Class 7 Science LBA नमूना प्रश्नपत्रिका प्रकरण – 8. वनस्पतींचे पुनरुत्पादन (Reproduction in Plants)

Table of Contents

LBA 7th Science Model Question Papers हा ब्लॉगपोस्ट विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर शिक्षक, पालक आणि स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. विज्ञानातील प्रत्येक संकल्पनेचे व्यवहारज्ञान वाढवून शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायी करण्यासाठी ही मॉडेल प्रश्नपत्रिका महत्त्वाची भूमिका बजावतात.

LBA विज्ञान मॉडेल प्रश्नपत्रिकांचे महत्त्व

  • विद्यार्थ्यांना धड्याचे लर्निंग आऊटकम्स समजतात.
  • कठीण वाटणाऱ्या विज्ञान संकल्पना प्रश्नांच्या सरावातून सहज पक्क्या होतात.
  • परीक्षेची भीती दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो.
  • शिक्षकांनाही वर्गातील विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समजण्याची पातळी ओळखण्यात मदत होते.
  • नवीन LBA स्वरूपामुळे विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित होतात.

दिनांक: 14.08.2025 रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार –

  1.  पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वीसाठी 20 गुण विचारात घ्यावे.
  2.  भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक पाठ आणि एक कविता विचारात घ्यावी.
  3. इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक पाठ-आधारित मूल्यमापन करावे.
  4. इयत्ता 1 ते 5 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
  5. इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 7वी | विषय – विज्ञान | गुण: 20 | प्रकरण – 8. वनस्पतींचे पुनरुत्पादन (Reproduction in Plants)


I. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा: (1 Mark each)

  1. फलनानंतर परिपक्व बीजांड काय बनतो?
    A. फळ
    B. फूल
    C. पान
    D. खोड
  2. कोणते माध्यम परागीभवनासाठी मदत करत नाही?
    A. वारा
    B. पाणी
    C. कीटक
    D. प्रकाश
  3. स्त्रीकेसर फुलाचा कोणता भाग आहे?
    A. बीजांड
    B. पाकळी
    C. पुंकेसर
    D. देठ
  4. एकलिंगी फुलांमध्ये काय असते?
    i. पुंकेसर ii. स्त्रीकेसर iii. दोन्ही iv. वरीलपैकी एकच
    A. i, ii, iv
    B. i, ii
    C. फक्त iv
    D. फक्त ii
  5. पपई, काकडी या फळांमध्ये कोणत्या प्रकारची फुले असतात?
    A. उभयलिंगी
    B. एकलिंगी
    C. पु-बिजे
    D. स्त्री-बिजे
  6. संकरीत बियांचे फायदे कोणते?
    A. विक्री
    B. जास्त उत्पन्न
    C. फुले नसणे
    D. कमी उत्पन्न

II. खालील प्रश्नांची उत्तरे दोन-तीन वाक्यांत लिहा: (2 Marks each)

  1. परागीभवन म्हणजे काय?
  2. सर्व फुले फळे का देत नाहीत?

III. स्तंभ A आणि स्तंभ B जुळवा: (3 Marks)

AB
1. पक्षीi. पु युग्मके
2. बटाटाii. स्त्री युग्मके
3. बीजांडiii. वनस्पतीच्या कोंबापासून पुनरुत्पादन
4. परागकणiv. बियाणांच्या विखुरण्यास मदत करतात
*टीप: 3 गुणांसाठी चार जोड्या जुळवा.

IV. खालील प्रश्नाचे उत्तर तीन-चार वाक्यात द्या: (3 Marks)

  1. लैंगिक व अलैंगिक पुनरुत्पादनातील फरक स्पष्ट करा.

V. खालील प्रश्नाचे उत्तर चार-पाच वाक्यांत द्या: (4 Marks)

  1. फुलाचे भाग दाखवणारे आकृती काढून नावे लिहा.

