पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 4थी
विषय – गणित
गुण – 10
प्रकरण -2 संख्या
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
प्रकरण – 2 संख्या
प्रश्नपत्रिकेचा आराखडा
ज्ञान पातळी (Cognitive Level) | गुण | काठिण्य पातळी (Difficulty Level) | गुण |
---|---|---|---|
ज्ञान (Knowledge) | 4.5 (45%) | सोपे (Easy) | 4.5 (45%) |
आकलन (Understanding) | 3.5 (35%) | साधारण (Average) | 3.5 (35%) |
उपयोजन (Application) / कौशल्य (Skill) | 2 (20%) | कठीण (Difficult) | 2 (20%) |
एकूण (Total) | 10 | एकूण (Total) | 10 |
I. योग्य उत्तर निवडून लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
1. सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती? (सोपे)
अ) 1000
ब) 9009
क) 9999
ड) 1001
2. 3998 आणि 4000 च्या मधील संख्या कोणती? (सोपे)
अ) 3990
ब) 3991
क) 3999
ड) 4862
3. 4378 मधील 3 ची दर्शनी किंमत किती? (सोपे)
अ) 30
ब) 300
क) 13
ड) 3
II. रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी 1 गुण)
4. चार अंकी सर्वात लहान संख्या …….. आहे. (सोपे)
5. 7305 ही संख्या अक्षरी लिहा: …….. (साधारण)
6. 3695 मधील 6 ची दर्शनी किंमत …….. आहे. (सोपे)
III. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
7. अंकात लिहा: आठ हजार पंधरा. (सोपे)
8. खालील श्रेणीतील सोडलेल्या संख्या लिहा: 4308, ___, 4508, ___, 4708. (साधारण)
(प्रत्येकी 0.5 गुण)
9. 8425, 8450, 8475 या श्रेणीमधील संख्येमध्ये कितीचा फरक आहे? (कठीण)
IV. खालील समस्या सोडवा. (प्रत्येकी 1.5 गुण)
10. 5,1,0,4 हे अंक वापरून सर्वात लहान चार अंकी संख्या तयार करा (अंकांची पुनरावृत्ती न करता). (कठीण)
तोंडी परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न –
- सर्वात लहान एक अंकी संख्या कोणती?
- सर्वात मोठी दोन अंकी संख्या कोणती?
- 100 च्या आधी कोणती संख्या येते?
- 500 नंतर कोणती संख्या येते?
- स्थानिक किंमत म्हणजे काय?
- दर्शनी किंमत म्हणजे काय?
- 245 मध्ये दशक स्थानी कोणता अंक आहे?
- ‘एक हजार’ ही संख्या अंकात कशी लिहाल?
- ‘दोनशे पन्नास’ ही संख्या अंकात कशी लिहाल?
- ‘3, 6, 9’ हे अंक वापरून सर्वात मोठी संख्या कोणती तयार होईल? (अंकांची पुनरावृत्ती न करता)