24. ग्राफीन एअरोजेलचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी केला जातो?
A. औषध निर्मिती
B. तेल गळती साफ करण्यासाठी
C. भांडी बनवण्यासाठी
D. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी
उत्तर: B. तेल गळती साफ करण्यासाठी
25. मिश्रणाचे घटक एकमेकांशी काय करत नाहीत?
A. भौतिक बदल
B. रासायनिक अभिक्रिया
C. रंग बदल
D. अवस्था बदल
उत्तर: B. रासायनिक अभिक्रिया
रिकाम्या जागा भरा (Fill in the blanks)
1. जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ मिसळले जातात तेव्हा प्रत्येक पदार्थ त्याचे गुणधर्म टिकवून ठेवतो तेव्हा त्याला ________ असे म्हणतात.
उत्तर: मिश्रण
2. कांस्य ज्याला कामस्य म्हणूनही ओळखले जाते, तो तांबे आणि ________ पासून बनलेला एक मिश्रधातू आहे.
उत्तर: कथील
3. हवेचा सुमारे 78% भाग ________ चा असून तो ज्वलनात भाग घेत नाही.
उत्तर: नैट्रोजन
4. दोन किंवा अधिक अणू एकत्र येऊन त्या मुलद्रव्याचा एक स्थिर कण तयार होतो त्याला ________ असे म्हणतात.
उत्तर: रेणू
5. बहुतेक खडक हे ________ चे मिश्रण असतात.
उत्तर: खनिजांचे
एका वाक्यात उत्तरे लिहा (1 Mark Questions)
1. शुद्ध पदार्थ म्हणजे काय?
उत्तर: शुद्ध पदार्थ म्हणजे अशा प्रकारचा पदार्थ जो कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे इतर प्रकारच्या पदार्थामध्ये वेगळा करता येत नाही आणि त्यात एकाच प्रकारचे कण असतात.
2. मुलद्रव्ये म्हणजे काय?
उत्तर: मुलद्रव्ये हे असे पदार्थ आहेत की जे पुढे अधिक साध्या पदार्थांमध्ये रुपांतरीत करता येत नाहीत. ते एकाच प्रकारच्या अणूंपासून बनलेले असतात.
3. संयुगे कशी तयार होतात?
उत्तर: जेव्हा वेगवेगळी मुलद्रव्ये निश्चित प्रमाणात रासायनिक दृष्ट्या एकत्र येऊन पूर्णपणे नवीन कांहीतरी तयार करतात तेव्हा संयुगे तयार होतात.
4. लोह आणि सौम्य हैड्रोक्लोरीक आम्ल यांच्या अभिक्रियेत कोणते उत्पादित तयार होते?
उत्तर: फेरस क्लोराईड आणि हैड्रोजन वायू तयार होतो.
5. ग्राफीन एअरोजेलची वैशिष्ट्ये काय आहेत?
उत्तर: ग्राफीन एअरोजेल हे कार्बनपासून बनलेले पृथ्वीवरील सर्वात हलके आणि अत्यंत सच्छिद्र पदार्थ आहे, ज्याची शोषण क्षमता जास्त असते.
पदार्थांचे स्वरूप : मुलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे – स्वाध्याय व कोष्टके
पदार्थांचे स्वरूप : मुलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे – स्वाध्याय व कोष्टके
कोष्टक 8.1 विविध प्रकारची मिश्रणे पूर्ण करा
अ.नं
मिश्रण-प्रकार
उदाहरणे
एकसमान किंवा असमान
1
वायू आणि वायू
हवा
एकसमान
2
वायू आणि द्रव
वायुयुक्त पाणी (सोडा पाणी), पाण्यात ऑक्सीजन विरघळलेला असतो.
एकसमान
3
घन आणि वायू
हवेतील धुळीचे कण / हवेतील कार्बनचे कण
असमान
4
द्रव आणि द्रव
पाण्यातील अॅसेटीक आम्ल (व्हिनेगार) तेल आणि पाणी
एकसमान असमान
5
घन आणि द्रव
साखर आणि पाणी वाळू आणि पाणी, समुद्राचे पाणी
एकसमान असमान
6
घन आणि घन
बेकींग सोडा (बेकींग सोडा आणि टार्टारीक आम्ल), मिश्रधातू
एकसमान
कोष्टक 8.2 नमुने A आणि B यांची तुलना पूर्ण करा
अ.नं.
