Exemption in Excess Teachers’ LIST | Teacher – Student Ratio Chart





     31.12.2021 अखेर शाळेच्या SATSच्या पटसंख्येवर आधारित शाळेतील अतिरिक्त शिक्षकांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.या अंतिम अतिरिक्त शिक्षक यादी प्रसिद्ध झाल्यानंतर खालील प्रकरणातील शिक्षक या यादीतून सवलतीसाठी अर्ज करू शकतात — 

 

1) पती/पत्नी/मुलांना जीवघेणा आजार असल्यास

2)पती/पत्नी/मुले यापैकी कोणास 40% पेक्षा अधिक अपंगत्व असल्यास

3.)12 वर्षांखालील आश्रित मुलांसह विधवा/विधुर/घटस्फोटित शिक्षक/शिक्षिका 

4)पती/पत्नी संरक्षण दलात असल्यास

५) केंद्र सरकार/राज्य सरकार/अनुदानित संस्थेतील कर्मचाऱ्यांचे विवाहित प्रकरण (पती/पत्नी कार्य करत असलेल्या तालुक्यामध्ये नियुक्ती)

6) महिला शिक्षकांच्या बाबतीत ज्यांची वयोमर्यादा 50 वर्षांपेक्षा जास्त आहे.

7) पुरुष शिक्षकांच्या बाबतीत 55 वर्षांपेक्षा जास्त वयोमर्यादा असलेल्यांसाठी

8) गर्भवती शिक्षिका

9) 1 वर्षाखालील मुलासह महिला शिक्षिका 

वरील प्रकरणातील शिक्षक/शिक्षकांनी संबंधित कागदपत्रासह अर्ज केल्यास त्यांना अतिरक्त यादीतून सवलत मिळण्याचा विचार होऊ शकतो…



 

यादीवर आक्षेप नोंदविण्याच्या प्रक्रियेविषयी – 

शिक्षक बदली प्रक्रिया वा अतिरिक्त शिक्षक यादीबद्दल मानिया आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हर्च्युअल सभा आज घेण्यात आली.त्यामध्ये पुढील मुद्दे सांगण्यात आले.

२०२२ – 23 सालातील शिक्षक अतिरिक्त शिक्षक प्रकरणाशी संबंधित शिक्षण विभागाकडून आणखी एक यादी प्रकाशित करण्यात येणार आहे.ही यादी प्रकाशित झाल्यानंतर त्यावरती ऑनलाइन आक्षेप नोंदविण्याची सुविधा EEDS मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.तरी कृपया कोणीही प्रत्यक्ष अर्ज करण्याची गरज नाही.तरी शिक्षकांनी गोंधळ करून घेऊ नये.

येत्या 10.12.2022 पासून 17.12.2022 पर्यंत EEDS मध्ये ऑनलाईन आक्षेप नोंदविण्यास सुविधा देण्यात येईल.

शिक्षक- विद्यार्थी प्रमाण कोष्टक 



 



 

 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *