SSLC परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका 3:समाज विज्ञान 2024-25 SSLC MODEL QUESTION PAPER-3 : 2024-25 SS

S.S.L.C. MODEL QUESTION PAPER-3 : 2024-25

Subject : SOCIAL SCIENCE

Subject Code : 85-K

Time : 3 Hours 15 Minutes

Translated by – Smart Guruji

1. या प्रश्नपत्रिकेत एकूण 38 प्रश्न आहेत.

2. प्रश्नांसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करा.

3. उजव्या बाजूला दिलेले आकडे प्रश्नांसाठी पूर्ण गुण दर्शवतात.

4. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांसह उत्तर देण्यासाठी दिलेला वेळ, प्रश्नपत्रिकेच्या शीर्षस्थानी दिलेला आहे.

I: खालील प्रश्नांसाठी चार पर्याय दिलेले आहेत. योग्य उत्तर निवडा आणि अक्षरासह उत्तर लिहा.  8 × 1 = 8

  1. वेदांकडे परत चला (बॅक टू वेदाज) असे कोणी सांगितले?
    (A) आत्माराम पांडुरंग
    (B) दयानंद सरस्वती
    (C) स्वामी विवेकानंद
    (D) राजा राममोहन रॉय

2. त्रिपक्षीय करार करणाऱ्या देशांचा योग्य गट कोणता आहे?
(A) ब्रिटन, फ्रान्स, रशिया
(B) जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, इटली
(C) इटली, फ्रान्स, रशिया
(D) जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, फ्रान्स

3.नोबेल शांतता पुरस्कार जिंकणारी संयुक्त राष्ट्रसंघाची (UNO) संस्था कोणती आहे?
(A) WHO
(B) UNESCO
(C) FAO
(D) UNICEF

4.“नर्मदा बचाव आंदोलन” नेते कोण होते?
(A) सुंदरलाल बहुगुणा
(B) चांदीप्रसाद भट्ट
(C) शिवराम करंथ
(D) मेधा पाटकर

5.बंगालच्या उपसागरात परतीच्या पावसाळ्यात चक्रीवादळ का येते?
(A) जमीन व समुद्रातील तापमान व दाबातील फरकामुळे
(B) सूर्याची किरणे थेट उत्तरेकडे पडल्याने तापमान वाढते
(C) हे प्रदेश समुद्रसपाटीपासून जास्त उंचीवर आहेत
(D) उत्तर भारत समुद्रापासून दूर आहे

6. संघटित कामगार क्षेत्राचा सर्वोत्तम उदाहरण कोणते आहे?
(A) घरकाम करणारे कामगार
(B) कृषी कामगार
(C) सरकारी अधिकारी
(D) फेरीवाले व लहान विक्रेते

7. भारतात प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने कोणती व्यवस्था सुरू करण्यात आली?
(A) पंचायतराज
(B) स्त्रीशक्ती
(C) NAREGA
(D) ग्राहक न्यायालये

8. जिल्हा ग्राहक मंचाचा अध्यक्ष कोण असतो?
(A) जिल्हा न्यायाधीश
(B) जिल्हाधिकारी
(C) ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष
(D) राज्याचे मुख्य न्यायाधीश


II. खालील प्रत्येक प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे द्या. (8×1=8)

  1. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन सुरू का केले?
  2. हिटलरने गोबेल्सला विशेष मंत्री म्हणून का नियुक्त केले?
  3. संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) विश्वस्त समिती (Trusteeship Council) का स्थापन केली?
  4. सामाजिक स्तर म्हणजे काय?
  5. भारतात सर्वात कमी पाऊस कोठे पडतो?
  6. ग्रामीण विकास म्हणजे काय?
  7. 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन का साजरा केला जातो?
  8. कोणत्या धातूचा सार्वत्रिक चलनमूल्याच्या प्रमाण मानक म्हणून वापर होतो?

III. खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन ते चार वाक्ये / मुद्दे यामध्ये उत्तरे द्या. (8×2=16)

  1. भारतात बेरोजगारी निर्माण होण्याची कारणे कोणती?
    किंवा
    बालविवाहाचे परिणाम कोणते?
  2. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारची भूमिका काय आहे?
    किंवा
    भारतामध्ये साक्षरता वाढवण्यासाठी सरकारने कोणते उपाय केले?
  3. युरोपियन लोकांना भारताकडे जाण्यासाठी नवीन सागरी मार्ग शोधण्यास प्रवृत्त करणारे घटक कोणते होते?
  4. सहाय्यक करारामुळे (Subsidiary Alliance) स्थानिक राजे शक्तिहीन कसे झाले?
  5. मातीची धूप (Soil Erosion) झाल्याने कोणते परिणाम होतात?
  6. आपण जंगलांचे संवर्धन कसे करू शकतो?
  7. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यामध्ये काय फरक आहे?
  8. बचत बँक खाते आणि चालू बँक खाते यामध्ये काय फरक आहे?

 IV: खालील प्रश्नांची प्रत्येकी सहा वाक्यांत/मुद्यांत उत्तर द्या:    9 × 3 = 27

  1. रयतवारी पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती?
    किंवा
    संगोळी रायण्णा यांचे ब्रिटिशांविरुद्धचे बंड कसे होते?
  2. पंचवार्षिक योजनांमुळे भारताच्या विकासाला कशी मदत झाली?
    किंवा
    महिला ग्रामीण विकासामध्ये कशा योगदान देतात?
  3. बँका ग्राहकांसाठी कशा उपयुक्त आहेत?
    किंवा
    उद्योजक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कसा सहभाग घेतात?
  4. उद्योग स्थापन होण्यासाठी उपयुक्त घटक कोणते?
    किंवा
    भारताचे औद्योगिक प्रदेश कोणते?
  5. दयानंद सरस्वती आणि राजा राममोहन रॉय यांनी सामाजिक-धार्मिक सुधारणांसाठी कोणते योगदान दिले?
  6. भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याच्या अपयशाची कारणे कोणती?
  7. भारताने दहशतवाद नियंत्रित करण्यासाठी कोणते ठोस पाऊल उचलले आहेत?
  8. भारतात सामाजिक स्तरविभाजन रोखण्यासाठी सरकारने कोणते उपाय केले?
  9. भारतात रस्ते वाहतूक इतर कोणत्याही वाहतुकीपेक्षा अधिक महत्त्वाची का आहे?

V: खालील प्रश्नांची प्रत्येकी आठ वाक्यांत उत्तर द्या:       4 × 4 = 16

  1. ब्रिटिश शिक्षणाचा भारतावर काय परिणाम झाला?
    किंवा
    जम्मू-काश्मीरचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण कसे झाले?
  2. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जहाल विचारसरणीच्या नेत्यांची भूमिका काय होती?
  3. पीक पद्धती (Cropping Pattern) ठरवणारे घटक कोणते?
  4. लैंगिक भेदभाव दूर करण्यासाठी सरकारने कोणते उपाय केले?

VI. खालील भारताच्या नकाशावर दिलेल्यांपैकी कोणतीही पाच स्थाने दाखवा: (1×5=5)

(a) नागार्जुन सागर
(b) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
(c) कोरोमंडल किनारा
(d) विंध्य पर्वत
(e) पाल्क सामुद्रधुनी
(f) उत्कल किनारा
(g) गेटवे ऑफ इंडिया

दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी पर्यायी प्रश्न:
(प्रश्न क्र. 38 च्या ऐवजी)

बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्पांचे उद्दीष्टे कोणती आहेत?

Translated by – Smart Guruji

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now