सराव चाचणी: पदार्थांचे स्वरूप (मुलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे)
कर्नाटक NMMS | इयत्ता 8 वी विज्ञान
एकूण गुण: 15
कर्नाटक राज्य शासनाच्या बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही विशेष NMMS सराव चाचणी तयार करण्यात आली आहे. ‘पदार्थांचे स्वरूप : मुलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे’ या पाठावर आधारित या चाचणीमध्ये मुलद्रव्ये, मिश्रधातू, संयुगांचे गुणधर्म आणि रासायनिक अभिक्रिया यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पनांचा समावेश आहे.
NMMS परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे
- मिश्रणे (Mixtures): जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ मिसळले जातात व प्रत्येक पदार्थ त्याचे गुणधर्म टिकवून ठेवतो, तेव्हा त्याला मिश्रण म्हणतात. (उदा. हवा, पोहे, सोडा पाणी).
- मिश्रधातू (Alloys): स्टेनलेस स्टील (लोखंड, निकेल, क्रोमियम, कार्बन), पितळ (तांबे आणि जस्त), कांस्य (तांबे आणि कथील).
- चुन्याची निवळी (Lime water): हवेतील कार्बन डायऑक्साईडशी अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट तयार झाल्यामुळे चुन्याची निवळी दुधी रंगाची बनते.
- पाण्याचे विद्युत विघटन: पाण्यामधून विद्युत प्रवाह वाहिल्यावर हायड्रोजन (फट आवाज) आणि ऑक्सिजन (ज्योत तेजस्वी करतो) तयार होतात. (हायड्रोजन:ऑक्सिजन प्रमाण 2:1 असते).
- द्रव अवस्थेतील मूलद्रव्ये: सामान्य खोलीच्या तापमानाला पारा (धातू) आणि ब्रोमीन (अधातू) हे द्रव स्थितीत असतात.
- संयुगे (Compounds): वेगवेगळी मूलद्रव्ये निश्चित प्रमाणात एकत्र येऊन नवीन पदार्थ तयार होतो. संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. (उदा. पाणी, फेरस सल्फाईड).
- ग्राफीन एअरोजेल: कार्बनपासून बनलेला पृथ्वीवरील सर्वात हलका पदार्थ. समुद्रातील तेल गळती साफ करण्यासाठी वापरला जातो.
- ढोकर कला: बिहार आणि ओडिशामधील कला जी पितळ किंवा कांस्य वापरून मूर्ती बनवते.
प्रश्न 1 (1 गुण)
प्रश्न येथे येईल
स्पष्टीकरण:
चाचणी पूर्ण झाली!
एकूण गुण
0/15
0/15
बरोबर उत्तरे
0
0
चुकीची/सोडलेली
0
0

