CLASS – 5
MEDIUM – MARATHI
SUBJECT – MATHS
SYLLABUS – KARNATAKA STATE
QUESTION BANK OF LESSON BASED ASSESSMENT
कर्नाटक राज्यातील सर्व शाळांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून ‘पाठ-आधारित मूल्यमापन परीक्षा’ (Lesson Based Assessment – LBA) प्रणाली अंमलात येणार आहे. हा बदल शिक्षण गुणवत्तेत वाढ करेल का, याबद्दल शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे.
काय आहे नवीन प्रणालीचा उद्देश?
सध्या सरकारी शाळांमध्ये रचनात्मक मूल्यमापन (FA – Formative Assessment) आणि संकलनात्मक मूल्यमापन (SA – Summative Assessment) या पद्धती वापरल्या जातात. नव्या LBA प्रणालीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या आकलनाची आणि त्यांच्या शिकण्याच्या गुणवत्तेची सातत्याने खात्री करणे हा आहे. प्रत्येक पाठ किंवा अध्याय शिकवून झाल्यानंतर लगेचच छोटी चाचणी घेतल्याने विद्यार्थ्यांना विषय किती समजला हे स्पष्ट होईल. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ परीक्षांच्या गुणांसाठी नव्हे, तर खऱ्या अर्थाने ज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. भविष्यात होणाऱ्या बोर्ड परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवण्यासाठी ही सुरुवातीपासूनची मूल्यमापन पद्धत उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने व्यक्त केली आहे.
अंमलबजावणी आणि स्वरूप:
ही घटक चाचणी पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (DSERT) या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका तयार करून शाळांना पुरवेल. शाळांना या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मिळालेले गुण ‘SATS’ पोर्टलवर (Student Achievement Tracking System) अपलोड करावे लागतील, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेणे सोपे होईल.
प्रत्येक चाचणी ३० गुणांची असेल आणि त्यात २५ प्रश्न असतील. प्रश्नपत्रिकेची रचना विशिष्ट प्रमाणात सोपे, सामान्य आणि कठीण प्रश्नांच्या मिश्रणाने केली जाईल:
- ६५% सोपे प्रश्न
- २५% सामान्य प्रश्न
- १०% कठीण प्रश्न
बहुतेक प्रश्न बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे असतील, जेणेकरून विद्यार्थ्यांचे आकलन तपासणे सोपे होईल. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रिकाम्या जागा भरणे, चित्रांना रंग भरणे, जोड्या जुळवा आणि गटात न बसणारा शब्द ओळखणे असे मनोरंजक प्रश्न असतील.
सदर प्रश्नावली DSERT च्या इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर आहे.
प्रकरण : २
बेरीज
I) योग्य उत्तरे निवडा.
- 20,000+30,000= (सोपे)
A) 50,000
B) 60,000
C) 20,000
D) 40,000
- 40,000+12,000= (सोपे)
A) 62,000
B) 52,000
C) 32,000
D) 12,000
- 10,000+20,000= (सोपे)
A) 50,000
B) 30,000
C) 80,000
D) 60,000
- 5,000+15,000= (सोपे)
A) 50,000
B) 60,000
C) 40,000
D) 20,000
- 40,000+3,000= (सोपे)
A) 63,000
B) 43,000
C) 53,000
D) 13,000
II) योग्य संख्यांनी रिकाम्या जागा भरा
- 69,000+……=70,000 (सोपे)
- ………+19,500=20,000 (सोपे)
- ………+45,000=48,000 (सोपे)
- ………+50,000=52,000 (सोपे)
- 39,000+……=39,900 (सोपे)
- 28,000+………=32,000 (सोपे)
III) जोड्या जुळवा
- 38,000+2,000 a) 50,600 (सोपे)
- 59,000+1,000 b) 62,000 (सोपे)
- 60,000+2,000 c) 60,000 (सोपे)
- 28,000+2,200 d) 18,500 (सोपे)
