इयत्ता 8 वी विषय मराठी: द्वितीय संकलित मूल्यमापन (SA-2) मार्च 2026 ची संपूर्ण उत्तर पत्रिका!

मार्च 2026 मध्ये पार पडलेल्या इयत्ता 8 वी च्या द्वितीय सत्रांत परीक्षेची (SA-2 / संकलित मूल्यमापन 2) अधिकृत ‘मराठी’ विषयाची उत्तर पत्रिका (Answer Key) तुम्ही शोधत आहात? तर ही पोस्ट खास तुमच्यासाठी आहे.

या पोस्टमध्ये आम्ही इयत्ता 8 वी, विषय – मराठी (एकूण गुण – 50) च्या SA-2 परीक्षेची सविस्तर आणि अचूक उत्तर पत्रिका उपलब्ध करून दिली आहे. विशेष बाब म्हणजे, यंदाच्या या ५० गुणांच्या परीक्षेमध्ये केवळ दुसऱ्या सत्राचाच नाही, तर सत्र 1आणि सत्र 2 (Sem 1 & Sem 2) अशा दोन्ही सत्रांच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते.

या पोस्टमध्ये तुम्हाला खालील माहिती मिळेल:

  • सविस्तर उत्तरे: पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न, व्याकरण आणि उपयोजित लेखन (निबंध/पत्रलेखन) या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे.
  • मूल्यमापनास मदत: शिक्षकांना पेपर तपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना स्वतःच्या गुणांचा (Marks) अचूक अंदाज घेण्यासाठी ही उत्तर पत्रिका अत्यंत उपयुक्त ठरेल.
  • पीडीएफ डाउनलोड (PDF Download): भविष्यातील संदर्भासाठी उत्तर पत्रिकेची PDF फाईल एका क्लिकवर डाउनलोड करण्याची सोय.

परीक्षेत विचारलेल्या संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी आणि अचूक उत्तरांची खात्री करण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण उत्तर पत्रिका नक्की तपासा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा!

