हर घर तिरंगा अभियान घोषवाक्ये
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील असंख्य नेते,क्रांतिकारक,देशभक्त तसेच स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण करावे हे आमचे आद्य कर्तव्य आहे.स्वातंत्र्य लढ्यातील सर्व देशभक्तांना स्मरण करून त्यांनी स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने ‘आजादी का अमृत महोत्सव‘ अर्थात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव‘ अंतर्गत दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा‘ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावर्षी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत याची औचित्य साधुन केंद सरकार ‘हर घर तिरंगा’ या घोषवाक्याने देशातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकावून 13 ऑगस्ट 2022 ते १५ ऑगस्ट 2022 पर्यंत हर घर तिरंगा अभियान परिणामकारकपणे राबविण्याचे आहे.तरी यासाठी शासनाने शाळा कॉलेजना हर घर तिरंगा उपक्रमाचा प्रचार करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यास सांगितले आहे.
प्रभातफेरीसाठी प्रिंट काढून आवश्यक फलक म्हणून वापरण्यास उपयुक्त घोषवाक्ये PDF स्वरूपात उपलब्ध आहेत..