प्रयोग
नमुने A (लोखंड व गंधक मिश्रण)
नमुने B (फेरस सल्फाईड संयुग)
1
अस्तित्व (i) रंग (ii) पोत
काळा आणि पिवळा असमान (भिन्नजिनशी)
काळा एकसमान
2
चुंबक चाचणी
लोखंडाचे तुकडे चुंबकाकडे आकर्षिले जातात.
चुंबकाचा कोणताही परिणाम होत नाही.
3
वायू चाचणी (i) वास (ii) जळणे
रंगहीन, वासहीन (हैड्रोजन वायू) ‘फट’ असा आवाज करीत जळतो.
कुजलेल्या अंड्याप्रमाणे वास (हैड्रोजन सल्फाईड) जळत नाही.
प्रश्न 1: जेथे दोन पदार्थ A आणि B हे एकत्र येऊन C हे उत्पादीत पदार्थ तयार होणारी खालील रासायनिक अभिक्रियेने A आणि B चे पुढे साध्या पदार्थात रुपांतर होत नाही असे समजा (A + B -> C). या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(iv) A आणि B ही मुलद्रव्ये आहेत आणि C हे एक संयुग आहे आणि त्याचे स्थिर संयोजन आहे.
प्रश्न 2: विधान: हवा हे एक मिश्रण आहे. कारण: दोन किंवा अधिक पदार्थ मिसळले की कोणतेही रासायनिक बदल न होता मिश्रण तयार होते.
(i) विधान आणि कारण हे दोन्ही सत्य आहेत आणि कारण हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे.
प्रश्न 3: पाणी हे एक संयुग आहे, ज्यापासून ते तयार होते त्या ऑक्सीजन आणि हैड्रोजन या मुलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत. या विधानाचे समर्थन करा.
पाणी हे हैड्रोजन आणि ऑक्सीजन यांच्या निश्चित प्रमाणातील रासायनिक संयोगातून बनते. हैड्रोजन हा स्वतः ज्वलनशील वायू आहे (इंधन आहे) आणि ऑक्सीजन हा ज्वलनास मदत करतो. परंतु या दोन्हींपासून बनलेले पाणी हे आग विझवण्यासाठी (अग्निशामक) वापरले जाते. यावरून स्पष्ट होते की संयुगाचे (पाण्याचे) गुणधर्म त्याच्या घटक मुलद्रव्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात.
प्रश्न 4: खालीलपैकी कोणत्या घटनेत सर्व उदाहरणे बरोबर जुळली आहेत? तुमच्या उत्तरांच्या समर्थनार्थ कारणे द्या.
(iii) शुध्द पदार्थ – कार्बनडाय ऑक्साईड, लोखंड, ऑक्सीजन, साखर.
कारण: कार्बनडाय ऑक्साईड आणि साखर ही संयुगे आहेत, तर लोखंड आणि ऑक्सीजन ही मुलद्रव्ये आहेत. मुलद्रव्ये आणि संयुगे हे दोन्ही ‘शुद्ध पदार्थ’ या गटात मोडतात कारण त्यांच्यात एकाच प्रकारचे कण असतात. (इतर पर्यायांमध्ये हवा, समुद्राचे पाणी ही मिश्रणे चुकीच्या गटात दिली आहेत).
प्रश्न 5: लोह हे ओलसर हवेशी क्रिया करून फेरस ऑक्साईड तयार होते आणि मॅग्नेशियम ऑक्सीजनमध्ये जळून मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. वरील क्रियेमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व पदार्थांचे मुलद्रव्ये, संयुगे किंवा मिश्रणे यामध्ये समर्थनासह वर्गीकरण करा.
1. लोह (Iron) – मुलद्रव्य (एकाच प्रकारच्या अणूंपासून बनलेले).
2. ओलसर हवा – मिश्रण (अनेक वायू आणि पाण्याची वाफ यांचे मिश्रण).
3. फेरस ऑक्साईड (गंज) – संयुग (लोह आणि ऑक्सीजन यांच्या रासायनिक संयोगातून बनलेले).
4. मॅग्नेशियम – मुलद्रव्य.
5. ऑक्सीजन – मुलद्रव्य.
