SSLC परीक्षा – एप्रिल 2023 तात्कालिक वेळापत्रक
कर्नाटक माध्यमिक मंडळ यांच्यावतीने घेण्यात येणारी दहावी बोर्ड परीक्षा यावर्षी 01.04.2023 ते 15.04.2023 या कालावधीत घेण्यात येणार असून बोर्डाकडून तात्कालिक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.सदर वेळापत्रक बद्दल विद्यार्थी / पालकांनी 29.10.2022 ते 28.11.2022 पर्यंत dpikseeb@gmail.com किंवा sadpi.csec.kseeb@gmail.com या मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीने किंवा “ನಿರ್ದೇಶಕರು (ಪರೀಕ್ಷೆಗಳು), ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರೌಢ ಶಿಕ್ಷಣ ಪರೀಕ್ಷಾ ಮಂಡಳಿ, 6ನೇ ಅಡ್ಡರಸ್ತೆ, ಮಲ್ಲೇಶ್ವರಂ, ಬೆಂಗಳೂರು-560003 या पत्त्यावर पोस्टाने पाठवावे.
सूचना –
प्रथम भाषेचा पेपर 100 गुणांचा असून इतर विषयांचे पेपर 80 गुणांचे असतील.
प्रथम भाषा व इतर ऐच्छिक विषय(गणित,विज्ञान,समाज) साठी 3.00 तास पेपर लिखाण आणि 15 मिनीटे प्रश्नपत्रिका वाचनासाठी वेळ असा एकूण 3.00 तास 15 मिनीटे वेळ असेल.
द्वितीय भाषा व तृतीय भाषा विषयांच्या उत्तर पत्रिका लेखनसाठी 2.45 तास व 15 मिनीटे प्रश्नपत्रिका वाचनासाठी वेळ असा एकूण 3.00 तास वेळ असेल.
SSLC परीक्षा -मार्च / एप्रिल 2023 तात्कालिक वेळापत्रक खालीलप्रमाणे –
दिनांक | विषय | एकूण वेळ |
शनिवार 01.04.23 | प्रथम भाषा | 3.00 तास 15 |
मंगळ 04.04.23 | गणित | 3.00 तास 15 |
गुरुवार 06.04.23 | द्वितीय भाषा (इंग्रजी/ कन्नड )
| 2.45 तास 15 मिनिटे |
शनिवार 08.04.23 | इंजिनिय. अर्थशास्त्र मेकॅनिक्स इत्यादी. | 3.00 तास 15 मिनिटे |
सोम 10.04.23 | विज्ञान/ राज्यशास्त्र/ संगीत इ. | 3.00 तास 15 मिनिटे |
बुध 12.04.23 | तृतीय भाषा (हिंदी, इंग्रजी, कन्नड उर्दू इ. | 2.45 तास 15 मिनिटे |
बुध 15.04.23 | समाज विज्ञान | 3.00 तास 15 |