7वी समाज विज्ञान
प्रकरण 11 – भारताचे स्वाभाविक विभाग
इयत्ता – सातवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2022 सुधारित
विषय – स्वाध्याय
अभ्यास
1. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1. लोकसंख्या आणि क्षेत्रफळ यामध्ये जगात भारत कोणत्या स्थानावर आहे?
उत्तर – भारत लोकसंख्येने जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि क्षेत्रफळाने जगात सातव्या क्रमांकावर आहे.
2. भारताचे भौगोलिक स्थान सांगा.
उत्तर – भौगोलिक दृष्ट्या भारत उत्तर गोलार्धात आहे.भारत उत्तरेला काश्मीरपासून दक्षिणेला कन्याकुमारी भूशिरापर्यंत तसेच पश्चिमेला कच्छपासून पूर्वेला अरुणाचल प्रदेशपर्यंत विस्तारलेला आहे.
3. लोकसंख्या आणि क्षेत्रफळामध्ये भारतात कर्नाटक कोणत्या स्थानावर आहे ?
उत्तर – लोकसंख्येने भारतात कर्नाटक नवव्या स्थानावर आहे व क्षेत्रफळाने आठव्या स्थानावर आहे.
4. कर्नाटकाच्या शेजारील राज्यांची यादी करा.
कर्नाटकाच्या शेजारी येणारी राज्य-:
उत्तरेला – महाराष्ट्र
पूर्वेला – आंध्र प्रदेश आणि तेलंगणा
नैऋत्येला – केरळ राज्य
5. भारताच्या स्वाभाविक विभागांची नावे सांगा.
उत्तर – भारताचे 4 भौगोलिक विभाग खालीलप्रमाणे-:
1. उत्तरेकडील पर्वत
2.उत्तरेकडील मैदाने
3.पठारी प्रदेश
4.किनारपट्टीवरील मैदाने
6. भारतामध्ये किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत ?
भारतामध्ये 28 राज्ये 9 केंद्रशासित प्रदेश आहेत.
7. कर्नाटकात किती जिल्हे आहेत ?
कर्नाटकात 31 जिल्हे आहेत.
8. कर्नाटकाचे स्वाभाविक विभाग कोणते ?
कर्नाटकाचे 3 स्वाभाविक विभाग खालीलप्रमाणे-: किनारपट्टीचा प्रदेश
मलनाड प्रदेश
मैदानी प्रदेश
9. कर्नाटकाच्या किनारपट्टीवरील जिल्हे कोणते?
उत्तर कन्नड,उडूपी आणि दक्षिण कन्नड कर्नाटकाच्या किनारपट्टीवरील जिल्हे आहेत.
10. कर्नाटकातील प्रशासकीय विभाग सांगा.
उत्तर – कर्नाटकातील प्रशासकीय विभाग 4 आहेत.
1.बेंगळुरू विभाग
2.म्हैसूर विभाग
3.कलबुरगी विभाग
4.बेळगावी विभाग