6वी समाज विज्ञान
23.युरोप खंड
इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2024 सुधारित
विषय – स्वाध्याय
पाठ 23 – युरोप खंड
I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा:
- युरोपला आशियाचे पर्यायी द्वीप म्हणतात.
- युरोपचा प्रमुख पर्वत आल्प्स पर्वत आहे.
- युरोपच्या हवामानावर प्रभाव पाडणारा प्रवाह गल्फ स्ट्रीम आहे.
- युरोपचे प्रमुख पीक गहू आहे.
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
1. युरोपचे भौगोलिक स्थान सांगा.
युरोप खंड 10° पश्चिम ते 60° पूर्व रेखांशांदरम्यान आणि 36° उत्तर ते 72° उत्तर अक्षांशांदरम्यान पसरलेला आहे. हा भारताच्या विस्ताराच्या तिप्पट आहे.
2. युरोपचे स्वाभाविक विभाग सांगा.
युरोपचे 4 स्वाभाविक विभाग आहेत:
- वायव्येचा उंच प्रदेश
- उत्तर युरोपमधील मैदाने
- मध्य भागातील उंच प्रदेश
- दक्षिणेकडील पर्वतमय प्रदेश
3. युरोपमधील हवामानाचे प्रमुख प्रदेश कोणते?
युरोपमधील हवामानाचे 4 प्रमुख प्रदेश आहेत:
- वायव्य युरोपचा सागरी हवामानाचा प्रदेश
- खंडांतर हवामानाचा प्रदेश
- भूमध्य समुद्रकिनारी हवामानाचा प्रदेश
- आल्प्स पर्वतांमधील थंड हवामानाचा प्रदेश
4. युरोपमधील नैसर्गिक वनस्पतींचे प्रमुख विभाग सांगा.
युरोपमधील नैसर्गिक वनस्पतींचे विभाग:
- उत्तर भागात शीतकटिबंधीय अरण्य
- मध्य युरोपमध्ये मिश्र अरण्य
- दक्षिण भागात भूमध्यकटिबंधीय वनस्पती
5. युरोपमधील दुग्धव्यवसायातील प्रमुख देशांची नावे लिहा.
स्वित्झर्लंड, डेन्मार्क, नेदरलँड (हॉलंड), आणि फ्रान्स हे युरोपमधील प्रमुख दुग्धव्यवसाय करणारे देश आहेत.
6. युरोपमधील प्रमुख आहार धान्ये कोणती?
गहू, बार्ली, ओट्स, आणि मका ही युरोपमधील प्रमुख आहार धान्ये आहेत.
7. युरोपमधील मासेमारीचे प्रमुख विभाग सांगा.
युरोपमधील प्रमुख मासेमारी विभाग:
- उत्तर समुद्र
- आर्क्टिक महासागर
- अटलांटिक महासागर
8. युरोपमधील प्रमुख खनिजे कोणती?
युरोपमधील प्रमुख खनिजे:
- कोळसा
- लोखंड
- बॉक्साईट
- तांबे