासकांग,कार्यांग आणि न्यायांग शब्दावालीचा परिचय
10. केंद्र सरकार
11. राज्य सरकार
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
पाठ 9. शासकांग, कार्यांग आणि न्यायांग शब्दावलीचा परिचय
पाठ 10. केंद्र सरकार
पाठ 11. राज्य सरकार
Question Paper Blueprint
| Learning Objective | Marks (Weightage) | Difficulty Level | Marks (Weightage) |
|---|---|---|---|
| Knowledge (ज्ञान) | 9 (45%) | Easy (सोपे) | 9 (45%) |
| Comprehension (आकलन) | 8 (40%) | Average (साधारण) | 8 (40%) |
| Application/Skill (उपयोजन/कौशल्य) | 3 (15%) | Difficult (कठीण) | 3 (15%) |
| Total | 20 | Total | 20 |
I. बहुपर्यायी प्रश्न (1 × 4 = 4 गुण)
1. सरकारचे पहिले अंग म्हणजे ……..
अ) कार्यकारी ब) विधिमंडळ क) माध्यम ड) न्यायव्यवस्था (ज्ञान – सोपे)
2. भारतीय प्रजासत्ताकातील सर्वोच्च अधिकार कोणाकडे आहे?
अ) पंतप्रधान ब) उपपंतप्रधान क) राष्ट्रपती ड) उपराष्ट्रपती (ज्ञान – सोपे)
3. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे?
अ) राज्यसभा ब) विधानसभा क) विधानपरिषद ड) लोकसभा (ज्ञान – सोपे)
4. कर्नाटकमधील विधानसभा सदस्यांची एकूण संख्या किती आहे?
अ) 250 ब) 75 क) 552 ड) 224 (ज्ञान – सोपे)
II. एका वाक्यात उत्तरे द्या. (1 × 3 = 3 गुण)
5. ‘विधिमंडळ’ या शब्दाचे मूळ शब्द कोणते आहेत? (ज्ञान – सोपे)
6. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्षे असावे लागते? (ज्ञान – सोपे)
7. विधानसौध कोठे आहे? (ज्ञान – सोपे)
III. जोड्या जुळवा. (1 × 3 = 3 गुण)
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
|---|---|
| 8. लोकसभा | अ) सहा वर्षे |
| 9. राज्यसभा | ब) कनिष्ठ सभागृह |
| 10. राज्य सरकार | क) मुख्यमंत्री (आकलन – साधारण) |
IV. थोडक्यात उत्तरे द्या. (2 × 3 = 6 गुण)
11. ‘कायदेमंडळ हे राष्ट्रीय जीवनाचे आरसे कसे आहे?’ स्पष्ट करा. (आकलन – साधारण)
12. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी पात्रता काय असावी लागते? (आकलन – साधारण)
13. राज्यपालाची पात्रता काय आहेत? (आकलन – साधारण)
V. दीर्घोत्तरी प्रश्न. (1 × 4 = 4 गुण)
14. ‘कायदेमंडळ हे राष्ट्रीय प्रतिष्ठेचे प्रतीक कसे आहे?’ स्पष्ट करा. (उपयोजन – कठीण)




