पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 5वी
विषय – मराठी
गुण – 10
पाठ – 7. जादुगार (कविता)
पाठ – 8. हरवलेल्या पुस्तकाचे आत्मवृत्त
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
पाठ 7 – जादूगार
पाठ 8 – हरवलेल्या पुस्तकाचे आत्मवृत्त
प्रश्नपत्रिकेचा आराखडा
ज्ञान पातळी (Cognitive Level) | गुण | काठिण्य पातळी (Difficulty Level) | गुण |
---|---|---|---|
ज्ञान (Knowledge) | 6 (60%) | सोपे (Easy) | 6 (60%) |
आकलन (Understanding) | 2 (20%) | साधारण (Average) | 2 (20%) |
अभिव्यक्ती (Expression) | 2 (20%) | कठीण (Difficult) | 2 (20%) |
एकूण (Total) | 10 | एकूण (Total) | 10 |
I. योग्य पर्याय निवडा. (प्रत्येकी 1 गुण)
1. तऱ्हतऱ्हेचे चितारी रंग म्हणजे काय?
- A) पाऊस
- B) इंद्रधनुष्य
- C) आकाश
- D) चंद्र
2. विद्ये विना मती गेली ! मती विना नीती गेली हे वाक्य कोणी म्हटले?
- A) जॉनरस्किन
- B) महात्माफुले
- C) लोकमान्यटिळक
- D) स्वामीविवेकानंद
II. रिकाम्या जागा भरा / एका शब्दात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
3. जल या शब्दाचा अर्थ सांगा: ________
4. वाचाल तर………. (रिकामी जागा भरा)
III. जोड्या जुळवा. (1 गुण)
5. ‘अ’ गटातील शब्दांना ‘ब’ गटातील त्यांच्या अर्थाशी जुळवा.
- अ) इंद्रधनुष्य – अ) रुची
- ब) पखवाज – ब) गोड गाणी
IV. समान अर्थी शब्द लिहा. (प्रत्येकी 0.5 गुण)
6. नभ = ________
7. दुःख X ________
V. एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
8. मेघात काय वाजते?
9. पुस्तकाला अडगळीत कोणी टाकले?
VI. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा. (2 गुण)
10. पुस्तकाचे संरक्षण कसे करावे?
तोंडी परीक्षेसाठी 10 प्रश्न –
1.’जादूगार’ कवितेतील ‘तरु’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
2. ‘चितारने’ या शब्दाचा अर्थ सांगा.
3.’शिडकावा’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
4.मेघ’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
5.नभ’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
6.हरवलेल्या पुस्तकाचे आत्मवृत्त’ या पाठात ‘वाचाल तर वाचाल’ हे वाक्य कोणी सांगितले आहे?
7.पुस्तकाला कोणते कव्हर घातलेले आवडत नाही?
8.मती’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
9. ‘परिवर्तन’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
10. ‘दुःख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.