पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 4थी
विषय – मराठी
गुण – 10
पाठ 11 पत्रलेखन
पाठ 12 बारा महिने
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 4थी
विषय – मराठी
गुण – 10
पाठ 11 पत्रलेखन, पाठ 12 बारा महिने
अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes)
- दिलेली कविता समजून घेणे कोणी केव्हा काय केले या सारख्या प्रश्नांचे उत्तर देणे.
- खेळाविषयीची आवड निर्माण होऊन प्रत्येकाच्या कौशल्याविषयीची पात्रतेनुसार होणारी प्रशंसा समजून घेतात.
- शिक्षणाचे महत्त्व समजून घेतात.
- निरक्षरतेचे दुष्परिणाम समजून घेतात.
- मिळालेल्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात वापर करतात.
- योग्य विरामचिन्हांचा वापर करतात.
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप (Blueprint)
कठीणतेची पातळी | गुण | शेकडा (%) |
---|---|---|
सुलभ | 6 | 60% |
साधारण | 2.5 | 25% |
कठीण | 1.5 | 15% |
एकूण | 10 | 100% |
प्रश्न 1ला: रिकाम्या जागा भरा.
1. झाडांना नव्या पालवीचा बहर ………………… महिन्यात येतो. (चैत्र, फाल्गुन) (1)
2. एका वर्षामध्ये एकूण ………………… महिने असतात. (दहा, बारा) (1)
प्रश्न 2रा: एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. वरील पत्र कोणी कोणास लिहिले? (1)
2. वर्षातील पहिला महिना कोणता? (1)
प्रश्न 3रा: योग्य जोड्या जुळवा.
अ.ब.
1. झाड – अ) पाणी(0.5)
2. पाणी – ब) गोपुरे(0.5)
3. आई – क) वृक्ष(0.5)
4. बाबा – ड) वडील(0.5)
5. गोपुरे – ई) जल(0.5)
1. झाड – अ) पाणी(0.5)
2. पाणी – ब) गोपुरे(0.5)
3. आई – क) वृक्ष(0.5)
4. बाबा – ड) वडील(0.5)
5. गोपुरे – ई) जल(0.5)
प्रश्न 4था: विरुद्धार्थी शब्द लिहा.
1. गरीब × ………………… (0.5)
2. लहान × ………………… (0.5)
प्रश्न 5वा: दोन-तीन वाक्यात उत्तर लिहा.
1. मुर्डेश्वरचा समुद्र किनारा कसा आहे? तेथे काय करता येते? (1.5)
तोंडी परीक्षेसाठी महत्त्वाचे 10 प्रश्न (प्रत्येक 1 गुण)
- झाडांना नव्या पालवीचा बहर कोणत्या महिन्यात येतो?
- सृष्टी हिरव्या रंगाने कधी नटलेली दिसते?
- झेंडूची फुले कशी दिसतात?
- भारतीय पंचांगाप्रमाणे येणारे महिने क्रमवार सांगा.
- कवितेतील ‘बहराचा’, ‘मोहराचा’ असे तालयुक्त शब्द सांगा.
- हिवाळ्यामधील चार महिन्यांची नावे सांगा.
- पावसाळ्यातील चार महिन्यांची नावे सांगा.
- तुम्हाला माहित असलेल्या सर्व फुलांची नावे सांगा.
- गुढीपाडवा कोणत्या महिन्यात येतो?
- वटपौर्णिमा कोणत्या महिन्यात येते?
4थी मराठी भाग -1 पाठावरील प्रश्नोत्तरे – येथे पहा
4थी परिसर अध्ययन भाग -1 पाठावरील प्रश्नोत्तरे – येथे पहा