आधारित मूल्यमापन 2025-26 नमूना प्रश्नपत्रिका
दिनांक: 14.08.2025 रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार –
- पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वीसाठी 20 गुण विचारात घ्यावे.
- भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक पाठ आणि एक कविता विचारात घ्यावी.
- इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक पाठ-आधारित मूल्यमापन करावे.
- इयत्ता 1 ते 5 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
इयत्ता – 6वी
विषय – समाज विज्ञान
गुण – 20
24. आफ्रिका खंड
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 6वी | विषय – समाज विज्ञान | गुण: 20
पाठ 24. आफ्रिका खंड
Question Paper Blueprint
| Question Type | Objective (Marathi) | Difficulty Level | Marks per Question | No. of Questions | Total Marks |
|---|---|---|---|---|---|
| MCQ | ज्ञान (Knowledge), आकलन (Comprehension) | Easy, Average | 1 | 3 | 3 |
| Match the Following | ज्ञान (Knowledge) | Easy | 1 | 3 (Pairs) | 3 |
| Very Short Answer | ज्ञान (Knowledge), आकलन (Comprehension) | Easy, Average | 1 | 4 | 4 |
| Short Answer | आकलन (Comprehension), उपयोजन (Application) | Average, Difficult | 2 | 2 | 4 |
| Long Answer | आकलन , कौशल्य | Average, Difficult | 3 | 2 | 6 |
| TOTAL MARKS | 20 | ||||
प्रश्न 1: योग्य पर्याय निवडून लिहा. [Total Marks: 3]
- 1. आफ्रिका खंड कोणत्या नावाने ओळखला जातो?
- 2.कोणत्या अक्षांशामुळे आफ्रिका जवळजवळ समान प्रमाणात विभागला जातो?
- 3. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?
प्रश्न 2: योग्य जोड्या जुळवा. [Total Marks: 3]
| गट ‘अ’ | गट ‘ब’ |
|---|---|
| (1) आफ्रिकेतील सर्वात दक्षिणेकडील टोक | (a) सहारा वाळवंट |
| (2) नाईल नदीवर बांधलेले सर्वात मोठे धरण | (b) केप अगुलहास |
| (3) जगातील सर्वात मोठे वाळवंट | (c) अस्वान धरण |
प्रश्न 3: एका वाक्यात उत्तरे लिहा. [Total Marks: 4]
- 1.नाईल नदी कोणत्या खंडात आहे?
- 2.आफ्रिकेचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
- 3.आफ्रिकेतील ‘ग्रेट रिफ्ट व्हॅली’चा आकार कोणता आहे?
- 4.जगातील दुसरे सर्वात खोल सरोवर कोणते आहे?
प्रश्न 4: खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा. [Total Marks: 4]
- 1.आफ्रिकन खंडाच्या भौगोलिक स्थितीचे थोडक्यात वर्णन करा.
- 2.पाणी न पिणारा आफ्रिकेतील प्राणी कोणता आहे? तो पाणी का पीत नाही, याचे कारण सांगा.
प्रश्न 5: खालील प्रश्नांची प्रत्येकी चार ते पाच वाक्यांत उत्तरे लिहा. [Total Marks: 6]
- 1.आफ्रिकेतील प्रमुख नद्यांची नावे सांगा. (कोणत्याही तीन नद्यांची माहिती पुरेशी आहे.)
- 2.आफ्रिका खंडातील मूळ रहिवासी आणि सर्वाधिक तापमान नोंदवलेल्या प्रदेशाबद्दल माहिती लिहा.




