DESHABHAKTI GEET (देशभक्ती गीत – आता उठवू सारे रान)



 


आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान

शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान

किसान मजूर उठतील,

कंबर लढण्या कसतील

एकजुटीची मशाल घेउनि

पेटवतिल सारे रान

आता उठवू सारे रान,

आता पेटवू सारे रान

कोण अम्हां अडवील,

कोण अम्हां रडवील

अडवणूक त्या करणाऱ्यांची

उडवू दाणादाण

आता उठवू सारे रान,

आता पेटवू सारे रान

शेतकऱ्यांची फौज निघे,

हातात त्यांच्या बेडि पडे

तिरंगी झेंडे घेती,

गाती स्वातंत्र्याचे गान

आता उठवू सारे रान,

आता पेटवू सारे रान

पडून ना राहू आता,

खाऊ ना आता लाथा

शेतकरी अन् कामकरी

मांडणार हो ठाण

आता उठवू सारे रान,

आता पेटवू सारे रान





Share with your best friend :)