पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 5वी
विषय – मराठी
गुण – 10
पाठ – 9. दसरा झाला हसरा
पाठ – 10. मासा
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
पाठ 9 – दसरा झाला हसरा
पाठ 10 – मासा (कविता)
प्रश्नपत्रिकेचा आराखडा
ज्ञान पातळी (Cognitive Level) | गुण | काठिण्य पातळी (Difficulty Level) | गुण |
---|---|---|---|
ज्ञान (Knowledge) | 6 (60%) | सोपे (Easy) | 7 (70%) |
आकलन (Understanding) | 2 (20%) | साधारण (Average) | 2 (20%) |
अभिव्यक्ती (Expression) | 2 (20%) | कठीण (Difficult) | 1 (10%) |
एकूण (Total) | 10 | एकूण (Total) | 10 |
I. योग्य पर्याय निवडा. (प्रत्येकी 1 गुण)
1. दसरा या सणाचे दुसरे नाव काय?
- A) एकादशी
- B) द्वादशी
- C) विजयादशमी
- D) पाडवा
2. जलातला मासा कसा फिरत आहे?
- A) प्राण्यासारखा
- B) वाऱ्यासारखा
- C) पक्ष्यासारखा
- D) मुलांसारखा
II. रिकाम्या जागा भरा / एका शब्दात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
3. देवीची सिमोल्लंघनाची मिरवणूक निघणार म्हणून .ची पालखी सजवली होती. (रिकामी जागा भरा)
4. जलात राहून माशाला काय होत नाही? (एका शब्दात उत्तर लिहा)
III. जोड्या जुळवा. (1 गुण)
5. कवितेतील तालबद्ध शब्दांच्या जोड्या जुळवा.
- अ) जसा – अ) वरती
- ब) भिजला – ब) मासा
IV. समानार्थी शब्द लिहा. (प्रत्येकी 0.5 गुण)
6. जल = ________
7. पक्षी = ________
V. एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
8. फुलांचा उदबत्त्यांचा सुगंध कोठे दरवळत होता?
9. निळ्या आकाशात सहज कोण फिरते?
VI. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (2 गुण)
10. सतत पाण्यात राहून देखील माशाला ताप, सर्दी, खोकला का होत नाही?
तोंडी परीक्षेसाठी 10 प्रश्न –
1. दसरा कोणत्या राज्याचा प्रमुख सण आहे?
2. नवरात्र हा सण किती दिवस साजरा करतात?
3. दसरा हा सण कोणत्या जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करतात?
4. राधा सुट्टीच्या दिवशी काय विकत होती?
5. मासा या कवितेचे कवी कोण आहेत?
6. सळकन सुळकन कोण फिरते?
7. इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात?
8. माशाला जिवंत ठेवायचे असेल तर त्याला कशात ठेवले पाहिजे?
9. मासा पाण्यातून बाहेर काढल्यावर काय होते?
10. मासा पाण्यात सतत काय करत असतो?