पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 5वी
विषय – मराठी
गुण – 10
पाठ – 5 वीर हुतात्मा नारायण
पाठ – 6. आपला मित्र साप
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
पाठ 5 – वीर हुतात्मा नारायण
पाठ 6 – आपला मित्र – साप
प्रश्नपत्रिकेचा आराखडा
ज्ञान पातळी (Cognitive Level) | गुण | काठिण्य पातळी (Difficulty Level) | गुण |
---|---|---|---|
ज्ञान (Knowledge) | 6 (60%) | सोपे (Easy) | 7 (70%) |
आकलन (Understanding) | 2 (20%) | साधारण (Average) | 2 (20%) |
अभिव्यक्ती (Expression) | 2 (20%) | कठीण (Difficult) | 1 (10%) |
एकूण (Total) | 10 | एकूण (Total) | 10 |
I. कंसातील योग्य पर्याय निवडून मोकळ्या जागा भरा. (प्रत्येकी 1 गुण)
1. (पाठ 5 – वीर हुतात्मा नारायण) भारत हा एक ________ देश आहे. [लहान, महान, भाग्यवान]
2. (पाठ 6 – आपला मित्र – साप) सगळेच साप ________ नसतात. (विषारी, बिनविषारी)
II. जोड्या जुळवा. (1 गुण)
3. ‘अ’ गटातील विरामचिन्हांची ‘ब’ गटातील त्यांच्या नावाशी जुळवा.
- 1) ! – अ) स्वल्पविराम
- 2) ? – ब) उद्गारवाचक चिन्ह
- 3) , – क) प्रश्नार्थक चिन्ह
III. खालील शब्दांचे वचन बदला. (प्रत्येकी 1 गुण)
4. नदी – ________
5. फुले – ________
IV. एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
6. नारायण कोणत्या शाळेत शिकत होता?
7. मोर्चा मधील लोक कोणाला चालते व्हा म्हणत होते?
8. साप शेतकऱ्यांचा मित्र कसा?
V. खालील वाक्य कोणी कोणास म्हटले आहे ते लिहा. (2 गुण)
9. “ब्रिटिशांनो चालते व्हा, भारत माता की जय, वंदे मातरम.”
तोंडी परीक्षेसाठी 10 प्रश्न –
1. नारायणने कोणता शब्द उच्चारून प्राण सोडला?
2. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?
3. आजही हुबळी शहरात कोणाचे नाव आदराने घेतले जाते?
4. नारायणचे डोळे कसे होते?
5. साप शेतकऱ्यांचा शत्रू आहे का? (चूक की बरोबर सांगा)
6. वाक्यातील एखाद्या शब्दाला अधिक महत्त्व दिले जाते; त्या शब्दाला कोणते चिन्ह देतात?
7. ‘भक्ष्य’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
8. ‘दंश करणे’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
9. बिनविषारी साप आपल्या भक्ष्याला कसे मारतात?
10. गावातील लोक सर्पमित्र म्हणून कोणाला ओळखत ?