8th Marathi SA-2 Answer Key
इयत्ता 8वी विषय मराठी: द्वितीय संकलित मूल्यमापन (SA-2) मार्च 2026 ची संपूर्ण उत्तर पत्रिका!
द्वितीय संकलित मूल्यमापन मार्च – 2026
इयत्ता – आठवी  |  विषय – मराठी  |  गुण – 50
आदर्श उत्तरपत्रिका
1. खालील दिलेल्या पर्यायातून योग्य पर्यायी उत्तर निवडून लिहा
1. ‘प्रशांत हुशार आहे’. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
उत्तर: विशेषण
स्पष्टीकरण: नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द.
2. ‘चंद्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
उत्तर: ड) शशी
3. खालीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा?
उत्तर: अ) सत् + आचार (सदाचार)
2. पहिल्या दोन पदातील संबंध ओळखून तिसऱ्या पदाशी जुळणारा संबंधित शब्द लिहा
4. गरीब : श्रीमंत :: मान : __
उत्तर: अपमान
5. सुखाची चव : अरुणा ढेरे :: अतिथी : __
उत्तर: वा. कृ. चोरघडे
3. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा
6. संक्रांतीला कर्नाटकामध्ये काय म्हणतात?
उत्तर: संक्रांतीला कर्नाटकामध्ये ‘संक्रमण हब्बा’ असे म्हणतात.
7. सुगरण असे कोणाला म्हटले आहे?
उत्तर: जिला उत्तम स्वयंपाक बनवता येतो तिला सुगरण असे म्हणतात.
8. मुक्ताईला कोणी गुरु मानले?
उत्तर: मुक्ताईला चांगदेव यांनी गुरु मानले.
4. खालीलपैकी (कोणतेही पाच) प्रश्नांची उत्तरे दोन-तीन वाक्यात लिहा
9. गोरक्षणाच्या लोकांचे प्रेम संपादन करण्यासाठी आलोकाबाईंना कसे वागण्याचा सल्ला गाडगेबाबांनी दिला?
उत्तर: गाडगेबाबांनी आलोकाबाईंना सल्ला दिला की, गोरक्षणाच्या लोकांचे तुमच्यावर प्रेम असले पाहिजे. त्यांनी स्वतःहून तुम्हाला तिथे राहण्याचा आग्रह केला पाहिजे. जर तिथे कोणी तुम्हाला विचारत नसेल आणि तुम्ही शहाणे असाल, तर तिथे राहू नका असा सल्ला त्यांनी दिला.
10. चिंगीची आई चिंगीचे लग्न कशाप्रकारे करणार आहे?
उत्तर: चिंगीची आई चिंगीचे लग्न एका गोऱ्या नक्षत्रासारख्या मुलाशी करणार आहे. ती लग्नात नवरदेवाला हजार रुपये हुंडा देणार आहे, वाजंत्री, चौघडा आणि बँडबाजा वाजवणार आहे. नळे आणि चंद्रज्योती लावून त्यांच्या प्रकाशात मोठ्या थाटात वरात काढणार आहे.
11. “जे सुचलं जे लिहावसं वाटलं ते कसं लिहू शकले असतील ही माणसं”: संदर्भासहित स्पष्टीकरण करा?
उत्तर:
संदर्भ: हे वाक्य अरुणा ढेरे यांनी लिहिलेल्या ‘सुखाची चव’ या पाठातील असून हे स्वतः लेखिकेने म्हटले आहे.
स्पष्टीकरण: लेखिका जेव्हा पुस्तकांचे वाचन करत असते, तेव्हा तिला पुस्तकातील जग आणि लेखकांच्या उत्तम लेखनाबद्दल जे भारावून जाणारे विचार येतात, त्यातून प्रभावित होऊन तिने हे वाक्य म्हटले आहे.
12. कवी परिचय लिहा – सुरेश भट
उत्तर: सुरेश श्रीधर भट (1932-2003) हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी गझल हा काव्यप्रकार मराठीत आणून त्याचे पुनरुज्जीवन केले. ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’ हे त्यांचे काही प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत. त्यांच्या काव्याचे मुख्य वैशिष्ट्य ‘गेयता’ हे आहे.
