FLN मराठी सरावपत्रिका जनरेटर 2026-27 (इयत्ता 4 ते 10)
विद्यार्थ्यांच्या मूलभूत वाचन, आकलन, लेखन आणि संवाद कौशल्यांचा विकास करण्यासाठी आता फक्त 1 क्लिकमध्ये स्वच्छ, आकर्षक आणि A4 साईजमधील मराठी FLN सरावपत्रिका तयार करा!
शिक्षकांचा वेळ वाचवणारे स्मार्ट FLN टूल
नमस्कार शिक्षक बंधू-भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो! शालेय वर्ष 2026-27 मध्ये FLN (Foundational Literacy and Numeracy) म्हणजेच पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांवर विशेष भर दिला जात आहे. एकाच वर्गात वेगवेगळ्या अध्ययन पातळीचे विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येक गटासाठी स्वतंत्र सरावपत्रिका (Practice Sheets) तयार करणे हे शिक्षकांसाठी खूप वेळखाऊ काम असते.
हीच गरज ओळखून SmartGuruji ने इयत्ता 4 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी खास FLN Marathi Practice Sheet Generator 2026-27 हे मोफत ऑनलाइन टूल तयार केले आहे. या टूलच्या मदतीने तुम्ही काही सेकंदांत स्तरानुसार वेगवेगळ्या सरावपत्रिका तयार करून थेट Print किंवा PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता.
या टूलची प्रमुख वैशिष्ट्ये
समाविष्ट अध्ययन निष्पत्ती (LO-1 ते LO-4)
या जनरेटरमध्ये मराठी भाषेच्या चारही मूलभूत कौशल्यांवर आधारित स्वतंत्र कृतींचा साठा देण्यात आला आहे:
4 अध्ययन स्तर (Proficiency Levels)
विद्यार्थ्याची इयत्ता कोणतीही असली तरी त्याच्या प्रत्यक्ष अध्ययन पातळीनुसार खालीलपैकी योग्य स्तर निवडावा:
हे टूल कसे वापरावे? (5 सोप्या पायऱ्या)
- 1 खालील टूलमध्ये विद्यार्थ्याची इयत्ता (4 ते 10) आणि आवश्यक Learning Outcome (LO-1 ते LO-4) निवडा.
- 2 विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार सरावाचा स्तर, सरावपत्रिकेची संख्या (1 ते 5) आणि कृतींची संख्या (3 ते 10) निवडा.
- 3 हवे असल्यास विद्यार्थी, शाळा, दिनांक आणि शिक्षकाचे नाव भरा (किंवा रिकामे ठेवा).
- 4 Generate Practice Sheet बटणावर क्लिक करा. नवीन प्रश्नांसाठी Generate Another Sheet वापरू शकता.
- 5 सरावपत्रिका तपासून Print Practice Sheet किंवा Download PDF (Save as PDF) वर क्लिक करा.


