LBA Update Date – 14.08.2025
- पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वीसाठी 20 गुण विचारात घ्यावे.
- भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक धडा आणि एक कविता विचारात घ्यावी.
- इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक धडा-आधारित मूल्यमापन करावे.
- इयत्ता 1 ते 5 वीच्या धडा-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- इयत्ता 8 ते 10 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील बहुपर्यायी आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- ‘मुरुसिंचन’ कार्यक्रम राबवणाऱ्या जिल्ह्यांनी इयत्ता 6 ते 10 वीसाठी हिंदी भाषा वगळता 15 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील आणि 05 गुणांसाठी ‘मुरुसिंचन’ कार्यक्रमातील प्रश्नांचा विचार करून एकूण 20 गुणांसाठी लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- पाठ-आधारित मूल्यमापन प्रश्न बँकेचा वापर शिकण्याच्या आणि मूल्यमापनाच्या प्रक्रियांमध्ये सतत करून विद्यार्थ्यांनी उत्तम शैक्षणिक प्रगती साधावी यासाठी कार्यवाही करावी.
इयत्ता – 10वी
विषय – मराठी
गुण – 20
गद्य 2 – वसईचा वेढा
पद्य 2 – रुक्मिणीचे श्रीकृष्णास पत्र
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 10वी
विषय – मराठी
गुण – 20
गद्य 2 – वसईचा वेढा | पद्य 2 – रुक्मिणीचे श्रीकृष्णास पत्र
प्रश्नपत्रिकेची ब्लूप्रिंट (Question Paper Blueprint)
| उद्दिष्टानुसार प्रामुख्यता | गुण विभागणी | कठीण पातळीनुसार | गुण विभागणी |
|---|---|---|---|
| स्मरण (Knowledge) | 8 गुण (40%) | सोपे (Easy) | 10 गुण (50%) |
| आकलन (Understanding) | 7 गुण (35%) | मध्यम (Average) | 7 गुण (35%) |
| अभिव्यक्ती (Expression) | 5 गुण (25%) | कठीण (Difficult) | 3 गुण (15%) |
| एकूण (Total) | 20 गुण (100%) | एकूण (Total) | 20 गुण (100%) |
विभाग अ: गद्य – वसईचा वेढा (10 Marks)
प्रश्न 1. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) (1 x 2 = 2 Marks)
- चिमाजी अप्पा कोकणपट्टीला स्वारीला निघाले. या वाक्याचा काळ—-
- अ) वर्तमान
- ब) अपूर्ण वर्तमान
- क) भूतकाळ
- ड) भविष्यकाळ
- माझे डोके किल्ल्यात पाडावे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
- अ) पंचमी
- ब) षष्ठी
- क) सप्तमी
- ड) संबोधन
प्रश्न 2. एका वाक्यात उत्तरे लिहा. (1 x 3 = 3 Marks)
- पेशव्यांनी वसईच्या किल्ल्यावर केव्हा ताबा मिळविला?
- वसईवर कोणाचा अमल होता?
- चिमाजी अप्पा कोणत्या स्वारीला निघाले?
प्रश्न 3. दोन/तीन वाक्यात उत्तरे लिहा. (2 x 2 = 4 Marks)
- फिरंग्याची बायको पाहून श्रीमंत काय म्हणाले?
- “मजला तोफेच्या तोंडी बांधून माझे डोके तरी किल्ल्यात पडावे.” संदर्भसहित स्पष्टीकरण करा.
प्रश्न 4. वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (1 Mark)
- काबीज करणे
विभाग ब: पद्य – रुक्मिणीचे श्रीकृष्णास पत्र (10 Marks)
प्रश्न 5. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) (1 x 2 = 2 Marks)
- विद्याधिकार या शब्दाचा संधी विग्रह असा होतो.
- अ) विद्य + अधिकार
- ब) विद्या + अधिकार
- क) विद्या + अधिकार
- ड) वि + अधिकार
- रुक्मिणीने श्रीकृष्णास वरले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
- अ) तृतीया
- ब) चतुर्थी
- क) पंचमी
- ड) संबोधन
प्रश्न 6. एका वाक्यात उत्तरे लिहा. (1 x 3 = 3 Marks)
- विदर्भ देशाच्या राजाचे नांव काय?
- रुक्मिणीने पती म्हणून कोणास वरले?
- “रुक्मिणीचे श्रीकृष्णास पत्र” या कवितेचे मूल्य काय?
प्रश्न 7. दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (2 x 2 = 4 Marks)
- “न लाविली कधीच विन्मुख याचिकाते” संदर्भसहित स्पष्टीकरण करा.
- श्रीकृष्णाची प्राप्ती न झाल्यास रुक्मिणी काय करणार आहे?
प्रश्न 8. गण पाडून वृत्त ओळखा. (1 Mark)
- घालील धाड शिशुपाल कळेना केव्हा