अध्ययन निष्पत्ती

प्रकरण 8 – वनस्पतींचे पुनरुत्पादन

  1. वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाच्या पद्धती समजून घेतात.
  2. पुनरुत्पादनाचा अर्थ व आवश्यकता ओळखतात.
  3. लैंगिक व अलैंगिक पुनरुत्पादनातील फरक स्पष्ट करतात.
  4. फुलांचे मुख्य भाग ओळखून त्यांच्या कार्यांचे स्पष्टीकरण करतात.
  5. परागीभवन व फलन प्रक्रियेचे स्पष्टीकरण करतात.
  6. बियांचे विखुरणे विविध पद्धतीने कसे होते ते समजावतात.
  7. अलैंगिक पुनरुत्पादनाच्या विविध पद्धती ओळखतात.
  8. बीजापासून नवीन वनस्पती होण्याची प्रक्रिया समजावतात: बियाणे टाकणे → अंकुरण → वाढ→ नवीन वनस्पती.
  9. नैसर्गिक पद्धतीने नवीन वनस्पती निर्मितीचे महत्त्व समजावतात.

उत्तरांची सूची

I. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा: (1 Mark each)

  1. A. फळ
  2. D. प्रकाश
  3. A. बीजांड
  4. C. फक्त iv
  5. B. एकलिंगी
  6. B. जास्त उत्पन्न

II. खालील प्रश्नांची उत्तरे दोन-तीन वाक्यांत लिहा: (2 Marks each)

  1. परागीभवन म्हणजे काय?
    एका फुलातील परागकणांचे परागकोषापासून त्याच फुलातील किंजल्कापर्यंत वहन होणे किंवा दुसऱ्या फुलातील किंजल्कापर्यंत वहन होणे यालाच परागीभवन असे म्हणतात.

  2. सर्व फुले फळे का देत नाहीत?
    प्रत्येक फूल फळात रूपांतरित होत नाही कारण फळ तयार होण्यासाठी परागीभवन आणि त्यानंतर फलन होणे आवश्यक असते. या दोन्ही क्रिया यशस्वी न झाल्यास फूल फळात रूपांतरित होत नाही.

III. स्तंभ A आणि स्तंभ B जुळवा: (3 Marks)

1. पक्षी– iv. बियाणांच्या विखुरण्यास मदत करतात
2. बटाटा– iii. वनस्पतीच्या कोंबापासून पुनरुत्पादन
3. बीजांड– ii. स्त्री युग्मके
4. परागकण– i. पु युग्मके

उत्तर क्रम: 1-iv, 2-iii, 3-ii, 4-i

IV. खालील प्रश्नाचे उत्तर तीन-चार वाक्यात द्या: (3 Marks)

  1. लैंगिक व अलैंगिक पुनरुत्पादनातील फरक स्पष्ट करा:

    लैंगिक पुनरुत्पादन:

    • यात नर व मादी युग्मकांच्या संयोगाने नवीन वनस्पती निर्माण होते.
    • या पद्धतीत अनुवंशिक वैविधता आढळते.
    अलैंगिक पुनरुत्पादन:
    • यात एकाच वनस्पती भागापासून (उदा. मूळ, खोड, पान) नवीन वनस्पती वाढते.
    • या पद्धतीत अनुवंशिक वैविधता आढळत नाही.

V. खालील प्रश्नाचे उत्तर चार-पाच वाक्यांत द्या: (4 Marks)

  1. फुलाचे भाग दाखवणारे आकृती काढून नावे लिहा:
    फुलाचे मुख्य भाग खालीलप्रमाणे आहेत:

    • पाकळ्या: आकर्षक असतात आणि त्या कीटकांना आकर्षित करतात.
    • पुंकेसर – नर भाग: याचे भाग परागकोष व केसरतंतू असून तो पु-युग्मके (परागकण) तयार करतो.
    • स्त्रीकेसर – मादी भाग: याचे भाग किंजल्क, किंजल्कनलिका, बीजकोष आणि बीजांड असून यात स्त्री-युग्मके (बीजांड) असतो.
    विद्यार्थ्यांनी योग्य नावासह फुलाची सुबक आकृती काढणे अपेक्षित आहे.

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now