सहावी समाज विज्ञान 3. मौर्य आणि कुशाण (6th SS 3. MOURYANS & KUSHANS)

 


 6 वी समाज विज्ञान 

पाठ 3 . मौर्य आणि कुशाण

www.smartguruji.in
 

1. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली?

उत्तर – चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली.

2. मौर्यांच्या राजधानीचे नाव सांगा.

उत्तर – पाटलीपुत्र ही मौर्यांची राजधानी होती.

3. कौटिल्याने लिहिलेला ग्रंथ कोणता?

उत्तर – कौटील्याने अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला.

4. मेगॅस्थेनिसने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय?

उत्तर – मेगॅस्थेनिसने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव इंडिका असे होते

5. “सर्व प्रजा माझ्या मुलासारखी आहे” असे म्हणणारा सम्राट कोण?

उत्तर – सर्व प्रजा माझ्या मुलासारखी आहे” असे सम्राट अशोकाने म्हटले
आहे.
 

6. धर्ममहामात्र करत असलेली कार्ये कोणती?

उत्तर – जनतेमध्ये चांगल्या वागणुकीचा प्रचार करणे.धार्मिक नितीन नियमांचा प्रचार करणे.अनाथ विधवा आणि वयोवृद्धांची निगा राखणे.ही धर्ममहामात्रांची कार्ये होती.

7. कनिष्काने बौद्ध महासभा कोठे घेतली?

उत्तर – कनिष्काने काश्मीरमध्ये बौद्ध महासभा घेतली.

8. अश्वघोषाची प्रसिद्ध रचना कोणती?

उत्तर – बुद्धचरित्र ही अश्वघोषाची प्रसिद्ध रचना होती.

9. भारताची प्राचीन वैद्यकीय चिकित्सा प्रणाली कोणती?

उत्तर – आयुर्वेद ही भारताची प्राचीन वैद्यकीय चिकित्सा प्रणाली होती.
 

प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी  खालील लिंकवर स्पर्श करा..

 

 

 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.