Class 7 Science LBA नमूना प्रश्नपत्रिका पाठ 4 – आम्ले, अल्कली आणि क्षार

दिनांक: 14.08.2025 रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार –

  1.  पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वीसाठी 20 गुण विचारात घ्यावे.
  2.  भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक पाठ आणि एक कविता विचारात घ्यावी.
  3. इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक पाठ-आधारित मूल्यमापन करावे.
  4. इयत्ता 1 ते 5 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
  5. इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.

पाठ 4 – आम्ले, अल्कली आणि क्षार

पाठ आधारित मूल्यमापन 2025-26

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 7वी विषय – विज्ञान गुण: 20

पाठ 4 – आम्ले, अल्कली आणि क्षार

Learning Outcomes (अध्ययन निष्पत्ती)

  • आम्ल आणि अल्कली यांच्यातील फरक जाणून घेतात.
  • दैनंदिन जीवनात उदासिनीकरणाचे उपयोग कसे करावे याची यादी करतात.
  • आम्ल आणि अल्कलीचा अर्थ समजून घेतात.
  • आम्ल, अल्कली आणि क्षारांची उदाहरणे देतात.
  • सूचकांमधील बदल ओळखण्यास शिकतात.
  • आम्ल-अल्कलीतील प्रतिक्रियांचा अभ्यास करतात (उदासिनीकरण).
  • आम्ल आणि अल्कलींचे दैनंदिन उपयोग जाणून घेतात.

Question Paper Blueprint

Learning ObjectiveWeightage (%)MarksDifficulty LevelWeightage (%)Marks
Remembering (ज्ञान)25%5Easy (सोपे)30%6
Understanding (आकलन)30%6Average (साधारण)50%10
Application (उपयोजन)25%5Difficult (कठीण)20%4
Skill (कौशल्य)20%4
Total100%20Total100%20

I. योग्य उत्तर निवडा (1 × 4 = 4 गुण)

1. खालीलपैकी या द्रावणात निळा लिटमस पेपर लाल होतो:
अ) सोडियम बायकार्बोनेटचे द्रावण ब) कॅल्शियम हैड्रॉक्साइडचे द्रावण क) पोटॅशियम हैड्रॉक्साइडचे द्रावण ड) हैड्रोक्लोरिक आम्ल (आकलन – कठीण)

2. अल्कलीची चव —- असते.
अ) आंबट ब) कडू क) गोड ड) खारट (ज्ञान – सोपे)

3. बेकिंग (खाण्याच्या) सोडयाचे रासायनिक नांव:
अ) सोडियम कार्बोनेट ब) सोडियम बायसल्फेट क) सोडियम बायकार्बोनेट ड) सोडियम क्लोराईड (ज्ञान – साधारण)

4. आवळ्यामध्ये हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते:
अ) जीवनसत्व A ब) जीवनसत्व C क) जीवनसत्व D ड) जीवनसत्व E (ज्ञान – सोपे)


II. रिकाम्या जागा भरा. (1 × 4 = 4 गुण)

5. लिंबाच्या रसात आढळणारे मुख्य आम्ल _______________ आहे. (ज्ञान – सोपे)

6. चिंचेमध्ये _______________ आम्ल असते. (ज्ञान – सोपे)

7. आम्ल आणि अल्कली यांच्या मिश्रणातून _______________ तयार होते. (आकलन – सोपे)

8. स्वयंपाकाच्या मिठामध्ये असलेले क्षार _______________ आहे. (ज्ञान – सोपे)


III. जोड्या जुळवा. (1 × 4 = 4 गुण)

9. स्तंभ ‘अ’ आणि स्तंभ ‘ब’ यांच्या जोड्या जुळवा.

स्तंभ अस्तंभ बDifficulty
i) हैड्रोक्लोरिक आम्लa) अल्कली(आकलन – कठीण)
ii) चुनखडीb) आम्ल + अल्कली(आकलन – साधारण)
iii) हळदc) नैसर्गिक सूचक(आकलन – साधारण)
iv) क्षारd) अन्नाचे पचन(आकलन – साधारण)

IV. एक वाक्यात उत्तरे लिहा. (1 × 2 = 2 गुण)

10. हळदीच्या सूचकाचा रंग कोणता असतो? (ज्ञान – सोपे)

11. क्षाराचे एक उदाहरण द्या. (ज्ञान – सोपे)


V. दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (2 × 3 = 6 गुण)

12. सूचक म्हणजे काय? दोन उदाहरणे लिहा. (आकलन – साधारण)

13. आम्ल आणि अल्कलीतील फरक लिहा. (आकलन – साधारण)

14. मुंगी चावल्यावर त्वचेवर कॅलामाइन द्रावण लावले जाते. का? (उपयोजन – कठीण)

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now