6वी समाज विज्ञान
20. राष्ट्रीय एकात्मता
इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2024 सुधारित
विषय – स्वाध्याय
पाठ 20. राष्ट्रीय एकात्मता
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
1. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय?
उत्तर – राष्ट्रीय एकात्मता म्हणजे सर्व नागरिकांमध्ये आम्ही सर्व एक आहोत ही भावना निर्माण होणे. यात जात, धर्म, लिंग, आणि प्रांत यांचा कोणताही भेदभाव नसतो. परस्परांचा आदर आणि सहकार्याने राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प हा राष्ट्रीय एकात्मतेचा आधार असतो.
2. विविधता म्हणजे काय?
उत्तर – विविधता म्हणजे वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, धर्म, वेषभूषा, आचार-विचार आणि जीवनशैली असणाऱ्या समाजाचे एकत्र अस्तित्व. भारत हे विविधतेने नटलेले राष्ट्र आहे, जिथे नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता दिसून येते.
3. भारताच्या एकात्मतेसाठी पोषक अंशांची यादी करा.
- धर्मनिरपेक्षता: सर्व धर्मांना समान संधी देणे.
- प्रजासत्ताक: जात, धर्म, लिंग यावर आधारित भेदभाव न करता समान अधिकार देणे.
- राष्ट्रीय सण: सर्व भारतीय एकत्र साजरे करतात.
- राष्ट्रीय चिन्हे: राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय प्राणी यामुळे एकात्मतेची भावना बळकट होते.
- परस्पर सहकार्य: केंद्र व राज्य सरकारांचे एकत्र कार्य.
4. जातीयवाद एकतेला कसा मारक ठरतो? चर्चा करा.
उत्तर – जातीयवाद म्हणजे दुसऱ्या जातीपेक्षा स्वतःची जात श्रेष्ठ मानणे. ही संकुचित भावना लोकांमध्ये दुरावा निर्माण करते आणि समाजात अशांती पसरवते. यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होतो. जातीयवादामुळे देशाच्या प्रगतीस अडथळा येतो.
गटात चर्चा करा आणि उत्तरे द्या
राष्ट्रीय भावैक्यता साधण्यासाठी कोणते निर्दिष्ट उपाय करू शकतो?
- सर्व धर्म आणि जातींचा आदर करण्याची सवय लावावी.
- शिक्षणाच्या माध्यमातून एकात्मतेचे महत्व पटवून द्यावे.
- राष्ट्रीय सण आणि कार्यक्रमांमध्ये सामूहिक सहभाग वाढवावा.
- जातीयता, धार्मिक वाद आणि प्रादेशिक मतभेद दूर करण्यासाठी संविधानाचे पालन करावे.
- युवकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करावे.