एक राजा जो जनतेसाठी जगला. एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला. एक नेता ज्याने गुलामासारखं जगणं नाकारलं आणि जन्म दिला जगातील एका प्रतिष्ठीत अशा मराठा साम्राज्याला.
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर
आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती….
छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा योद्धा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. ते जगातील काही महान राजांमध्ये एक होते आणि लोक आजही त्यांना तेवढाच आदर आणि सन्मान देतात.शिवाजी महाराजांची ख्याती भारतात तसेच पूर्ण जगातही आहे.एक शूरवीर योद्धा ज्याच्याकडे प्रशासकीय कुशलता, आधुनिक लष्करी डावपेचांमध्ये पारंगतपणा आणि दूरदृष्टी होती आणि म्हणूनच शिवाजी महाराज एक महान योद्धा तसेच एक जाणता राजा होते आणि प्रचंड मोठे,सामर्थ्यशाली असं मराठा साम्राज्य उभारू शकले.
निश्चयाचा महामेरू,अखंडस्थितीचा निर्धारू, यशवंत, कीर्तिवंत,पुण्यवंत,नीतिवंत किंवा आचारशील,विचारशील,दानशील,धर्मशील या विशेषणांबरोबर नरपती,गजपती आणि गडपती अशा समर्थ रामदासस्वामींनी वापरलेल्या अनेक विशेषणांतून शिवाजी महाराजांचे श्रेष्ठत्व अधोरेखित होते.
असे आपले आराध्य,यशवंत, कीर्तिवंत,पुण्यवंत,नीतिवंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिमाखात साजरी करण्यासाठी उपयुक्त माहिती,भाषणे,सूत्रसंचालन इत्यादी उपलब्ध करून देत आहोत.
सर्व PDF संकलन व निर्मिती – श्री.आशिष देशपांडे (सर) (संपर्क 9021481795)
आता विविध विषयांवर भाषण व सूत्रसंचालन एका क्लिक मध्ये
शाळेतील किंवा घरात साजरे होणाऱ्या विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व भाषणे,विविध दिनांची माहिती आणि सूत्रसंचालन आता एका क्लिकवर उपलब्ध आहेत
राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम व सूत्रसंचालन मार्गदर्शक
श्री आशिष देशपांडे सर
यांच्या विविध विषयांवर आधारित भाषणे व सूत्रसंचालन PDF स्वरूपात पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर टच करा…
भाषणे व माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
सूत्रसंचालन फाईल्स साठी खालील लिंक वर क्लिक करा.
आवडल्यास इतरांना पाठवायला विसरू नका