LBA Update Date – 14.08.2025
- पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वी साठी 20 गुण विचारात घ्यावे.
- भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक धडा आणि एक कविता विचारात घ्यावी.
- इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक धडा-आधारित मूल्यमापन करावे.
- इयत्ता 1 ते 5 वीच्या धडा-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- इयत्ता 8 ते 10 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील बहुपर्यायी आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- ‘मुरुसिंचन’ कार्यक्रम राबवणाऱ्या जिल्ह्यांनी इयत्ता 6 ते 10 वीसाठी हिंदी भाषा वगळता 15 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील आणि 05 गुणांसाठी ‘मुरुसिंचन’ कार्यक्रमातील प्रश्नांचा विचार करून एकूण 20 गुणांसाठी लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- पाठ-आधारित मूल्यमापन प्रश्न बँकेचा वापर शिकण्याच्या आणि मूल्यमापनाच्या प्रक्रियांमध्ये सतत करून विद्यार्थ्यांनी उत्तम शैक्षणिक प्रगती साधावी यासाठी कार्यवाही करावी.
इयत्ता – 9
विषय – मराठी
गुण – 20
गद्य 5 – मनाचे पिंज
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 9वी
विषय – मराठी
गुण – 20
गद्य 2 – राजे लोकीं बहुत सगुण असावे | पद्य 2 – सत्वर पाव गे मला
प्रश्नपत्रिकेची ब्लूप्रिंट (Question Paper Blueprint)
| उद्दिष्टानुसार प्रामुख्यता | गुण विभागणी | कठीण पातळीनुसार | गुण विभागणी |
|---|---|---|---|
| स्मरण (Knowledge) | 8 गुण (40%) | सोपे (Easy) | 14 गुण (70%) |
| आकलन (Understanding) | 7 गुण (35%) | मध्यम (Average) | 5 गुण (25%) |
| अभिव्यक्ती (Expression) | 5 गुण (25%) | कठीण (Difficult) | 1 गुण (5%) |
| एकूण (Total) | 20 गुण (100%) | एकूण (Total) | 20 गुण (100%) |
प्रश्न विभाग (20 Marks)
प्रश्न 1. खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा. (MCQ) (1 x 4 = 4 Marks)
- राजेलोकी बहुत सगुण असावे या पाठाचे मूल्य हे आहे.
- अ) देशभक्ती
- ब) कर्तव्यनिष्ठा
- क) देश प्रेम
- ड) भक्ती
- खजिना म्हणजे राज्याचे जीवन.
- अ) खजिना
- ब) जलसंपत्ती
- क) सैन्य
- ड) खनिजसंपत्ती
- ‘सत्वर पाव गे मला’ या कवितेचे कवी
- अ) संत ज्ञानेश्वर
- ब) संत तुकाराम
- क) संत एकनाथ
- ड) संत नामदेव
- सासऱ्याला.. हे रूपक वापरले आहे.
- अ) आशा
- ब) अहंकार
- क) वासना
- ड) जीव
प्रश्न 2. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. (1 x 8 = 8 Marks)
- राजाला कोणते व्यसन असू नये?
- ईश्वराचा क्षोभ केव्हा होईल?
- शिवाजी महाराजांचे अमात्य कोण झाले?
- उणी करणे म्हणजे काय?
- संत एकनाथ कोठे राहणारे होते?
- सासुरवाशिण कोणाकडे मागणे मागत आहे?
- संसाराच्या जाचाला कोण कंटाळले आहे?
- खरूज कोणाला होऊ दे, असे सासुरवाशिण म्हणते?
प्रश्न 3. खालील प्रश्नांची दोन/तीन वाक्यात उत्तरे लिहा. (2 x 3 = 6 Marks)
- ईश्वराने राजास का निर्माण केले?
- राजाला विनोदाचे व्यसन का नसावे?
- जीव रुपी सून भवानी आईला काय वाहू इच्छिते?
प्रश्न 4. खालील वाक्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण करा. (2 x 1 = 2 Marks)
- “राजे लोकास विनोदाचे व्यसन एकंदर नसावे”




