Shiksha Saptah शिक्षण सप्ताह

विषय : “शिक्षण सप्ताह साजरा करणेबाबत..
दिनांक 22 ते 28 जुलै,2024

Celebration of “Shiksha Saptah” from 22nd to 28th July, 2024 on the eve of 4th anniversary of National Education Policy (NEP) 2020
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै, 2024 या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करणेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्र. 1 नुसार कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक,धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.

अ.नं.वार दिनांक उपक्रम
1सोमवार22-07-2024अध्ययन अध्यापन साहित्य दिवस (TLM Day)
2मंगळवार23-07-2024मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस (FLN Day)
3बुधवार24-07-2024क्रीडा दिवस (Sports Day)
4गुरुवार25-07-2024सांस्कृतिक दिवस (Cultural Day)
5शुक्रवार26-07-2024कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस (Skilling and Digital Initiatives Day)
6शनिवार27-07-2024मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम / शालेय पोषण दिवस (Eco Clubs for Mission LIFE/ School Nutrition Day)
7रविवार28-07-2024समुदाय सहभाग दिवस (Community involvement Day)

आम्ही प्रतिज्ञा करतो की,आम्ही सर्वजण कर्नाटकातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्ये आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत.आपण सारे मिळून,आपल्या मुलांसाठी निखळ आनंददायी समृद्ध अनुभवाच्या संधी देणारी,अभिव्यक्तीचं आकाश खुलं करणारी, मुक्त छंद जीपासणारी,नेतृत्वाच्या संधी देणारी आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया.
आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनवूया. जिथे बालके अर्थपूर्ण याचन हेतुपूरक लेखन व गणिती व्यवहार प्रत्यक्ष जीवनात उतरवतील आणि आयुष्यभर विदयार्थी राहतील…
अशाप्रकारे,कर्नाटकातील प्रत्येक बालकास आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन ‘निपुण बालक’ घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत

CLICK HERE TO DOWNLOAD CIRCULAR

दिवस – पहिला उपक्रमानुसार मार्गदर्शक सुचना व कृतींची यादी – येथे क्लिक करा..

Share with your best friend :)