बौद्ध परंपरा आणि इतर संकीर्ण..या पुस्तकाचे लेखक डॉ. संतोष भोसले यांचा वर्गमित्रांनी केला सत्कार..
डॉ. संतोष भोसले यांच्या या नवीन वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी आज दि.13 जुलै रोजी मांगूर येथे वर्गमित्रांनी स्वागतपर सत्कार समारंभ संपन्न झाला.या सत्कार प्रसंगी डॉ.भोसले यांचे बालपणीचे सवंगडी उपस्थित होते. सर्वांनी खूप आदराने पुस्तकाचे स्वागत केले आणि गौतम बुद्धांची प्रतिमा भेट देवून त्यांच्या साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अनुप्रास पाटील,गणेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.शेरखान मुल्ला,सागर जळणे,गजानन तेली,सुनिल पाटील,अमित कामिरे, डॉ.जयंत कांबळे, बाहुबली इंग्रोळे,अरुण पाटील,मोहन कोगनोळे, संतोष मानकापुरे आदी वर्गमित्र उपस्थित होते.
सदर पुस्तकांसाठी संपर्क- 9011631853.