पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 4थी
विषय – गणित
गुण – 10
प्रकरण 5. गुणाकार
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
प्रकरण – 5 गुणाकार
प्रश्नपत्रिकेचा आराखडा
ज्ञान पातळी (Cognitive Level) | गुण | काठिण्य पातळी (Difficulty Level) | गुण |
---|---|---|---|
ज्ञान (Knowledge) | 5.5 (55%) | सोपे (Easy) | 5.5 (55%) |
आकलन (Understanding) | 3 (30%) | साधारण (Average) | 3 (30%) |
उपयोजन (Application) / कौशल्य (Skill) | 1.5 (15%) | कठीण (Difficult) | 1.5 (15%) |
एकूण (Total) | 10 | एकूण (Total) | 10 |
I. योग्य उत्तर निवडून रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी 1 गुण)
1. कोणत्याही संख्येला शून्य ने गुणल्यास उत्तर …….. येते. (सोपे)
अ) एक
ब) शून्य
क) तीच संख्या
ड) दहा
2. 9 + 9 + 9 = 9 × …….. = 27. रिकाम्या रकान्यात येणारी संख्या (सोपे)
अ) 3
ब) 9
क) 27
ड) 4
3. 6 × 8 = 48 यामधील गुण्य (multiplicand) …….. आहे. (सोपे)
अ) 48
ब) 6
क) 8
ड) 68
II. रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी 0.5 गुण)
4. 85 × …….. = 85. रिकाम्या जागी येणारी संख्या (सोपे)
5. 26 × 42 = 42 × …….. (सोपे)
6. 630 ला 1 ने गुणल्यानंतर येणारा गुणाकार …….. (सोपे)
7. 10 + 10 + 10 + 10 + 10 + 10 = 10 × …….. = 60 (सोपे)
8. 1560 ला शून्याने गुणल्यास येणारा गुणाकार …….. (सोपे)
III. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. (प्रत्येकी 1.5 गुण)
9. एका अंड्याची किंमत 6 रुपये असेल, तर एक डझन अंड्यांची किंमत किती? (साधारण)
10. एका पाकिटात दहा पेन मावतात. तर अशा 20 पाकिटात असणाऱ्या पेनांची संख्या किती? (साधारण)
IV. खालील समस्या सोडवा. (प्रत्येकी 1.5 गुण)
11. एका शालेय कार्यक्रमासाठी 900 रुपये खर्च येतो. तर अशा 11 शालेय कार्यक्रमासाठी किती खर्च येईल? (कठीण)
तोंडी परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न
- गुणाकार म्हणजे काय?
- एखाद्या संख्येला 1 ने गुणल्यास काय उत्तर येते?
- एखाद्या संख्येला 0 ने गुणल्यास काय उत्तर येते?
- 2 × 5 किती होतात?
- 10 रुपयांच्या 3 चॉकलेटची किंमत किती?
- ‘गुणक’ (multiplier) म्हणजे काय?
- ‘गुण्य’ (multiplicand) म्हणजे काय?
- ‘गुणलब्ध’ (product) म्हणजे काय?
- एका आठवड्यात 7 दिवस असतात, तर 2 आठवड्यात किती दिवस असतील?
- 5 × 100 किती होतात?