ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಲ
प्रस्तुत कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्य निर्धारण मंडळ (KSEAB) त्यांच्या स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करुन शाळांना पुरवणे आणि शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून विषयनिहाय विश्लेषण करणे व विषयनिहाय, शाळानिहाय,क्लस्टर/तालुकानिहाय अध्ययन कमतरता जाणून घेऊन पुढील वर्षात त्याविषयी आवश्यक उपाययोजना करून अध्ययन प्रगती साधणे.या उद्देशाने सदर मूल्यांकन घेण्यात येणार आहे.
06. प्रश्नपत्रिका स्वरूप:-
चालू वर्षात अर्धे शैक्षणिक वर्ष आधीच पूर्ण झाले असल्याने आणि उर्वरित सहामाहीच्या अभ्यासक्रमावर आधारित अभ्यासक्रमावर आधारित (नोव्हेंबर-2022 पासून मार्च 2023च्या पहिल्या आठवड्यापर्यंत) संकलित मूल्यमापन-2 (SA-2)आयोजित करण्यात येणार आहे.
5वी आणि 8वी साठी 50 गुण आणि 2 तासांचा वेळ घेऊन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यापैकी 40 गुण लेखी परीक्षेसाठी,10 गुण तोंडी परीक्षेसाठी दिले जातील.40 गुणांची लेखी परीक्षेमध्ये 20 गुणांचे MCQ (बहुपर्यायी) प्रश्न आणि उर्वरित 20 गुणांचे लेखी प्रश्न विश्लेषण स्वरूपात समाविष्ट करून ब्लू-प्रिंट तयार करणे. अध्ययन पुनर्प्राप्ती अभ्यासक्रमांतर्गत प्रश्नपत्रिका तयार करण्याची सूचना शासनाने केली आहे.त्यानुसार अध्ययन पुनर्प्राप्ती अभ्यासक्रम प्रस्तुत वर्षातील पाठ्यपुस्तकावर आधारित असल्याने पाठ्यपुस्तक आणि अध्ययन पुनर्प्राप्ती आधारीत नमुना प्रश्नपत्रिका K.S.E.A.B. द्वारे तयार केली जाईल.या संदर्भात D.S.E.R.T. च्या सहाय्याने फेब्वारुरीच्या दुसऱ्या आठवड्यात मॉडेल प्रश्नपत्रिका प्रसिद्ध करण्यात आल्निया आहेत.त्याचे मराठी भाषांतर करून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत..
07. परीक्षा व्यवस्थापन,मूल्यमापन आणि निकाल वेळापत्रक:
चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 दिनांक:10.04.2023 रोजी संपणार असल्याने, खालील तात्कालिक वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.अंतिम वेळापत्रक K.S.E.A.B द्वारे प्रकाशित केले जाईल.
परीक्षा नियोजन: 09.03.2023 ते 17.03.2023पर्यंत
परीक्षा निकाल जाहीर करणे: 08.04.2023 ते 10.04.2023
कोविडमुळे राज्यातील सर्व शाळेमध्ये भौतिक वर्ग निरंतरपणे चालू नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती प्रतिकूल परिणाम झालेला आहे.यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात निर्माण झालेले अंतर भरून काढण्यासाठी व पुढील वर्गातील शैक्षणिक प्रक्रिया सुलभ होण्यासाठी पहिली ते नववी विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला चालना देण्यासाठी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रम (Learning Recovery Programme) आयोजित करण्यात येत आहे.
नमुना उत्तरांसाठी अध्ययन निष्पत्ती क्रमांकावर स्पर्श करा..
अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रमांतर्गत नवीन अध्ययन पुस्तिका देण्यात आल्या आहेत.त्यातील अध्ययन कृती सोडवून उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत.ही सर्व उत्तरे नमुनादाखल असून याचाच वापर करावा असा कोणताही आग्रह नाही…
नमुना उत्तरांसाठी अध्ययन निष्पत्ती क्रमांकावर स्पर्श करा..