6. मॅग्नेशियम ऑक्साईड – संयुग (मॅग्नेशियम आणि ऑक्सीजन यांच्या संयोगातून बनलेले).
प्रश्न 6 (कोष्टक 8.3): खालील घटकांचे मुलद्रव्ये, संयुगे किंवा मिश्रणे यात वर्गीकरण करा आणि त्यापैकी शुद्ध पदार्थ ओळखा.
प्रश्न 7: जेव्हा लोखंडी तुकडे आणि गंधकाची भुकटी तापविली जाते तेव्हा कोणता नवीन पदार्थ तयार होतो आणि ते मूळ मिश्रणापेक्षा कसे वेगळे आहे? या क्रियेचे शाब्दीक समीकरण सुध्दा लिहा.
जेव्हा लोखंडी तुकडे आणि गंधक तापविले जाते तेव्हा फेरस सल्फाईड हा नवीन काळ्या रंगाचा पदार्थ तयार होतो. हे एक संयुग आहे. मूळ मिश्रणात लोखंड चुंबकाकडे आकर्षिले जात होते, परंतु नवीन पदार्थ (फेरस सल्फाईड) चुंबकाकडे आकर्षित होत नाही आणि त्याचे गुणधर्म पूर्णपणे वेगळे आहेत.
शाब्दीक समीकरण: लोह + गंधक → फेरस सल्फाईड
प्रश्न 8: मुलद्रव्य आणि संयुग असे दोन्हीत एका पदार्थाचे वर्गीकरण करणे शक्य आहे का? का किंवा का नाही याचे वर्णन करा.
नाही, एकाच पदार्थाचे वर्गीकरण मुलद्रव्य आणि संयुग असे दोन्हीत करणे शक्य नाही. मुलद्रव्य हे केवळ एकाच प्रकारच्या अणूंपासून बनलेले असते आणि ते साध्या पदार्थात विभागले जाऊ शकत नाही. याउलट, संयुग हे दोन किंवा अधिक वेगवेगळ्या मुलद्रव्यांच्या निश्चित प्रमाणातील रासायनिक संयोगातून बनते.
प्रश्न 9: जर पाणी हे संयुग नसून हैड्रोजन आणि ऑक्सीजन यांचे मिश्रण असते तर आपले दैनंदिन जीवन कसे बदलले असते?
जर पाणी हे मिश्रण असते, तर त्यात हैड्रोजन (ज्वलनशील) आणि ऑक्सीजन (ज्वलनास मदत करणारा) यांचे मूळ गुणधर्म तसेच राहिले असते. त्यामुळे पाण्याचा उपयोग आग विझवण्यासाठी करता आला नसता, उलट आग अधिक भडकली असती. तसेच ते सजीवांसाठी पिण्यायोग्य द्रव राहिले नसते, आणि पृथ्वीवरील जीवन सध्यासारखे अस्तित्वात आले नसते.
प्रश्न 10: आकृती 8.24 चे विश्लेषण करा. वायू A ओळखा. रासायनिक अभिक्रियेचे शाब्दिक समीकरण सुद्धा लिहा.
प्रश्न 11: फक्त अधातूपासून बनलेल्या कोणत्याही दोन संयुगांची नावे लिहा आणि प्रत्येकाचे दोन उपयोग सुध्दा लिहा.
1. पाणी (हैड्रोजन + ऑक्सीजन): उपयोग – (i) पिण्यासाठी आणि सजीवांच्या जगण्यासाठी. (ii) उत्तम द्रावक आणि अग्निशामक म्हणून.
2. कार्बनडाय ऑक्साईड (कार्बन + ऑक्सीजन): उपयोग – (i) वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषणासाठी. (ii) अग्निशामक यंत्रांमध्ये आग विझवण्यासाठी.
प्रश्न 12: सोन्याचे वर्गीकरण हे खनिज आणि धातु म्हणून कसे करता येईल?
सोने हे पृथ्वीवर नैसर्गिकरित्या आढळणारे घन अवस्थेतील मूळ खनिज (Mineral) आहे. तसेच, त्यात चकाकी असते आणि ते उत्तम सुवाहक असल्याने त्याची गणना ‘धातू’ (Metal) या मुलद्रव्यांच्या प्रकारात केली जाते. म्हणून सोने हे खनिज आणि धातू या दोन्ही स्वरूपात वर्गीकृत करता येते.