13. “पाठच्या बहिणीवर भाऊ कसा हो रूसेल” संदर्भासहित स्पष्टीकरण करा?
उत्तर:
संदर्भ: वरील चरण ‘भाऊराया’ या अज्ञात कवयित्रीच्या लोकगीतातील आहे.
स्पष्टीकरण: भाऊबिजेच्या दिवशी भाऊ अजूनही ओवाळून घ्यायला आला नव्हता. लहानपणी दिलेल्या त्रासामुळे तो रागवला असेल का, असे विचार बहिणीच्या मनात येतात. परंतु ती स्वतःचीच समजूत घालते की, काहीही झाले तरी पाठच्या बहिणीवर भाऊ कधीही रुसणार नाही.
14. भारत देशाला भूषवणारी स्त्री रत्ने व वीर पुरुष कोण कोण आहेत?
उत्तर: भारत देशाला भूषवणारी स्त्री रत्ने म्हणजे दमयंती, जानकी आणि गिरीजा (पार्वती) या आहेत. वीर पुरुष म्हणजे जनकादी राजयोगी, शुक, वामदेव, पृथ्वीराज सिंह आणि शिवाजी महाराज हे आहेत.
15. खालील ओळीतील अलंकार ओळखून लक्षण सांगा? ‘देवाच्या दारात दान देताना दृष्टी निकोप हवी.’
उत्तर:
अलंकार: अनुप्रास अलंकार.
लक्षण: एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची (येथे ‘द’ या अक्षराची) वारंवार पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
16. खालील ओळीतील गण पाडून वृत्त ओळखा? ‘फेकी रसाळ तरुही मधुगंधपाश’
उत्तर:
वृत्त: वसंततिलका.
लक्षण: या वृत्तात एकूण 14 अक्षरे असतात आणि ‘त भ ज ज गा गा’ असे गण पडतात.
6. खालीलपैकी (कोणतेही पाच) प्रश्नांची उत्तरे चार पाच वाक्यात लिहा
17. वेग साधने हा कामाचा एक आवश्यक मुद्दा ठरतो हे पटवून देताना विनोबांनी कोणती उदाहरणे दिली आहेत?
उत्तर: लष्करात केवळ अमुक मैल कूच करून जायचे एवढाच प्रश्न नसतो, तर अमुक वेळेच्या आत त्या ठिकाणी पोहोचणे हा देखील महत्त्वाचा प्रश्न असतो. हीच लष्कराची शिस्त व्यवहारातल्या सर्व उद्योगांना लागू होते. रसोई करणारा माणूस पाच माणसांचे जेवण बनवायला पाच तास लावत असेल, तर त्याची रसोई निरुपयोगी ठरते. काळाच्या प्रवाहात काम करताना ‘वेग साधणे’ हा एक आवश्यक मुद्दा ठरतो, अशी उदाहरणे विनोबांनी दिली आहेत.
18. बायजाने 1 रुपयाच्या नोटेला जहर का म्हटले आहे?
उत्तर: पैकू आपली बैलजोडी घेऊन डॉक्टरांच्या घरी गेला आणि बाईंना दारी आलेल्या बैलांची पूजा करण्याची विनंती केली. तेव्हा बाईंनी ‘या जनावरांना काही कळतं का?’ असे म्हणून बैलांचा अपमान केला आणि इनाम म्हणून एक रुपयाचा कागद (नोट) पैकूला दिला. जेव्हा ही अपमानाची गोष्ट बायजेला समजली, तेव्हा तिला राग आला आणि तिने त्या एका रुपयाच्या नोटेला ‘जहर’ (विष) म्हटले, कारण ते अपमानित धन त्यांना पचणार नव्हते.
19. कलामांच्या वडिलांची बोट समुद्राअर्पण कशी झाली?
उत्तर: रामेश्वरम येथे आलेल्या एका भीषण चक्रीवादळामुळे आणि प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कलामांच्या वडिलांची बोट समुद्रात वाहून गेली आणि नष्ट होऊन समुद्राअर्पण झाली.
20. श्रीमंत नानासाहेबांनी कात्रजच्या तलावातील पाण्याचा अंदाज कसा घेतला?
उत्तर: शनिवार वाड्याला कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून नानासाहेबांनी उन्हाळ्याच्या दिवसांत कात्रजच्या तलावातील पाण्याचा अंदाज घेतला. त्या दिवसांत त्यांनी तलावाच्या पाण्याला दहा-पाच मोटा लावून अखंड रात्रंदिवस आठ दिवसांपर्यंत पाणी उपसून पाहिले. एवढे करूनही तलावातील पाणी तसूभरही कमी झाले नाही. यावरून त्यांनी पाण्याचा अचूक अंदाज घेतला आणि तिथून वाड्यापर्यंत पाणी नेण्याचा निर्णय घेतला.
