15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन बहारदार सूत्रसंचालन – 2

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन बहारदार सूत्रसंचालन – 2

🌸 सुस्वागतम आणि दमदार सुरुवात

उत्सवांचा उत्सव, आनंदाचा उत्सव!
स्वातंत्र्याचा उत्सव, देशभक्तीचा उत्सव!

सूत्रसंचालक :

सुस्वागतम… सुस्वागतम… सुस्वागतम…!!

आजच्या या मंगल पहाटे, रवीकिरणांच्या साक्षीने स्वतंत्र भारतमातेला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहे. १५ ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील अभिमानाचा दिवस आहे. स्वातंत्र्य, त्याग, बलिदान आणि देशभक्तीची प्रेरणा देणारा हा दिवस आपण सर्वजण अत्यंत उत्साहात साजरा करीत आहोत.

आजच्या या राष्ट्रीय सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचे मनःपूर्वक स्वागत करतो/करते.

👑 अध्यक्षीय निवड

कोणत्याही कार्यक्रमाला योग्य दिशा मिळण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असते.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या परिसरातील सन्माननीय श्री./सौ. ____________________ यांनी स्वीकारावे, अशी नम्र विनंती करतो/करते.

सहकारी शिक्षकांनी या सूचनेस अनुमोदन द्यावे.

🪔 प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन

आता अध्यक्ष महोदय व सर्व मान्यवरांनी भारतमाता आणि महान स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करावे, अशी विनंती.

मोहब्बत का दूसरा नाम हैं मेरा देश,
अनेक में एकता का प्रतीक हैं मेरा देश।
चंद गैरों की सुनना मुझे गँवारा नहीं,
हिन्दू हो या मुस्लिम सभी का प्यारा है मेरा देश।
प्रतिमा पूजन सुरू असताना देशभक्तीपर वाद्यसंगीत किंवा गीत वाजवावे.

🇮🇳 ध्वजारोहण व सलामी

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री./सौ. ____________________ यांनी ध्वजस्तंभाकडे जाऊन ध्वजारोहण करावे, अशी नम्र विनंती.

  • विद्यार्थ्यांनी सावधान स्थितीत उभे राहावे.
  • ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजास सलामी द्यावी.
  • राष्ट्रगीताचे समूहगायन करावे.
  • भारत माता की जय.
  • वंदे मातरम्.
  • विजयी विश्व तिरंगा प्यारा… (झेंडा गीत)
यानंतर सर्व मान्यवरांनी मंचावर स्थान घ्यावे.

🌹 मान्यवरांचा परिचय व स्वागत

आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या अध्यक्षांचा व प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री./सौ. ____________________ करून देतील.

त्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीनुसार पुस्तक अथवा झाडाचे रोप देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल.

📖 प्रास्ताविक

आजच्या कार्यक्रमाचा उद्देश, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि आपल्या राष्ट्रीय कर्तव्यांविषयी माहिती देण्यासाठी श्री./सौ. ____________________ यांना प्रास्ताविकासाठी आमंत्रित करतो/करते.

मान्यवरांचा आशीर्वाद घेऊन,
साथ द्यावी सर्वांनी मिळून.
आजच्या कार्यक्रमाचा उद्देश,
जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून.
प्रास्ताविकात भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्यवीरांचे बलिदान आणि आजच्या पिढीची राष्ट्रीय जबाबदारी यावर थोडक्यात प्रकाश टाकावा.

🎤 विद्यार्थ्यांची भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम

भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना मानवंदना म्हणून आता आपल्या शाळेतील विद्यार्थी भाषणे, समूहगीत, देशभक्तीपर नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.

आजाद भारत के लाल हैं हम,
आज शहीदों को सलाम करते हैं।
युवा देश की शान हैं हम,
अखंड भारत का संकल्प करते हैं॥
  1. विद्यार्थ्यांची भाषणे.
  2. देशभक्तीपर समूहगीत.
  3. देशभक्तीपर नृत्य.
  4. शिक्षकांचे मनोगत.

🎙 अध्यक्षीय मनोगत

आता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री./सौ. ____________________ यांनी आपल्या अनुभवाचे अनमोल विचार विद्यार्थ्यांसमोर मांडावेत, अशी नम्र विनंती.

मुस्कान आप हमारे लिए वरदान है,
आपका मार्गदर्शन हमारा सम्मान है।
आप आये तो हम पर मेहरबान है,
बड़े नसीब वाले हैं हम, जो आप हमारे मेहमान हैं।

🙏 आभार प्रदर्शन

कोणताही कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यामुळेच यशस्वी होतो. या सुंदर राष्ट्रीय सोहळ्याचे आभार मानण्यासाठी श्री./सौ. ____________________ यांना निमंत्रित करतो/करते.

थेंबाथेंबाने तलाव भरतो,
हाताहाताने कार्यक्रम फुलतो.
जेथे जेथे आहेत आजच्या कार्यक्रमाचे शिल्पकार,
मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.

आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या सर्व मान्यवर, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांचे मनःपूर्वक धन्यवाद.

🇮🇳 कार्यक्रमाची सांगता

अध्यक्षांच्या परवानगीने आजचा स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय सोहळा येथे संपन्न झाल्याचे जाहीर करतो/करते.

जहाँ प्रेम की भाषा हैं सर्वोपरि,
जहाँ धर्म की आशा हैं सर्वोपरि।
ऐसा हैं मेरा देश हिन्दुस्तान,
जहाँ देशभक्ति की भावना हैं सर्वोपरि॥

🇮🇳 जय हिंद! जय भारत! 🇮🇳

टीप : वेळेनुसार व शाळेच्या नियोजनानुसार या सूत्रसंचालनामध्ये आवश्यक बदल करता येतील.

📚 संबंधित लेख (Related Articles)

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now