इयत्ता – आठवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – २०२४ सुधारित
विषय – स्वाध्याय
भूगोल
प्रकरण – 22
शिलावरण
I. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. भूखंडीय शिलावरणाला भूकवच असेही म्हणतात.
2. पसरट भांड्याच्या आकाराचा व शंकूसारख्या मुखाच्या ज्वालामुखीस कॅलडेश म्हणतात.
3. सर्वात जास्त विध्वंसक भूकंप लहरी म्हणजे भूपृष्ठ लहरी.
4. अधोमुखी लवणस्तंभ आणि उर्ध्वमुखी लवणस्तंभ ऑस्ट्रेलिया प्रदेशात सामान्यपणे आढळतात.
5. सागरी लाटांच्या कार्यामुळे पुळण (Beaches) तयार होतात.
II. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
6. पृथ्वीच्या अंतर्भांगाचे तीन थर कोणते?
उत्तर – पृथ्वीच्या अंतर भागाचे तीन थर खालील प्रमाणे-
1.शिलावरण
2.मध्यावरण
3.गाभा.
7. वारंवार होणाऱ्या उद्रेकावरून होणारे प्रकार कोणते?
उत्तर – 1.जागृत ज्वालामुखी
2.सुप्त ज्वालामुखी
हे वारंवार होणाऱ्या उद्रेकावर होणारे ज्वालामुखीचे प्रकार आहेत.
8. जगातील भूकंप होणाऱ्या प्रदेशांची नावे
लिहा ?
उत्तर – जपान अमेरिकेच्या संयुक्त संस्था हे जगातील भूकंप होणारे प्रदेश आहेत.
9. विदारण (अपक्षय) म्हणजे काय ? अपक्षयाचे तीन प्रमुख प्रकार लिहा.
उत्तर – खडक ठिसूळ होऊन फुटतात व त्याचा भुगा होतो.या नैसर्गिक प्रक्रियेस विदारण म्हणतात.
विदारणचे प्रमुख तीन प्रकार खालील प्रमाणे
1.भौतिक अपक्षय
2.रासायनिक अपक्षय
3.जैविक अपक्षय
10. नदीच्या कार्यामुळे कोणकोणती भूस्वरूपे निर्माण होतात ?
उत्तर – नदीच्या उगमापासून मुखापर्यंतच्या वाहत्या मार्गाला नदीचे पात्र / प्रवाह म्हणतात. या पात्राचा वरचा टप्पा,मधला टप्पा,खालचा टप्पा असे तीन भाग पडतात.या प्रत्येक टप्प्यात नदीच्या पाण्याचे प्रमाण,नदीचा वेग,पात्राचा आकार वेगवेगळा असतो.प्रत्येक विभागात नदीचे कार्य व त्यापासून निर्माण होणारी विशिष्ट प्रकारची असतात.
III. जोड्या जुळवा
अ
ब
11. सीमा A. भूकंप
12. वालुकाश्म B. पिवळी माती
13. अपिकेंद्र C. सागरी भूकवच
14. हिमनदी D.गाळाचा खडक
15. लोएस E.भूम्यांतर्गत पाणी
उत्तर – अ ब
11. सीमा C. सागरी भूकवच
12. वालुकाश् D.गाळाचा खडक
13. अपिकेंद्र A. भूकंप
14. हिमनदी E.भूम्यांतर्गत पाणी
15. लोएस B. पिवळी माती
वनस्पतीपासून मिळालेल्या कार्बनी पदार्थांपासून बनलेल्या खडकास कार्बनयुक्त खडक किंवा दगडी कोळसा असे म्हणतात.
किंवा महासागराच्या तळाला भूकंप झाल्यामुळे अतिशय उंच व प्रचंड आकाराच्या भयंकर लाटा किनाऱ्यावर आढळतात त्यांना सुनामी म्हणतात.