21. माणूसपणाचा दिवा लाव असे कवी का म्हणतो?
उत्तर: परमेश्वराकडून माणसाला पराक्रम, शस्त्र आणि वैभव मिळाले, तरी माणसाला खऱ्या आनंदाचा स्वर्ग दिसला नाही आणि तो हतबल व निराश झाला. म्हणून तो माणूस पुन्हा परमेश्वराला शरण जातो. तेव्हा देव त्याला सांगतो की, तू तुझ्या अंतःकरणात माणुसकीचा दिवा लाव, तरच तुला खऱ्या स्वर्गानंदाची प्राप्ती होईल.
22. श्रीकृष्ण व सवंगड्यांच्या भोजनाचे वर्णन करा?
उत्तर: श्रीकृष्णाने सवंगड्यांना त्यांच्या शिदोऱ्या लवकर आणायला सांगितल्या. श्रीकृष्ण मध्ये बसला आणि सर्व सवंगडी त्याच्याभोवती गोलाकार बसले. त्यांनी स्वतःच्या हाताने एकमेकांना पदार्थ भरविले. दही-दुधाचा आनंद लुटून एकमेकांच्या अंगावर चुळा टाकल्या. गाई पळाल्या, वाट चुकल्या असे बोलून पळापळी केली आणि श्रीकृष्ण व त्याच्या सवंगड्यांनी अशाप्रकारे गोपाळकाला साजरा केला.
23. ‘तिथे’ कवितेमध्ये आज कवी तेथे कोणती मौज अनुभवतो?
उत्तर: त्या ठिकाणी गेल्यानंतर कवी जाईसारख्या पांढऱ्या रंगाची फुले आणि वेली पाहतो आणि त्यांच्या सुगंधाने स्वतःला विसरून जातो. दोन डोंगरांमधील खोलगट जागेतून झरा वाहत असतो आणि वाऱ्यावर सोनवळीची फुले डुलताना दिसतात. झाडीत शिरल्यावर एखाद्या आश्चर्यकारक जादूच्या बेटावर आल्यासारखे कवीला वाटते आणि बालपणीचीच जुनी मौज कवी तिथे पुन्हा अनुभवतो.
24. मायची वाट पाहताना घरोघरी काय घडत होते?
उत्तर: मुलांनी आईची वाट पाहताना पाहिले की, आजूबाजूच्या प्रत्येकाच्या घरी दिवे लागलेले असायचे, पण मुलांच्या झोपडीत मात्र अंधार असायचा. दुसऱ्यांच्या घरातून भाकरी, वांगी आणि पिठल्याचा खमंग वास येत असे, परंतु या गरीब मुलांना काहीच खायला मिळत नसे. माय मोळी विकून परत येईपर्यंत त्यांना भुकेल्या पोटीच वाट पाहत बसावे लागत असे.
25. उमाईसेने कोथळोबाला दंडवंत का घातले ?
उत्तर: महानुभव पंथाच्या शिकवणुकीनुसार आश्रमात कोणताही भेदभाव न करता सर्वांनी एकोप्याने वागले पाहिजे. तरीही उमाईसा आश्रमात कोथळोबासोबत अस्पृश्यतेचा भेदभाव करत होती. जेव्हा म्हाइंभटांना हे समजले, तेव्हा त्यांनी उमाईसेला तिची चूक लक्षात आणून दिली. समानतेची शिकवण मोडून भेदभाव केल्याचा उमाईसेला पश्चात्ताप झाला आणि म्हाइंभटांच्या आज्ञेवरून तिने कोथळोबाला दंडवत घातले.
7. खालीलपैकी (कोणतेही दोन) प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा
26. गोलघुमटाच्या भव्यतेची वर्णन करा?
उत्तर: भव्यता आणि साधेपणा हे विजापूरच्या गोलघुमटाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. महंमद आदिलशहाने ही अवाढव्य इमारत स्वतःच्या चिरनिद्रेसाठी बांधली. या इमारतीची प्रत्येक बाजू 205 फूट आहे आणि चारही कोपऱ्यांवर सात मजली अष्टकोनी मनोरे बांधलेले आहेत. घुमटाची भव्यता आणि प्रमाणबद्धता दुरूनही डोळ्यांत भरते. या गोलघुमटात प्रतिध्वनीचा मोठा चमत्कार घडतो; भिंतीकडे तोंड करून हळू जरी बोलले, तरी त्याचे हुबेहूब पडसाद समोरील व्यक्तीला स्पष्ट ऐकू येतात.
