शाळेत वेळेवर हजर न राहणाऱ्या व शालेय कृतीत प्रभावीपणे सहभागी न होणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे मा. शिक्षणमंत्र्यांचे आदेश..
दि. 16.०८.२०२२ रोजीचा मा. शिक्षणमंत्री बी.सी.नागेश यांचा आदेश
राज्यातील बहुतेक शिक्षक वेळेवर शाळेत उपस्थित राहत नाहीत आणि वर्ग अध्यापनात प्रामाणिकपणे व श्रद्धापूर्वक सहाभागी होत नाहीत असे शाळेना भेटी देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अहवालातून निदर्शनास आले आहे.
परंतु काही वेळा माझ्या निदर्शनास आले आहे की,शिक्षक वेळेवर शाळेत येत नाहीत आणि सर्व मुले शाळेच्या आवारात वर्गाचे कुलूप न काढता शिक्षकांची वाट पाहत बसलेली असतात. उदाहरणार्थ दिनांक: 12.08.2022 रोजी सरकारी उच्च प्राथमिक शाळा, नेल्लीगेरे, नागमंगला तालुका, मंड्या जिल्हा येथे अनपेक्षितपणे भेट दिली असता शाळेतील तीन शिक्षक सकाळी 10.30 वाजेपर्यंत शाळेत आले नव्हते. शाळेच्या आवारात मुलं शिक्षकाची वाट पाहत होती.
मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या आणि त्यांची सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या शिक्षकांच्या अशा गैरहजेरीची गांभीर्याने दखल घेण्यात यावी आणि राज्याच्या कोणत्याही भागात असे प्रकार घडल्यास कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सर्व जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना देण्यात यावा.