8 वी मराठी LBA नमुना प्रश्नपत्रिका

Table of Contents

CLASS – 8

MEDIUM – MARATHI 

SUBJECT – MAAY MARATHI

SYLLABUS – KARNATAKA STATE 

QUESTION BANK OF  LESSON BASED ASSESSMENT

फक्त सरावासाठी 

  1. सर्व प्रश्न फक्त LBA प्रश्नसंचातून घ्यावेत का?
     होयशिकवण्यापासून मूल्यमापनापर्यंत LBA प्रश्नांचा उपयोग करावा. प्रश्नपत्रिका स्वतः तयार करता येते.
  2. उर्दू माध्यमासाठी LBA प्रश्नसंच मिळेल का?
     होयत्याचे भाषांतर व रचना सुरू असून लवकरच उपलब्ध होईल.
  3. प्रत्येक पाठासाठी ब्लूप्रिंटनुसार प्रश्नपत्रिका तयार करावी का?
     होय,
    • इयत्ता ते 5: 10 लेखी + तोंडी = 15 गुण
    • इयत्ता ते 10: 20 लेखी
    • पुनः सिंचन (Marusinchan) असलेल्या जिल्ह्यांसाठी: LBA 15 + पुनः सिंचन 5 = 20 गुण

पाठ आधारित मूल्यमापन

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 8वी विषय – मराठी गुण: २०

पाठ 1. तो राजहंस एक

प्रश्नपत्रिकेचा आराखडा

उद्देश (ज्ञान पातळी)गुणकाठिण्य पातळीगुण
ज्ञान (Knowledge)6 (30%)सोपे (Easy)6 (30%)
समजून घेणे (Comprehension)6 (30%)मध्यम (Average)8 (40%)
उपयोजन (Application)4 (20%)कठीण (Difficult)6 (30%)
अभिव्यक्ती (Expression)4 (20%)एकूण20
एकूण20

I. योग्य पर्याय निवडा. (प्रत्येकी 1 गुण)

1. या कवितेत कोणत्या पक्षाचे वर्णन केले आहे?

  • अ) बदक
  • ब) पोपट
  • क) कावळा
  • ड) राजहंस

2. बदकाची पिल्ले कुठे राहत होती?

  • अ) तळ्यात
  • ब) पिंजऱ्यात
  • क) समुद्रात
  • ड) घरट्यात

3. या कवितेचा काव्य प्रकार कोणता आहे?

  • अ) प्रेमगीत
  • ब) देशगीत
  • क) भावगीत
  • ड) बालगीत

II. एका शब्दात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)

1. पिल्लाला कोणत्या कारणामुळे वाईट वागणूक मिळत होती?

2. पिल्लाला कोणत्या ठिकाणी त्याचे प्रतिबिंब दिसले?

3. राजहंस असल्याचे कळल्यावर पिल्लाच्या जीवनात काय उगवले?

III. खालील प्रश्नांची २-३ वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 3 गुण)

1. लोक हसून काय म्हणत असत?

2. पिल्लास कोणते दुःख होते?

IV. खालील प्रश्नांची २-३ वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 2 गुण)

1. राजहंस असल्याचे पिल्लाला केव्हा कळाले?

2. कुरूप पिल्लास इतर पिले कशी वागणूक देत असत?

V. खालील प्रश्नाचे उत्तर ५-६ वाक्यात लिहा. (4 गुण)

1. या कवितेचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.

पाठ आधारित मूल्यमापन

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 8वी विषय – मराठी गुण: २०

पाठ 2. दिव्य दृष्टी

प्रश्नपत्रिकेचा आराखडा

उद्देश (ज्ञान पातळी)गुणकाठिण्य पातळीगुण
ज्ञान (Knowledge)6 (30%)सोपे (Easy)8 (40%)
समजून घेणे (Comprehension)6 (30%)मध्यम (Average)8 (40%)
उपयोजन (Application)4 (20%)कठीण (Difficult)4 (20%)
अभिव्यक्ती (Expression)4 (20%)एकूण20
एकूण20

I. योग्य पर्याय निवडा. (प्रत्येकी 1 गुण)

1. ‘दिव्य दृष्टी’ या पाठाच्या लेखिका कोण आहेत? (सोपे)

  • A) श्रीमती शुभदा दादरकर
  • B) डॉ. विजया वाड
  • C) डॉ. विजया राणे
  • D) गौरी

2. गौरी आणि शिवांगी अंधशाळेच्या कुठे राहत होत्या? (सोपे)

  • A) घरात
  • B) वसतिगृहात
  • C) शाळेत
  • D) मंदिरात

3. ‘जिवाची मुंबई करणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय? (सोपे)

  • A) मुंबईत राहणे
  • B) खूप अभ्यास करणे
  • C) मौज-मजा करणे, चैन करणे
  • D) कामाला जाणे

II. रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी 1 गुण)

1. शारीरिक व्यंग असले तरी मनुष्याकडे _____________ शक्ती असते. (सोपे)

2. गौरी आणि शिवांगी एकाच वर्गात आणि खोलीत अंधशाळेच्या _____________ राहत असत. (सोपे)

3. एका माणसाने गौरीच्या आईच्या हाताला जोराचा _____________ दिला. (सोपे)

III. खालील प्रश्नांची २-३ वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 3 गुण)

1. गौरी आणि शिवांगीने मुंबई दर्शनमध्ये काय काय आणि कसे पाहिले? (कठीण)

2. शिवांगीने चोराला कशा पद्धतीने ओळखले? (कठीण)

IV. खालील प्रश्नांची २-३ वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 2 गुण)

1. गौरीला पळस्पेला काय काय खायला मिळणार होते? (मध्यम)

