SSLC अर्धवार्षिक परीक्षा सप्टेंबर 2025
नमूना प्रश्नपत्रिका
KSEAB ने 2025 च्या SSLC (Secondary School Leaving Certificate) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.त्यानुसार 12.09.2025 ते 18.09.2025 या कालावधीत इयत्ता दहावीची प्रथम सत्र परीक्षा होणार आहे.या परीक्षेची तयारी करण्यासाठी व सराव करण्यासाठी आम्ही खालील नमुना प्रश्नपत्रिका देत आहोत.ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे साधन आहेत, कारण त्यातून परीक्षेचे स्वरूप, प्रश्नांचे प्रकार आणि गुणदान पद्धती समजून घेता येईल. विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी याचा उपयोग होईल.
SSLC अर्धवार्षिक परीक्षा सप्टेंबर 2025
माध्यम – मराठी
नमूना प्रश्नपत्रिका
विषय – समाज विज्ञान
वेळ – 3 तास 15 मिनिटे
गुण – 80
SSLC अर्धवार्षिक परीक्षा सप्टेंबर 2025
नमूना प्रश्नपत्रिका
विषय – समाज विज्ञान
वेळ – 3 तास 15 मिनिटे गुण – 80
I. अपूर्ण वाक्ये / प्रश्नांसाठी प्रत्येकी चार पर्याय दिले आहेत. योग्य उत्तर निवडा व संपूर्ण उत्तर अक्षरासह लिहा. (8 × 1 = 8)
1. पहिल्या अँग्लो-मराठा युद्धाचा शेवट कोणत्या तहाने झाला?
2. पहिल्या अँग्लो-मैसूर युद्धाच्या शेवटी झालेला तह कोणता?
3. सार्वजनिक प्रशासनाचे जनक कोण?
4. “खरं तर, संपूर्ण मानवजाती एकच आहे” असे कोणी म्हटले?
5. संघटित कामगारांचे उदाहरण कोणते?
6. भारताचा सर्वात मोठा भौगोलिक विभाग कोणता?
7. अकराव्या पंचवार्षिक योजनेत कोणाला प्राधान्य देण्यात आले?
8. कोणत्या बँक खात्यात व्याज दिले जात नाही व सेवांसाठी शुल्क आकारले जाते?
II. प्रत्येकी एका वाक्यात उत्तर द्या: (8 × 1 = 8)
9. निळ्या पाण्याचे धोरण म्हणजे काय?
10. सहाय्यक सैन्य पध्दती म्हणजे काय?
11. जातीयवाद म्हणजे काय?
12. पूर्वग्रह म्हणजे काय?
13. भारताच्या हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते?
14. मातीची धूप म्हणजे काय?
15. सर एम. विश्वेश्वरय्या यांना “भारतीय आर्थिक योजनेचे पितामह” असे का म्हणतात?
16. बँकांची बँक कोणती?
III. प्रत्येकी दोन वाक्ये / चार मुद्दे लिहा: (8 × 2 = 16)
17. ब्रिटिश साम्राज्य विस्तारासाठी दत्तक वारस नामंजूर धोरणाने कशी मदत केली?
18. अमरसुळ्याच्या उठावाला “शेतकऱ्यांचे बंड” असे का म्हणतात?
19. “सार्वजनिक प्रशासन मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सेवा देते” – स्पष्टीकरण द्या.
20. अस्पृश्यता निर्मूलनासाठी घटनात्मक व कायदेशीर उपाय कोणते?
किंवा
बेरोजगारीची कारणे कोणती?
21. देशाच्या आर्थिक विकासात द्वीपकल्पीय पठाराची भूमिका स्पष्ट करा.
22. “भारतीय शेती ही मान्सूनचा जुगार आहे” – स्पष्ट करा.
23. नीती आयोगाची उद्दिष्टे कोणती?
24. बँक खाते उघडण्याच्या पायऱ्या कोणत्या?
IV. प्रत्येकी सहा वाक्यांमध्ये उत्तर द्या: (9 × 3 = 27)
25. प्लासीच्या युद्धाची कारणे व परिणाम लिहा.
26. भारतातील ब्रिटिश शिक्षणाचे परिणाम कोणते?
27. स्वामी विवेकानंदांचे योगदान स्पष्ट करा.
किंवा
कित्तूर स्वातंत्र्य संग्रामातील संगोळी रायन्नाचे योगदान सांगा.
28. निरक्षरता निर्मूलनासाठी उचललेली पावले लिहा.
29. संघटित व असंघटित कामगारांमधील फरक स्पष्ट करा.
30. काळी माती व लेटेराइट माती यांमध्ये फरक कसा?
31. वनसंवर्धनाच्या पद्धती कोणत्या?
किंवा
भारतातील महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उद्याने कोणती?
32. पंचवार्षिक योजनांची यशस्वी कामगिरी लिहा.
किंवा
— हरितक्रांतीची प्रेरक घटक कोणते?
33. बचत खाते व चालू खाते यात फरक कसा?
किंवा
बँकेची कार्ये कोणती?
V. प्रत्येकी आठ वाक्यांमध्ये उत्तर द्या: (4 × 4 = 16)
34. कृष्णराज वडेयर IV यांच्या कामगिरीचे वर्णन करा.
किंवा
— ब्रिटिश महसूल धोरणाचे भारतीयांवरील परिणाम स्पष्ट करा.
34. अॅनी बेझंट यांच्या सुधारणा कोणत्या?
35. ल्यूथर गुलिक यांच्या मते सार्वजनिक प्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करा.
36. बहुउद्देशीय नदी प्रकल्पांची उद्दिष्टे कोणती?
VI. नकाशावर दाखवा: (5 × 1 = 5)
37. भारताच्या नकाशावर खालीलपैकी कोणतेही पाच दाखवा:
प्रश्नपत्रिकेची नमूना उत्तरे येथे पहा.





