पाठ आधारित मूल्यमापन 2025-26 नमूना प्रश्नपत्रिका
दिनांक: 14.08.2025 रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार –
- पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वीसाठी 20 गुण विचारात घ्यावे.
- भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक पाठ आणि एक कविता विचारात घ्यावी.
- इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक पाठ-आधारित मूल्यमापन करावे.
- इयत्ता 1 ते 5 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
इयत्ता – 7वी
विषय – विज्ञान
गुण – 20
पाठ 7 – प्राणी आणि वनस्पतीमधील वहन क्रिया
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
पाठ 7 – प्राणी आणि वनस्पतीमधील वहन क्रिया
Learning Outcomes (अध्ययन निष्पत्ती)
- प्राणी आणि वनस्पतींमधील वहन क्रिया आणि उत्सर्जन क्रिया समजून घेतात.
- प्राण्यातील उत्सर्जन पद्धती समजून घेतात.
- वनस्पतींमधील पाणी आणि पोषक घटकांची वहन क्रिया स्पष्ट करतात.
- वनस्पतींमधील आहाराच्या वहनामध्ये रसवाहिनी अथवा परिकाष्ठची भूमिका स्पष्ट करतात.
- मानवातील अभिसरण संस्थेचे भाग ओळखतात.
- रक्तातील मुख्य पेशी आणि त्यांचे कार्य स्पष्ट करतात.
- हृदयाचे कार्य आणि अभिसरण क्रिया समजून घेतात.
- लिम्फेटिक सिस्टीमचे महत्त्व स्पष्ट करतात.
- सजीवातील विविध वहन पद्धतींची तुलना करतात.
- रक्ताचे महत्त्व आणि आरोग्य अबाधित राखण्यामध्ये रक्ताची भूमिका स्पष्ट करतात.
- रक्तप्रवाहाच्या समस्यांबद्दल जागृती करतात. (उदाहरणार्थ: रक्तदाब, रक्तक्षय).
Question Paper Blueprint
| Learning Objective | Weightage (%) | Marks | Difficulty Level | Weightage (%) | Marks |
|---|---|---|---|---|---|
| Remembering (ज्ञान) | 25% | 5 | Easy (सोपे) | 30% | 6 |
| Understanding (आकलन) | 30% | 6 | Average (साधारण) | 50% | 10 |
| Application (उपयोजन) | 25% | 5 | Difficult (कठीण) | 20% | 4 |
| Skill (कौशल्य) | 20% | 4 | |||
| Total | 100% | 20 | Total | 100% | 20 |
I. योग्य उत्तर निवडा (1 × 4 = 4 गुण)
1. मानवी शरीरातील प्लाझ्मा स्वरूपातील द्रव पदार्थ कोणता?
अ) रक्त ब) पाणी क) पेशी ड) ऑक्सिजन (ज्ञान – सोपे)
2. शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रक्तातील पेशी कोणत्या?
अ) पांढऱ्या रक्तपेशी ब) लाल रक्तपेशी क) पिवळ्या रक्तपेशी ड) रक्तबिंबिका (ज्ञान – सोपे)
3. हृदयाच्या दोन कप्प्यांमधील झडपा कशास प्रतिबंध करण्यास मदत करतात?
अ) संप्रेरकांचे रक्तामध्ये मिसळणे ब) ऑक्सिजनयुक्त रक्त आणि कार्बन डाय-ऑक्साइडयुक्त रक्त यांचे मिसळणे क) पाणी आणि ऑक्सिजन ड) रक्त आणि मूत्र (आकलन – साधारण)
4. मानवामध्ये रक्ताचे पंपिंग करणारे इंद्रिय कोणते?
अ) यकृत ब) मूत्रपिंड क) हृदय ड) फुफ्फुस (ज्ञान – सोपे)
II. रिकाम्या जागा भरा. (1 × 4 = 4 गुण)
5. हृदयाला _______________ आकाराचे इंद्रिय म्हणतात. (ज्ञान – सोपे)
6. रक्तातील रंगहीन द्रव घटक _______________ आहे. (ज्ञान – सोपे)
7. वनस्पतींच्या आहाराचे वहन वनस्पतीच्या सर्व भागात करणारी वाहक ऊती _______________ आहे. (ज्ञान – सोपे)
8. रक्ताला लाल रंग येण्यास कारणीभूत घटक _______________ आहे. (ज्ञान – सोपे)
III. जोड्या जुळवा. (1 × 4 = 4 गुण)
9. स्तंभ ‘अ’ आणि स्तंभ ‘ब’ यांच्या जोड्या जुळवा.
| स्तंभ अ | स्तंभ ब | Difficulty |
|---|---|---|
| i) हृदय | a) रक्त शुद्धीकरण | (आकलन – साधारण) |
| ii) मूत्रपिंड | b) रक्ताचे पंपिंग | (आकलन – साधारण) |
| iii) प्रकाष्ठ | c) आहाराचे वहन | (आकलन – साधारण) |
| iv) परिकाष्ठ | d) पाणी आणि पोषक घटकांचे वहन | (आकलन – साधारण) |
IV. एक वाक्यात उत्तरे लिहा. (1 × 2 = 2 गुण)
10. रक्तातील द्रव घटकाचे नाव काय आहे? (ज्ञान – सोपे)
11. मानवी हृदयामध्ये किती कप्पे आहेत? (ज्ञान – सोपे)
V. दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (2 × 3 = 6 गुण)
12. रोहिणी आणि नीला यांच्यातील दोन फरक लिहा. (आकलन – साधारण)
13. हृदयाचे कार्य सांगा. (आकलन – साधारण)
14. प्रकाष्ठ आणि परिकाष्ठ यांच्यातील फरक स्पष्ट करा. (उपयोजन – कठीण)