27. ‘अगा बैकुंठीच्या राया’ कवितेचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा?
उत्तर: ‘अगा बैकुंठीच्या राया’ ही संत कान्होपात्रा यांची अत्यंत भावपूर्ण अभंग रचना आहे. कान्होपात्रा या श्यामा नावाच्या कलावंतिणीच्या पोटी जन्मल्या होत्या. परंतु त्यांना आईचा व्यवसाय करायचा नव्हता, त्यांना विठ्ठल भक्तीचा ध्यास लागला होता. या अभंगात त्या विठ्ठलाला विष्णूनारायण, पुंडलिकवरदा आणि रखुमाईचा कांत अशा विविध नावांने आळवतात. त्या विनवणी करतात की, ‘मी हीन कुळात जन्मले असले तरी तू माझा पाठीराखा आहेस, तूच मला या संकटातून सोडव आणि माझी लाज राख.’ अशा प्रकारे त्यांनी आपली उत्कट भक्ती या अभंगातून मांडली आहे.
28. आकाशात ढग आल्यानंतरच्या दृष्याचे वर्णन करा ?
उत्तर: आकाशात काळे काळे ढग हवेत तरंगू लागले, जणू मोठ्या काळ्या रंगाची विमानेच हवेत क्षणभर विसावा घेत आहेत. वाऱ्याचे वाकडेतिकडे झोत सुरू झाले आणि ढगांतून पाण्याचे थेंब पडू लागले. जलधारांची दाटी हळूहळू वाढू लागली. शत्रूवर अचानक छापा घालून पुढे निघून जाणाऱ्या सैन्यासारखे ते ढग भराभरा पुढे चालले होते. त्यानंतर थोड्याच वेळात आकाशाचा निळा रंग पुन्हा प्रकट होऊ लागला, सूर्यप्रकाश पुन्हा पसरला आणि पूर्व क्षितिजावर एक प्रचंड व सुंदर इंद्रधनुष्य उमटले.
29. खालील कविता पूर्ण करा.
उत्तर:
“पिल्लास दुःख भारी,भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणासी?
जो तो तयास टोची, दावी उगाच धाक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक”
8. खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा
30. अ) जीवनाला समतोलपणा कसा येईल?
उत्तर: बलवान शरीर, निर्मळ व सतेज बुद्धी, आणि प्रेमळ परंतु प्रसंगी वज्राप्रमाणे कठोर होणारे हृदय या सर्वांची जीवनाच्या विकासात जरुरी आहे. तरच जीवनाला समतोलपणा येईल.
30. ब) बळाचे महत्त्व कसे सांगितले आहे?
उत्तर: ज्ञान आणि प्रेमाला संसारात आणण्यासाठी आणि जीवन सुंदर व सुखकर करण्यासाठी बळाची नितांत आवश्यकता आहे. दुर्बलाला काहीच करता येत नाही; बळ नसेल तर हिंडता फिरता येणार नाही, ज्ञान व अनुभव मिळणार नाही, म्हणून बळाची उपासना करावी असे ऋषी सांगतात.
पत्रलेखन
31. तुमच्या वाढदिवसाचे निमंत्रण देणारे पत्र मित्र / मैत्रिणीस लिहा.
उत्तर:

दिनांक: 25 मार्च 2026

प्रिय मित्र सुहास,

सप्रेम नमस्कार.
तू कसा आहेस? काका-काकूंना माझा नमस्कार सांग.

पुढच्या आठवड्यात, 2 एप्रिल रोजी माझा 14 वा वाढदिवस आहे, हे तुला आठवत असेलच. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मी घरी एक छोटी पार्टी आयोजित केली आहे. संध्याकाळी 6 वाजता केक कापण्याचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर आपण सगळे मित्र मिळून खूप खेळ खेळणार आहोत आणि मज्जा करणार आहोत.

माझ्या वाढदिवसाच्या या आनंदात तू सहभागी व्हावेस ही माझी खूप इच्छा आहे. तरी तू नक्की ये. मी तुझी वाट पाहीन.

तुझा मित्र,
प्रशांत
(पत्ता: रामनगर, बेळगाव – 590010)

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now