प्रत्येक वर्षी ५ सप्टेंबर रोजी भारतभर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. शाळा, महाविद्यालये व विविध संस्थांमध्ये शिक्षक दिन साजरा करताना भाषणाचे विशेष महत्त्व असते. या पोस्टमध्ये दिलेले भाषण तुम्हाला शाळा किंवा महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करताना नक्कीच उपयुक्त ठरेल.
शिक्षकांप्रति कृतज्ञता
आदरणीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो,
आज शिक्षक दिनानिमित्त मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. ५ सप्टेंबर हा दिवस आपण डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतो.
शिक्षक म्हणजे आपल्या आयुष्यातील असे दीपस्तंभ आहेत, जे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात. ते केवळ ज्ञान देत नाहीत, तर आपल्याला योग्य-अयोग्य यातील फरक शिकवतात आणि एक चांगला माणूस बनवतात.
आज आपण जे काही आहोत, त्यामागे आपल्या शिक्षकांचेच अथक परिश्रम आहेत. त्यांच्यामुळेच आपण स्वप्ने पाहण्याची आणि ती सत्यात उतरवण्याची हिंमत बाळगतो.
या विशेष दिवशी, मी माझ्या सर्व शिक्षकांचे आभार मानू इच्छितो. तुम्ही आम्हाला दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही तुमचे सदैव आभारी राहू.
सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद.


