दिनांक 01.10.2024 रोजी आयुक्त कार्यालय शाळा शिक्षण विभाग कर्नाटक सरकार यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व सरकारी शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेच्या विद्युत कनेक्शनची माहिती ऑनलाइन नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.सविस्तर माहिती व आदेश पुढीलप्रमाणे –
कर्नाटकातील सर्व सरकारी शाळा,महाविद्यालयांना मोफत विद्युत देण्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली होती.या उपक्रमाचा उद्देश शाळांना आवश्यक सुविधा पुरवून शिक्षणाचा दर्जा वाढवणे आहे. शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेच्या विद्युत कनेक्शनची माहिती ऑनलाइन नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:-
विषय : राज्यातील सर्व सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांना मोफत विद्युत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत.
राज्यातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांना मोफत वीज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संदर्भातील आदेश (१ व ३) जारी केला आहे.प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.सदर योजना अधिक अचूकपणे आणि यशस्वीपणे राबविण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक नागरी सेवा वितरण संचालनालयाने (EDCS) एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे, या सॉफ्टवेअरचा वापर करून मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेतील वीज कनेक्शनचे तपशील ऑनलाइन नोंदवावे लागतील.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या सरकारी शाळांच्या मुख्याध्यापकांना या लिंकवर क्लिक करून शालेय शिक्षण विभागाच्या Website schooleducation.karnataka.gov.in या वेबपेजवर अर्ज करण्यास सांगितले आहे.सदर लिंकवर क्लिक केल्यावर सेवासिंधू पोर्टल उघडले जाईल.या वेबपेजच्या होम पेजवर शाळेच्या मुख्याध्यापकांनी खालील पायऱ्याप्रमाणे नोंदणी करावी.
ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया खालीलप्रमाणे –
- नोंदणीसाठी खालील ऑनलाईन नोंदणी लिंकवर स्पर्श करा..
2. वरील ऑनलाईन नोंदणी लिंकवर क्लिक केल्यास खालील पेज ओपन होईल.या पेजवर संबंधित जागेत संबंधित सरकारी शाळेचा U-Dise क्रमांक टाकल्यावर, शाळेचे नाव, पत्ता आणि शाळेच्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर आणि शाळेशी संबंधित तपशील प्रदर्शित होईल.
तो सर्व तपशील बरोबर असल्याची खात्री करावी.
2. दिलेल्या U-DISE शी लिंक केलेल्या मोबाईल नंबर/शाळेच्या मुख्याध्यापकाच्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP (वन टाइम पासवर्ड) एंटर करा.सर्व माहिती तपासू व्हॅलिडेट बटणावर क्लिक करा.
3. त्यानंतर शाळेमध्ये ज्या इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड (ESCOM) चे कनेक्शन आहे ती कंपनी निवडा आणि शाळेच्या वीज बिलात नमूद केलेला खाते क्रमांक अचूकपणे नोंद करा.
4. माहिती बरोबर असल्याची Validate करण्यासाठी Validate बटणावर क्लिक करा.
5. शेवटी योग्यरित्या Captcha टाईप करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
6. पोचपावती Acnowledgement Slip सेव्ह करा किंवा मुद्रित करा.
राज्यातील सर्व सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी 10/10/2024 पर्यंत न चुकता आपल्या शाळेतील विद्युत जोडणीचा तपशील नोंद करणे आवश्यक आहे.