2. गौरी ‘जिवाची मुंबई’ कशी करणार होती? (मध्यम)

V. योग्य जोड्या जुळवा. (2 गुण)

  • 1. पळस्पे   A. समुद्राजवळील मोकळी जागा
  • 2. चौपाटी   B. कोकणातील एक गाव

VI. व्याकरण. (प्रत्येकी 1 गुण)

1. विरुद्धार्थी शब्द लिहा: अंधार

2. विरुद्धार्थी शब्द लिहा: सुरुवात

3. समानार्थी शब्द लिहा: मस्त

4. समानार्थी शब्द लिहा: हेर

पाठ आधारित मूल्यमापन

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 8वी विषय – मराठी गुण: २०

पाठ: 3. चल ऊठ रे मुकुंदा

प्रश्नपत्रिकेचा आराखडा

उद्देश (ज्ञान पातळी)गुणकाठिण्य पातळीगुण
ज्ञान (Knowledge)6 (30%)सोपे (Easy)8 (40%)
समजून घेणे (Comprehension)6 (30%)मध्यम (Average)8 (40%)
उपयोजन (Application)4 (20%)कठीण (Difficult)4 (20%)
अभिव्यक्ती (Expression)4 (20%)एकूण20
एकूण20

I. रिकाम्या जागा भरा. (1×4 = 4 Marks)

1. चल ऊठ रे मुकुंदा झाली _____________ झाली. (सोपे)

2. मंदावला कधीचा गगनात _____________ तारा. (सोपे)

3. तव गीत गात सारी ही _____________ उडाली. (मध्यम)

4. कुंजातल्या कळ्यानी केला तुला _____________. (मध्यम)

II. एका शब्दात उत्तरे लिहा. (1×2 = 2 Marks)

1. ‘चल ऊठ रे मुकुंदा’ या कवितेचे कवी कोण आहेत?

2. पहाट झाल्यावर चांदण्याला काय आली असे म्हटले आहे?

III. योग्य पर्याय निवडा. (1×2 = 2 Marks)

1. प्रस्तुत कवितेत कोणाला जागवत असल्याचे वर्णन केले आहे?

  • A) यशोदा
  • B) श्रीकृष्ण
  • C) राधा
  • D) गोपिका

2. पहाटवारा कसा आला?

  • A) वेगाने
  • B) चोरपावलांनी
  • C) मोठ्या आवाजाने
  • D) हळूच

IV. खालील प्रश्नांची २-३ वाक्यात उत्तरे लिहा. (2×3 = 6 Marks)

1. पहाटेचे निसर्ग सौंदर्य कवीने कसे वर्णन केले आहे?

2. कालिंदीचा किनारा श्रीकृष्णाला काय करत आहे?

V. योग्य जोड्या जुळवा. (1×2 = 2 Marks)

  • 1. चांदण्याला   A. मंदावला
  • 2. शुक्रतारा   B. जाग

VI. व्याकरण. (1×4 = 4 Marks)

1. विरुद्धार्थी शब्द लिहा: पहाट

2. विरुद्धार्थी शब्द लिहा: दूर

3. समानार्थी शब्द लिहा: गगन

4. समानार्थी शब्द लिहा: पाखरे

पाठ आधारित मूल्यमापन

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 8वी विषय – मराठी गुण: २०

पाठ: 4. सुखाची चव

प्रश्नपत्रिकेचा आराखडा

उद्देश (ज्ञान पातळी)गुणकाठिण्य पातळीगुण
ज्ञान (Knowledge)6 (30%)सोपे (Easy)8 (40%)
समजून घेणे (Comprehension)6 (30%)मध्यम (Average)8 (40%)
उपयोजन (Application)4 (20%)कठीण (Difficult)4 (20%)
अभिव्यक्ती (Expression)4 (20%)एकूण20
एकूण20

I. रिकाम्या जागा भरा. (1×4 = 4 Marks)

1. पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो आवाज कानावर यायचा ‘_____________’ (सोपे)

2. माठातलं _____________ घातलेलं पाणी असायचे. (सोपे)

3. नेमलेली पुस्तकं _____________ पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. (मध्यम)

4. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन _____________ पडतो. (मध्यम)

II. एका शब्दात उत्तरे लिहा. (1×2 = 2 Marks)

1. थंडी केव्हा कमी होत जायची? (सोपे)

2. पोस्टमनने कोणाला पत्र वाचून दाखविले? (सोपे)

III. योग्य पर्याय निवडा. (1×2 = 2 Marks)

1. होळी नंतर काय झपाट्याने कमी होत जायचे? (सोपे)

  • A) पाऊस
  • B) थंडी
  • C) गर्मी
  • D) वारा

2. अंगणात कोणते झाड होते? (मध्यम)

  • A) गुलाब
  • B) लिंबाचे
  • C) हजारी मोगऱ्याचे
  • D) तुळशीचे

IV. खालील प्रश्नांची २-३ वाक्यात उत्तरे लिहा. (2×3 = 6 Marks)

1. सुट्टीच्या आधीचा काळ भारावलेला का असतो? (मध्यम)

2. पोस्टमन कोरे पत्र का वाचत असे? (कठीण)

V. योग्य जोड्या जुळवा. (1×2 = 2 Marks)

  • 1. मोहोर      A. सफल
  • 2. सार्थक      B. आंब्याची फुले

VI. व्याकरण. (1×4 = 4 Marks)

1. विरुद्धार्थी शब्द लिहा: आनंद (सोपे)

2. समानार्थी शब्द लिहा: चाहूल (सोपे)

3. वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा: सार्थक होणे (मध्यम)

4. समानार्थी शब्द लिहा: प्रतिभा (कठीण)

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now