- 13,000+15,500 e) 40,000 (सोपे)
- 44,000+6,600 f) 30,200 (सोपे)
IV) खालीलपैकी प्रत्येकाची बेरीज शोधा (2 गुण)
- 36,417+3,253 (मध्यम)
- 28,490+61,306 (मध्यम)
- 12,973+46,016 (मध्यम)
- 23,462+52,304 (मध्यम)
- 42,806+34,063 (मध्यम)
- 18,202+11,304 (मध्यम)
- 52,320+10,000 (मध्यम)
- 12,432+34,131 (मध्यम)
- 12,403+13,524 (मध्यम)
- 40,000+34,269 (मध्यम)
V) खालीलपैकी प्रत्येकाची बेरीज शोधा (3 गुण)
- 36,907+53,613 (मध्यम)
- 24,596+36,578 (मध्यम)
- 43,374+36,634 (मध्यम)
- 25,700+2,246+16,413 (मध्यम)
- 60,000+2,400+28,500 (मध्यम)
- 34,000+4,000+12,000 (मध्यम)
- 9,000+12,000+3,000 (मध्यम)
- 11,000+2,900+3,900 (मध्यम)
- 16,000+25,666+14,729 (मध्यम)
- 15,000+66,666+10,000 (मध्यम)
VI) खालील गणिते सोडवा (4 गुण)
- एका गावातील लोकसंख्या 12,389 आहे. दुसऱ्या गावातील लोकसंख्या 11,089 आहे. दोन्ही गावांची एकूण लोकसंख्या शोधा. (मध्यम)
- सोमवारी रहीमने त्याच्या खात्यात रु. 44,500 जमा केले. मंगळवारी रहीमने त्याच्या खात्यात रु. 24,320 जमा केले. त्याने जमा केलेली एकूण रक्कम शोधा. (मध्यम)
- एका पुस्तक विक्रेत्याने पुस्तक प्रदर्शनात पहिल्या दिवशी 26,817 पुस्तके विकली. आणि प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी त्याने 17,794 पुस्तके विकली. त्याने विकलेल्या एकूण पुस्तकांची संख्या शोधा. (कठीण)
- वन संरक्षित क्षेत्रात 26,759 झाडे होती. वनमहोत्सवामध्ये 13,842 झाडे लावण्यात आली. वन संरक्षित क्षेत्रातील एकूण झाडांची संख्या किती आहे? (कठीण)
- एका सहकारी दूध डेअरीने एका आठवड्यात शेतकऱ्यांकडून 15,029 लिटर दूध गोळा केले आणि पुढील आठवड्यात 16,826 लिटर दूध गोळा केले. दोन आठवड्यांत शेतकऱ्यांकडून किती लिटर दूध गोळा केले गेले? (कठीण)
- एका भारतीय क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये 14,025 धावा आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 15,759 धावा केल्या. त्या क्रिकेटपटूने एकूण किती धावा केल्या? (कठीण)
- एका शहरातील सार्वजनिक ग्रंथालयात कन्नडमध्ये 19,743 पुस्तके, हिंदीमध्ये 14,635 पुस्तके आणि इंग्रजीमध्ये 10,284 पुस्तके आहेत. ग्रंथालयात एकूण किती पुस्तके आहेत? (कठीण)
- एका बाईक शोरूमने जानेवारीमध्ये 11,258 बाईक्स, फेब्रुवारीमध्ये 22,458 बाईक्स आणि मार्चमध्ये 16,598 बाईक्स विकल्या. तर एकूण किती बाईक्स विकल्या गेल्या? (कठीण)
- एका शेतकऱ्याच्या बागेत 15,698 नारळाची रोपे आणि 20,498 सुपारीची रोपे आहेत. त्याच्या बागेतील एकूण रोपे किती आहेत? (कठीण)
- एका कापड व्यापाऱ्याने मार्चमध्ये रु. 28,598 किमतीचे कपडे आणि एप्रिलमध्ये रु. 40,560 किमतीचे कपडे विकले. त्याने विकलेल्या कपड्यांची एकूण रक्कम किती होती? (कठीण)
- तालुक्यात पुरुषांची संख्या 28,000, स्त्रियांची संख्या 26,800 आणि मुलांची संख्या 20,800 आहे. त्या तालुक्यातील एकूण लोकसंख्या किती आहे? (कठीण)
- जत्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रदर्शनात 15,500 तिकिटे विकली गेली. जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रदर्शनात 17,500 तिकिटे विकली गेली. विकलेल्या तिकिटांची एकूण संख्या किती आहे? (कठीण)
- स्पर्धा परीक्षा दिलेल्या मुलांची संख्या 29,890 आहे. मुलींची संख्या 30,188 आहे. स्पर्धा परीक्षा दिलेल्या मुलांची एकूण संख्या किती आहे? (कठीण)




